कराड /वार्ताहर फुटबॉल खेळाची पंढरी समजली जाणाऱ्या स्पेन येथील बार्सिलोना येथे होणाऱ्या यूथ फुटबॉल स्पध्रेसाठी १६ वर्षांखालील भारतीय संघात कराडच्या होली फॅमिली स्कूलचा विद्यार्थी राज संदीप तलाठी याची निवड झाली आहे. |
पेट्रोल पंप सुरक्षित सोलापूर /प्रतिनिधी - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सोलापूरनजीक नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या रासायनिक द्रव्यपदार्थ वाहतुकीच्या टँकरला अचानकपणे आग लागून घडलेल्या दुर्घटनेत सदर टँकरसह त्यास खेटून थांबलेला कंटेनर व मालमोटार अशी तीन वाहने जळून खाक झाली. मात्र सुदैवाने पेट्रोल पंप सुरक्षित राहिला. बुधवारी पहाटे चाडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. |
श्वेतपत्रिकेच्या मागणीसाठी मोर्चा कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हय़ातील पाटबंधारे खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुधवारी कोल्हापुरातील पाटबंधारे खात्याच्या सिंचन भवन या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचाराचे स्वरूप स्पष्ट करणारे फलक घेतल्याने आणि पाटबंधारे विभागाची नेतृत्व करणाऱ्या भ्रष्ट नेत्याची वेशभूषा केलेली व्यक्ती लक्षवेधी ठरली होती. |
सोलापूर / प्रतिनिधी पुणे महामार्गावर टेंभुर्णी येथे एका पेट्रोल पंपावरील ७३ लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच जणांच्या आंतरराज्य टोळीवर मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून या सर्वाना पुण्यात मोका न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. |
व्यवस्थापन बदलण्याची मागणी वाई/वार्ताहर पुणे-सातारा रस्त्यावरील आनेवाडी टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले. दोन-तीन दिवसांत टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलले नाही तर टोलनाका तोडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व विकास शिंदे यांनी केले. ज्या ग्रामस्थांच्या शेतजमिनी रस्तारुंदीकरणासाठी व रस्त्यात गेलेल्या आहेत, अशा पुणे- सातारा महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर ठेकेदारांकडून टोलवसुली करण्यात येते. |
जिल्ह्य़ात १०४ चारा छावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरी सोलापूर /प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्य़ात बार्शी वगळता उर्वरित सर्व दहा दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पशुधन वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त चारा छावणी प्रस्तावांपैकी १०४ चारा छावण्यांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी ८५ चारा छावण्या कार्यरत आहेत. या छावण्यांमध्ये एकूण ७३ हजार ५२५ जनावरे दाखल असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. |
कोल्हापूर / प्रतिनिधी ‘दारूची नशा, आयुष्याची सजा, माणसा माणसा व्यसन सोड, आनंदी जगण्याशी नाते जोड’ अशा घोषणा देत कोल्हापूर एनसीसी मुख्यालयातील ‘५६ महाराष्ट्र एनसीसी बटालीयन’ चे कर्नल प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मद्यपान व मादक द्रव्य सेवनविरोधीची छात्रसैनिकांची रॅली झाली. मेजर डॉ. रूपा शहा कार्यक्रमाच्या संयोजक होत्या. रॅलीमध्ये ४०० छात्रसैनिक उपस्थित होते. |
कोल्हापूर / प्रतिनिधी ‘महालक्ष्मी गोल्ड’ पशुखाद्याच्या दरामध्ये प्रतिकिलो दीड रुपयाप्रमाणे ५० किलो पशुखाद्याच्या पोत्यास पंचाहत्तर रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकत्याच ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी झालेल्या सभेत दूध उत्पादकांना पशुखाद्य दराबाबत सोसाव्या लागणाऱ्या आर्थिक झळीबाबत चर्चा करण्यात आली. गोकुळला दूधपुरवठा करणाऱ्या संस्थांनाच या अनुदानाचा लाभ मिळेल, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली. |
कोल्हापूर /प्रतिनिधी वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी हे तळागाळातील असून ते गरजू असतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करु न देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते. तथापि वसतिगृहातून मिळणाऱ्या सुविधांबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत असते. याबाबतची सत्यता तपासण्यासाठी व गरजू विद्यार्थ्यांंना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी तपासणी पथकाची निर्मिती करण्यात येणार असून त्याद्वारे अचानक भेट देऊन जिल्ह्यातील १७ शासकीय वसतिगृहांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितले. |
कोल्हापूर /प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्याविषयी मनामध्ये नकारात्मक भावना आणू नये. त्यांनी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. जगण्याची ऊर्मी सतत मनात बाळगून मिळालेले आयुष्य आनंदाने जगावे, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी व्यक्त केले. |
सोलापूर / प्रतिनिधी दिवंगत माजी जिल्हा सरकारी वकील शंकरराव ठोकळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श विधिज्ञ पुरस्कारासाठी माजी जिल्हा सरकारी वकील अब्बास काझी यांच्यासह अॅड. शरद फुटाणे व अॅड. मंगला चिंचोळकर यांची निवड झाली आहे. मंडळाच्या वतीने अॅड. सुरेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. |
कोल्हापूर / प्रतिनिधी निवडणूक आयोगाकडून अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्या दुरुस्ती कार्यक्रम १ ऑक्टोबर ते ५ जानेवारी २०१३ पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राजाराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. |
सोलापूर /प्रतिनिधी लोकमंगल प्रतिष्ठान व लोकमंगल सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ह.भ.प. सुरेशचंद्र देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़गृहात आयोजित खुल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पुरुष गटात सोलापूरचे दत्तात्रेय सेवाभावी भजनी मंडळ, तर महिला गटात सांगोल्याच्या श्रीराम महिला भजनी मंडळाला प्रथम पारितोषिक मिळाले. |
कोल्हापूर /प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी १ जानेवारी २०१३ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने आज मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. |
जयसिंगपूर नगरपालिको सर्वसाधारण सभा कोल्हापूर/प्रतिनिधी जयसिंगपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी इंजिनिअर्स असोसिएशनने तयार केलेल्या आराखडय़ास नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या सभेत शहरातील मिळकत धारकांकडून दरमहा १० रूपये कचरा संकलन शुल्क लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा .स्वरूपा पाटील यड्रावकर होत्या. नगरपालिकेच्या दे.भ.रत्नप्पाण्णा कुंभार सभागृहात झालेल्या या सभेत नगरपरिषदेमार्फत वृक्षलागवड व संगोपन कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीसाठी मागविण्यात आलेल्या निविदांच्या कामास कायरेत्तर मंजुरी देण्यात आली. |
|
|
<< Start < Prev 21 22 Next > End >>
|
Page 22 of 22 |