कराड/वार्ताहर मुंबई उच्च न्यायालयाचे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ व्हावे, या प्रलंबित मागणीसाठी कराड न्यायालयातील वकिलांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. कराड दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन छेडले. |
सोलापूर/प्रतिनिधी येथील शिवामृत दूध संघामध्ये केवळ शिपाईपदावर काम करणाऱ्या पिसेवाडी (ता. माळशिरस) येथील ज्ञानेश्वर दाजी वाघ या युवकाने सुमारे १० ते १२ लाख किमतीच्या दागिन्यांची सापडलेली पर्स मोबाईलवर संपर्क साधून ज्याची होती त्यास परत केली. वाघ यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल वेळापूर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. |
कोल्हापूर / प्रतिनिधी नोव्हेंबरपासून केएमटी तिकीट दरवाढ लागू होणार असल्याचे परिवहन विभागाने पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे. तिकीट दरामध्ये १४.११ टक्के व पासेसच्या दरामध्ये सरासरी १३.४१ टक्के इतकी दरवाढ केल्याचे परिवहन प्रशासनाने सांगितले आहे. |
खासदार राजू शेट्टी यांना इशारा कोल्हापूर / प्रतिनिधी चालू गळीत हंगामासाठी तीन हजार रुपये दराच्या मागणीमुळे साखर कारखाने बंद आहेत. आंदोलन करणाऱ्या नेत्यांनी या मागणीवर ठाम राहावे. बंद खोलीत चर्चा करू नका. तीन हजार रुपयांपेक्षा शेतकऱ्यांना दर कमी मिळाला तर समजा, ‘चोरी हो गयी’ अशी टीका करत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी खासदार शेट्टी यांचे नाव न घेता केली. |
कोल्हापूर / प्रतिनिधी राज्य सरकारला ऊसदराच्या मुद्यावर जबाबदारी झटकता येणार नाही. शेतकऱ्यांच्या ऊसदराच्या प्रश्नावर मी शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभा आहे. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर मिळावा, यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे मत हमीदवाडा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी व्यक्त केले. |
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची माहिती सोलापूर /प्रतिनिधी शैक्षणिक गुणवत्तेसाठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षा करणाऱ्या शिक्षकांना शिक्षा करण्याची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. मात्र या शिक्षकांच्या शिक्षेच्या तरतुदीत बदल करण्यासाठी राज्य सरकार केंद्राला शिफारस करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सांगितली. |
वाई/वार्ताहर ‘‘श्रीरंग काटेकर यांच्या लेखन शैलीत विषय प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य आहे. चित्रपट व मराठी मालिकांसाठीचे आशय त्यांच्या लेखनात आढळतात,’’ असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक देवेंद्र सुपेकर यांनी व्यक्त केले. |
कोल्हापूर/प्रतिनिधी जवाहर, दत्त, शरद साखर कारखान्याच्या वतीने सन २०११-१२ च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १५० रु पयांप्रमाणे चौथा हप्ता देण्यात येत आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी एलबीटी वसुलीत व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तसेच अन्य कारणांमुळे आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आलेल्या सोलापूर महापालिकेने दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना अडीच हजारांची उचल, तसेच तेवढीच रक्कम सानुग्रह अनुदान स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या फाटक्या तिजोरीवर अडीच कोटींचा बोजा पडणार आहे. |
पंढरपूर/वार्ताहर पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे राहणारे निवृत्त शिक्षक विजय हरिभाऊ फुगारे (६५) यांचा मुलाने कुऱ्हाडीने डोक्यात वार करून खून केला. या घटनेनंतर अजय फरारीझाला. |
आंदोलनामुळे ‘राजाराम’चे कामकाज ठप्प कोल्हापूर / प्रतिनिधी- छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कामकाज ठप्प राहिले. अध्यक्ष दिलीप पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळास संप स्थगित करण्याच्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. |
कोल्हापूर/प्रतिनिधी, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
लाखो भाविकांच्या उपस्थितीत हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीच्या विठ्ठल-बिरदेव यात्रेला आज प्रारंभ झाला. बिरोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष, धनगरी ढोल, कैताळाचा निनाद आणि भंडाऱ्याची उधळण यामुळं वातावरण उत्साही होतं. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे सालाबादाप्रमाणे विठ्ठल-बिरदेव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, गोवा, आंध्रप्रदेश तसेच अन्य राज्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी सोलापुरातील अल्पसंख्याक समाजाच्या औद्योगिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या भारत सहकारी गारमेंट संस्थेतील गैरकारभाराची दखल घेऊन अखेर शासनाने या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्त केली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते शफी इनामदार यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. |
पंढरपूर / वार्ताहर ग्रामीण भागातील तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे हा संशोधनाचा मुख्य हेतू असून भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई व श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटय़ूट, पंढरपूर यांच्या माध्यमातून ते शक्य होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही श्री विठ्ठल इंजिनिअरिंग मधूनच थेट चार शाळांशी एनकेएन (नॅशनल नॉलेज नेटवर्क) च्या माध्यमातून वायफाय इंटरनेटद्वारे संवाद साधून संशोधनाचे आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. |
पंढरपूर / वार्ताहर उजनी धरणाच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या एनटीपीसी प्रकल्प तसेच नगरपालिका, महानगरपालिका, कारखाने, शासकीय कार्यालये अशातून पाच टक्के जागा, नोक ऱ्या आरक्षित ठेवून धरणग्रस्तांच्या मुलामुलींना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे पाणीपुरवठा, स्वच्छता व पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले. |
कराड/वार्ताहर, दिवाळीच्या सणात फटाक्यांच्या आतषबाजीला सर्वाधिक महत्त्व दिले जात असल्याने त्यातून होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. |
कोल्हापूर / प्रतिनिधी ऊस दर प्रश्नावरु न शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना व वारणा साखर कारखान्याचे समर्थक यांच्यात वादावादी झाली. स्वाभिमानीचे कार्यकर्ते पहिला हप्ता 3 हजार रु पये द्यावा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी कारखाना परिसरात आले असता हा प्रसंग घडला. |
कोल्हापूर / प्रतिनिधी वीज दरवाढ व वीज समस्या प्रश्नी शिवसेनेच्या वतीने मुरगूड ता. कागल येथे मोर्चा काढण्यात आला होता. अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. |
कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विरोध केल्याच्या कारणावरु न चाकू भोसकून मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप बाळासाहेब उलपे यांना शनिवारी न्यायालयाने ५ वर्षे सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. |
सोलापूर /प्रतिनिधी विकास सहकारी बँक व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५, ६ व ७ नोव्हेंबर रोजी तीन दिवस हुतात्मा स्मृतिमंदिरात आचार्य किशोर व्यास यांच्या वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 22 |