कोल्हापूर / प्रतिनिधी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
गुळाचे सौदे करण्यास नकार दिल्याने गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातून शेतकरी, आडते व पदाधिकाऱ्यांच्यात वादावादी झाली. (छाया-राज मकानदार)
गुळाचे सौदे बंद पाडल्याने शुक्रवारी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न समितीच्या कार्यालयाला टाळे ठोकले. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोंडून घालण्याचा प्रकारही घडला. येथील शाहू मार्केट यार्डामध्ये शुक्रवारी बाजार समितीकडून गुळ उतरवून न घेतल्याने गूळ उत्पादक शेतकरी व बाजार समितीच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादंग झाला. |
‘कृष्णा’ चा दुसरा हप्ता ३०० रुपये कराड/ वार्ताहर सहकारी साखर कारखानदारी टिकायची असेल तर साखर उद्योग नियंत्रणमुक्त झाला पाहिजे. या कारखानदारीने स्पध्रेत टिकण्यासाठी उपपदार्थाची निर्मिती करावी असे मत व्यक्त करताना, सहकारात कृष्णा कारखान्याचा नावलौकिक असल्याचे पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. |
नवी इमारत बांधण्यापूर्वीच पैसे घेऊन ठेकेदाराचा पोबारा वाई/वार्ताहर महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली या गावच्या विद्यार्थ्यांची जि. प. च्या प्राथमिक शाळेची जुनी इमारत पाडून ठेकेदाराने यासाठीची अनामत रक्कम घेऊन पोबारा केल्याने या प्राथमिक शाळेच्या चिमुरडय़ांवर पाडलेल्या खोल्यांशेजारीच अडगळीत व उघडय़ावर बिनभिंतीच्या शाळेत शिकण्याची वेळ आली आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी शिक्षणाधिकारीपदाच्या सरळसेवा भरती परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना डावलून पदोन्नतीने आपली या पदावर वर्णी लावण्याचा चंग शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी बांधला असून यात न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलेल्या भरतीप्रक्रियेचा लाभ घेत शासनाचीही दिशाभूल केली जात आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी संगणकासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सोलापूरच्या अश्विनी सहकारी रुग्णालयात कृत्रिम सांधेरोपणाची सुविधा उपलब्ध झाली असून अशा प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉ. आनंद करवा यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. |
कराड/ वार्ताहर कराड पालिकेच्या सुपर मार्केटशेजारील बागेला दिवंगत पी.डी. पाटील यांचे नाव देण्याचा विषय पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे होत्या. |
कोल्हापूर / प्रतिनिधी औरंगाबाद येथे होत असलेल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या आंतर गटमुख्यालयातील स्पर्धा शिबिरासाठी कोल्हापूर गट मुख्यालयाच्या ८० छात्रसैनिकांचे पथक गुरुवारी रवाना झाले. या पथकाला कोल्हापूर गटमुख्यालयाचे प्रमुख ब्रिगेडिअर सुभाष दीक्षित यांनी शुभेच्छा दिल्या. |
भिकोबा थोरात यांच्या तैलचित्राचे अनावरण कराड / वार्ताहर सहकारातील अपप्रवृत्तीमुळे ही चळवळ बदनाम होऊन तिची पीछेहाट होत असल्याची बाब चिंताजनक असून, सहकारातील कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज मत आमदार विलासकाका उंडाळकर यांनी व्यक्त केले. |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा कोल्हापूर/प्रतिनिधी भोगावती साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने मागील वर्षीच्या उसाला इतर कारखान्यांप्रमाणे दर देतो, असे सांगून सभासदांचा तोटा केला आहे. |
कोल्हापूर/प्रतिनिधी इचलकरंजी महिला महासंघाच्यावतीने केंद्र शासनाने गॅस सिलेंडर कपातीबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. प्रत्येक कुटुंबाला वर्षांला ६ सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. |
कराड/ वार्ताहर लोकनेते पी. डी. पाटील यांच्या सह्य़ाद्री कारखाना कार्यस्थळावरील पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी (दि. ४) होत आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार भारतीचा कलासाधक संगम येत्या डिसेंबरमध्ये सोलापुरात हुतात्मा स्मृतिमंदिरात आयोजित केला आहे. राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, नाशिकसह बहुसंख्य जिल्ह्य़ांतून सुमारे सहाशे कलासाधक सहभागी होणार आहेत. |
कोल्हापूर/ प्रतिनिधी ‘आनंदवन’मधील कुष्ठरोगी, अंध, अपंग, मूकबधिरांना सहानुभूतीची नव्हे तर समान संधीची गरज आहे. त्यासाठी लढणार असल्याची ग्वाही डॉ. विकास आमटे यांनी दिली. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ’स्वरानंदवन’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आले असता ते बोलत होते. |
कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सहा कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्यासाठी बाजार समिती कार्यालयाच्या आवारात वारसांनी सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरू केले आहे. |
कोल्हापूर / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्य़ात बोगस डॉक्टर शोधमोहीम उघडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत झाला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राजाराम माने होते. |
मोहरम कमिटीची वार्षिक सभा सोलापूर /प्रतिनिधी- दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मोहरम उत्सव साजरा होत असून त्यासाठी सोलापूर शहर मोहरम कमिटीची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शनिवार पेठेतील दुर्वेश मशिदीत आयोजित करण्यात आली आहे. |
कोल्हापूर/प्रतिनिधी - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२ कोल्हापुरात अजूनही मोठय़ा संख्येने असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने गुरुवारी शहरात रॅली काढण्यात आली. मोठय़ा संख्येने असलेल्या मोटारीमध्ये सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी नागरिकांचे प्रबोधन केले. विशेष पोलिस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण व पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांना निवेदन देण्यात आले. |
मृतदेह उसाच्या फडात टाकला पंढरपूरजवळील घटना सोलापूर /प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील पोहोरगाव येथे एका २५ वर्षांच्या तरूणीवर बलात्कार करून नंतर तिचा खून केला आणि मृतदेह उसाच्या फडात टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वैभव ऊर्फ भय्या विष्णू गायकवाड याच्याविरूध्द पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. |
सोलापूर /प्रतिनिधी सोलापूर जिल्हय़ात ऊसदराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांच्या आंदोलनाने जोर धरला असताना करमाळा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या झेंडय़ाखाली स्थानिक शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. काही गावांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामसभा होऊन त्यात ऊसतोड बंदीचा ठराव मंजूर केला जात आहे. |
अती पाऊस पडणाऱ्या भागातील रस्त्यांसाठीचे नवे तंत्रज्ञान संजय दस्तुरे महाबळेश्वरातील विविध पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते वनखात्याकडून सध्या नवीन ‘व्हाईट टॉपिंग’ या तंत्राचा वापर करुन बनविले जात आहेत. याअंतर्गत महाबळेश्वरातील प्रसिद्ध ‘ऑर्थरसीट पॉईंट ते सावित्री पॉईंट’ हा सुमारे १ कि.मी. चा रस्ता आगामी दिवाळी पर्यटन हंगाम डोळ्यासमोर ठेवून युद्धपातळीवर प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण केला जात असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल एस. एम. खोत यांनी दिली. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 5 of 22 |