प्रा. श्रीधर अभ्यंकर, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ (लेखक हे डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचे बंधू आहेत.)
ख्यातनाम गणितज्ञ श्रीराम अभ्यंकर यांचे शुक्रवारी अमेरिकेत निधन झाले. त्यांनी गणित संशोधनात भारताचे नाव उज्ज्वल केले. गणितातील अनेक कूटप्रश्न त्यांनी लीलया सोडवून दाखवले. आंतरराष्ट्रीय गणित वर्षांत या गणितज्ञाने जगाचा निरोप घेतला आहे, हा एक दुर्दैवी योगायोग आहे. पुण्याला गणिताचे प्रमुख संशोधन केंद्र म्हणून नावारूपाला आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. .
|
रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
डॉ. श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालेले होते. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जन व ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉ. श्रीराम यांचा जन्म २२ जुलै १९३० रोजी उज्जन येथे झाला असला तरी नंतरच्या काळात त्यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते येथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असत व येथे आले की, मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरत नसे.
|
रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
जै सुवार्ता तै कारस्थानु। पै कुवार्ता चि परिवर्तनु रविवार, २८ ऑक्टोबरच्या अंकातील अतुल देऊळगावकर यांचा जागतिक तापमानवाढीवरील लेख, हा माझ्या २१ ऑक्टोबरच्या अंकातील लेखाचे खंडन करणारा असेल अशी आशा मला (त्याच्या पहिल्या परिच्छेदावरून) वाटल्याने, मी नेमका कुठे चुकतो आहे हे समजेल, या उत्सुकतेने वाचला.
|
गरिबांना किमान पोटभर जेवण तरी मिळू द्या.. रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
महागाई हा रोग नसून लक्षण आहे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा रोग बळावत आहे. देशाच्या विकासाला दिशा देताना लोकसंख्या आणि सामाजिक गरजा पाहून तंत्रज्ञान अंगीकारले पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा तोलूनमापून वापर केला पाहिजे. टीव्ही, फ्रिज, मोबाइल स्वस्त आणि सर्वसामान्यांच्या पोटासाठी लागणारे डाळ, तेल, गूळ, साखर महाग, अशी सरकारची चुकीची आर्थिक धोरणे बदलण्यासाठी जनतेनेच दबाव आणला पाहिजे आणि ही जबाबदारी मध्यमवर्गाची आहे.
|
शब्दांकन: रोहन टिल्लू, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
माझ्यासाठी ‘बाई’ म्हणजे एक विद्यापीठ आहेत. मी त्यांच्याकडून एकलव्यासारखी अभिनय शिकले. पुढल्या काळात त्यांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात राहून अभिनयातले अनेक बारकावे आत्मसात करता आले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने तर अभिनेत्री म्हणून माझी ओळख प्रस्थापित केली.. सांगताहेत रीमा लागू.. माझ्या लहानपणी मुंबई म्हणजे एक जितंजागतं शहर होतं. तसं ते आत्ताही आहे, पण सांस्कृतिक, सांगीतिक आणि साहित्यिक विश्वाचा विचार करता ती र्वष मुंबईसाठी खूप महत्त्वाची होती.
|
अतुल देऊळगावकर, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हवामान बदलाचे सर्व दावे खोटे व अवैज्ञानिक आहेत, हवामान बदल व कर्ब उत्सर्जनाचा काही संबंध नाही, हे सतत ठसवण्याकरिता अमेरिकेतील हार्टलँड इन्स्टिटय़ूटचा वापर केला गेला. सर्व पर्यावरणीय दावे खोडून काढण्याची ८६ लाख डॉलरची सुपारी हार्टलँड इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक पीटर ग्लिक यांनी घेतली. याची कबुली दस्तुरखुद्द ग्लिक यांनीच दिली. त्यावरून हवामान बदलाच्या अर्थ-राजकारणाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे.. गेल्या ‘रविवार विशेष’मध्ये ग्लोबल वॉर्मिगसंबंधी प्रसिद्ध झालेल्या लेखाची दुसरी बाजू...
|
विशेष प्रतिनिधी, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
जन्माला आलेल्या प्रत्येकाचा शेवट अटळ आहे, पण तो आपल्या हाताने, अविचाराने स्वत:च घडवून आणण्याचा अधिकार निसर्गाखेरीज कोणालाही असू नये. असे असतानाही, केवळ काही मानसिक, भौतिक, कौटुंबिक, आर्थिक कारणांमुळे स्वत:चे जीवन संपविण्याच्या घटना अलीकडे वाढू लागल्या आहेत. त्यातूनच, स्वत: आत्महत्या करण्याआधी मुलांची, कुटुंबाची हत्या करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागलेले दिसतात. या घटनेचे मूळ नैराश्यात असेल, तर नैराश्याची कारणे शोधण्याची गरज असते.
|
रेश्मा शिवडेकर, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
नवरा राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी. कसलेही व्यसन नाही. चटक फक्त एकाच गोष्टीची, क्रेडिट कार्डाची. वेगवेगळ्या बँकांची तब्बल १८ क्रेडिट कार्डे त्याने गंमत म्हणून घेतली. हॉटेलिंग, खरेदी क्रेडिटवर करायचाच; पण रोख रक्कमही क्रेडिट कार्डावर काढायची सवय त्याला लागली. ४० टक्के व्याजाने काढलेली ही रक्कम फेडण्यासाठी पुन्हा दुसऱ्या कार्डावरून पैसे काढायचे. दोन वर्षांत ७०-८० हजारांचे कर्ज साचत १०-१२ लाखांवर गेले. मग जे व्हायचे तेच झाले. वेगवेगळ्या बँकांचे एजंट वसुलीसाठी वेळीअवेळी घरी येऊ लागले.
|
सुहास बिऱ्हाडे, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
२२ ऑक्टोबर २०१२..मुंबई उपनगरातल्या कांदिवलीच्या एसव्ही रोडचा गजबजलेला परिसर. कृतिका पटेल नावाची २८ वर्षांची महिला आपल्या दोन वर्षांच्या जेनी नावाच्या मुलीसह एका इमारतीवर जाते. काही वेळात चिमुरडीसह वरून उडी मारून ती आत्महत्या करते. अस्वस्थ मुंबईकर या घटनेने पुन्हा अस्वस्थ आणि सुन्न होतात. एवढय़ा टोकाची पातळी तिने कशी गाठली..आपल्या चिमुरडीला वरून फेकताना त्या आईचे हृदय कसं कठोर बनलं, सुखवस्तू घरातल्या महिलांना असे काय दु:खं होतं की त्या असे टोकाचे पाऊल उचलतात.. एक ना एक नानाविध प्रश्न मुंबईकरांना बेचैन करतात.
|
प्राजक्ता कदम, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
कांदिवली येथील कृतिका पटेल या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला इमारतीवरून फेकल्यानंतर आत्महत्या केली. वर्षभरापूर्वी निधि गुप्ता या व्यवसायाने ‘सीए’ असलेल्या विवाहितेनेही याच पद्धतीने आत्महत्या केली होती. याच ‘स्टाइल’ने महिलांनी आत्महत्या केल्याची आणखीही काही उदाहरणे आहेत. असे काय घडले, की या महिलांनी स्वत:ला संपविण्यापूर्वी आपल्या चिमुकल्यांचा जीव घेतला? या प्रश्नाने सध्या सगळ्यांना हैराण केले आहे. परंतु आत्महत्येचा मुद्दा केवळ महिलांपुरता मर्यादित नाही..
|
संकेत सातोपे, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
तरंगिणी प्रतिष्ठानतर्फे कला अकादमी, गोवा सांस्कृतिक संचालनालय आणि पेनिन्सुला लँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने पणजीतील मा़ दीनानाथ मंगेशकर सभागृहात पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते. अनेक विश्वविख्यात कलावतांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती. आपलं घराणं किंवा आपल्या गुरूने दिलेली विद्या, हीच श्रेष्ठ आणि त्यांचाच प्रसार करण्यासाठी आपण झटायचं, असा संकुचित दृष्टिकोन बाळगणारे अनेक गायक आपण पाहतो़
|
रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
(शब्दांकन : अभिजित बेल्हेकर) आपल्या समाजात इतिहासाविषयी मुळात बेगडी प्रेम आहे. तो जतन करण्याची वृत्ती नाही. अशावेळी नगरचे सुरेशराव जोशी यांच्यासारख्या माणसांनी केलेले काम असामान्य वाटू लागते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या विलक्षण इतिहास संशोधकाला वाहिलेली श्रद्धांजली..
|
|
|