साप्ताहिक राशिभविष्य
मुखपृष्ठ >> साप्ताहिक राशिभविष्य
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साप्ताहिक राशिभविष्य
Print E-mail

रविवार, २६ ऑगस्ट २०१२
अरविंद पंचाक्षरी, नाशिक
२६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१२
मेष : तणाव कमी होईल
सप्तमातील शनी-मंगळ सहयोगातील तणाव बुध-शुक्राची राश्यांतरे बरीच कमी करतील. घेतलेले निर्णय, केलेली कृती यामध्ये गुरुकृपेने यशही मिळेल. तरीही अष्टमात राहू आहे. अवास्तव साहसी प्रयोग सध्यातरी नको. प्रापंचिक प्रश्न सुटतील, पैसा मिळेल, नोकरीत चांगले बदल होतील, व्यापारी गाडी रुळावर येईल, परिवारात प्रसन्नता राहील. बुध-नेपच्यून प्रतियोगात शब्द घोटाळे निर्माण करतात त्यात सांभाळा. स्पर्धा नको.
दिनांक : २७ ते ३१ शुभ काळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, यश मिळेल.
वृषभ : सतर्कच राहा
चतुर्थात सूर्य, षष्ठात शनी, मंगळ, मंगळवारचे बुध राश्यांतर वृषभ व्यक्तींच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारच्या बुध-नेपच्यून प्रतियोगापर्यंत सतर्क राहणेच योग्य. गुरूची अनुकूलता शुक्र राश्यांतरामुळे प्रबळ होईल. त्यातून प्रापंचिक आणि प्राप्ती यातील प्रश्न सोडवता येतील. चर्चा, भेटीतूनही काही विभागात पुढे सरकता येईल. विरोधकांना धक्का देण्याचा खटाटोप सध्या नको.
दिनांक : २९, ३०, ३१, १ शुभ काळ.
महिलांना : अवास्तव कल्पना दूर ठेवा आणि कार्यभाग साधा.
मिथुन : प्रतिमा उजळेल
शनी-मंगळ पंचमात असल्याने त्यांच्यात काही शुभ परिणाम आहेत. बुध शुक्रातील बदल विचारांना वेग देतील, कृती सत्कारणी लागतील. त्यामुळे व्यापार, राजकारण, शिक्षण यामध्ये प्रतिमा उजळून निघेल. गुरू, राहू, केतू अशुभ असल्याने शक्तींच्या सीमारेषा सांभाळाव्या लागतील. काही विभागात सामोपचाराने प्रकरणे मार्गी लावणे योग्य ठरते. मंगळ-नेपच्यून नवपंचम योग अनपेक्षित संधी आणि परमेश्वरी चमत्कारातून यशाचा आनंद मिळवून देतो.
दिनांक : २७, २८, ३१, १ शुभ काळ.
महिलांना : अडथळ्यातील शर्यत आपण अखेर जिंकणारच आहात, फक्त तयारी ठेवा.
कर्क : यश मिळेल
चतुर्थातील शनी-मंगळातून वादग्रस्त घटनांची संख्या वाढणारी आहे. त्यात काही परिवारातून, काही व्यवहारातून वाढणार आहे. त्यावर नियंत्रणासाठी संयम, शिस्त आवश्यक राहील. सूर्य, बुध, गुरू, राहू यांचे त्यामध्ये सहकार्य मिळणार असल्याने शनिवापर्यंत प्रगतीचा टप्पा गाठता येईल. अधिकारी, सहकारी, भागीदारी यांना सध्या नाराज करू नका. आरोग्यावर दुर्लक्ष नको. यश सोपे होईल, पुढे त्यात निश्चिती येईल.
दिनांक : २६, २९, ३० शुभ काळ.
महिलांना : प्रयत्न सुरू ठेवा.
सिंह : गुप्तता, हुशारी आवश्यक
राशीस्थानी सूर्य, दशमात गुरू-बुध-शुक्राचे मधूनमधून मिळणारे सहकार्य कार्यभाग साधण्यास ही ग्रहस्थिती उपयुक्त ठरणार आहे. शनी-मंगळ सहयोग चतुर्थात राहू यांचे एकत्रित परिणाम हातातोंडाशी येणारा घास पळवून नेणारा असल्याने गुप्तता, हुशारी, कार्यवेग यांचा समन्वय आवश्यक राहील. गुरुवारच्या बुध-शनी शुभयोगाच्या आसपास त्याचा झटपट उपयोग करून घेता येईल, प्रवास होतील, शुभवार्ता समजतील.
दिनांक : २७, २८, ३१, १ शुभ काळ.
महिलांना : अपेक्षित यशासाठी शिकस्तीचे प्रयत्न आवश्यक ठरतील.
कन्या : हिशोब चुकतील, सांभाळा
साडेसातीत मंगळ-शनी एकत्र, सूर्य व्ययस्थानी, मंगळवारचे बुध राश्यांतर व्यवहाराचे ठरवलेले हिशेब केव्हा कसे चुकतील याचा भरवसा नाही. दुसऱ्यांवर विश्वासून आणि मोठय़ा अपेक्षेने नवे प्रयोग करू नका. गुरूची अनुकूलता प्रसन्न शुक्र भ्रमणामुळे कशाही प्रसंगात आपणास निराश होऊ देणार नाही. व्यवहारातले प्रश्न प्रतिष्ठेपर्यंत पोहोचू देणार नाही. त्याचा उपक्रम सुरू ठेवण्यासाठी उपयोग निश्चित होईल. शेती कामात यश मिळेल. अचानक हाती पैसा मिळेल.
दिनांक : २६, २९, ३० शुभ काळ.
महिलांना : आश्वासन आणि प्रलोभन यात अडकलात तर व्यवहार फसतील, सांभाळा.
तूळ : विघ्न येतील, सांभाळा
साडेसाती, अष्टमात गुरू-केतू यांच्यातील प्रत्येक प्रतिक्रिया म्हणजे सुरू असलेल्या उपक्रमांमुळे नवी नवी विघ्नच असते. सावध राहून प्रवास सुरू ठेवला तर अपघात टळतील, पुढे सरकता येईल, त्यात सूर्य, बुध, शुक्र सहकार्य करतील. शनिवारच्या चंद्र-शुक्र नवपंचम योगातून मिळणारा पैसा, समजणारी माहिती प्रयत्नात उत्साह निर्माण करतील. त्यातून बरीच विघ्न दूर करता येतील. कायद्याशी मस्ती मात्र नको.
दिनांक : २७, २८, ३१, १ शुभ काळ.
महिलांना : सतत पाठपुरावा सुरू ठेवा, यश मिळेल.
वृश्चिक : अडचणीचा काळ
वृश्चिक व्यक्तींना ग्रहमान आणि हवामान दोन्ही त्रास देत असणे शक्य आहे. त्यात शनी-मंगळाचा समावेश आहे. बुध-नेपच्यून प्रतियोग आहे. अडचणी ते फसवणूक असे प्रकार कार्यप्रांतात घडून येऊ शकतात. शेतीची बियाणे, खत, औषध यांचाही समावेश त्यात होऊ शकतो आणि अधिकारी ते भागीदार यांचा अडसर निर्माण होऊ शकतो. शुक्रवारच्या शुक्र राश्यांतराचे परिणाम मात्र प्रगतीच्या संधीसाठी लाखमोलाचे ठरतील.
दिनांक : २७ ते ३० शुभ काळ.
महिलांना : पेचप्रसंग टळतील, कार्यभाग साधता येईल.
धनू : मोठी झेप नको
भाग्यात सूर्य, मंगळवारचे बुध राश्यांतर, शनी-मंगळाची थोडी सहानुभूती एवढय़ा भांडवलावर नेहमीचे व्यवहार सांभाळता येतील. पण मोठी झेप घेणे अवघड आहे. गुरू, राहू, केतू, अष्टमात येत असलेला शुक्र, बुध-नेपच्यून प्रतियोग याच ग्रहांचे परिणाम त्यात अडचणी ठरतील. आश्वासन, करार, शासकीय प्रकरणे, आर्थिक देवघेव, आरोग्यावरचे उपचार यासंबंधात सावध राहा. मंगळ-नेपच्यून नवपंचम योग, शोधकार्य, धार्मिक उपक्रम यातून आनंद देतो.
दिनांक : २७ ते ३१ शुभ काळ.
महिलांना : अचूक अंदाज येईपर्यंत साहसी कृती करू नका.
मकर : उत्साही काळ
पंचमात गुरू, लाभात राहू आणि शनी-मंगळातील काही चांगले परिणाम मकर व्यक्तींना कार्यभाग साधता यावा एवढा त्यांचा उपयोग आहे. शुक्रवारचे शुक्र राश्यांतर त्यात उत्साह निर्माण करील. त्यातून महत्त्वाची प्रकरणे पुढे सरकवण्यासाठी सोप्या संधी समोर येतील. प्रवास कराल, पैसा मिळेल, महत्त्वाची खरेदी होईल. तरीही शक्तीबाहेरची कृती करण्यासाठी काळ अनुकूल नाही. मंगळ-नेपच्यून नवपंचम योग पेचप्रसंग संपवणारी प्रक्रिया सुरू करू शकतो.
दिनांक : २९ ते ३१ शुभ काळ.
महिलांना : प्रपंचात लक्ष ठेवा. कलाप्रांतात चमकाल, अर्थप्राप्ती वाढेल.
कुंभ : समन्वयातून व्यापकता
भाग्यातील शनी-मंगळ, सप्तमात सूर्य, मंगळवारचे बुध राश्यांतर आणि मंगळ-नेपच्यून नवपंचम योग याच ग्रहांमुळे कुंभ व्यक्तींना उलाढाली व्यवस्थित करता येतील. संपर्क, चर्चा, भेटी, प्रवास यांचा त्यासाठी समन्वय साधला तर यश व्यापक करता येईल. नवी उद्योगकेंद्र उभारण्याचे ठरवाल. राजकारणातील अभिनव प्रयोग यशस्वी ठरतील. मोठे अधिकारी हाती येतील. परिवारातील प्रश्नांसाठी हुशारीने कृती करावी. स्पर्धा नको.
दिनांक : २७, २८, ३१, १ शुभ काळ.
महिलांना : ठरवलेल्या उपक्रमांना पूर्ण वेळ द्यावा, यश सोपे होईल.
मीन : सामना करावा लागेल
अष्टमात शनी-मंगळ सहयोग असेपर्यंत धावपळ, दडपण, विरोध अशा प्रसंगाशी सामना करावाच लागणार आहे. परंतु गुरूची कृपा, शुक्राची अनुकूलता, राहू भाग्यात यांच्या आधाराने कार्यक्रम फिरवत ठेवता येईल. बाजारपेठेतील शब्दशक्तीचा प्रभाव कोठेही कमी होणार नाही. षष्ठातील रवी शत्रूंचा बंदोबस्त चोख ठेवील. त्याचाही लाभ, कार्यभाग साधण्यासाठी होईल. वाहन जपून चालवा. खिसा, पाकीट सांभाळा, वाद वाढतील अशी कृती टाळा. मंगळ-नेपच्यून नवपंचम योग धार्मिक तपश्चर्येतून आनंद देतो.
दिनांक : २७ ते ३० शुभ काळ.
महिलांना : सरळमार्ग, स्वच्छ कृतीबरोबर निर्दोष यश यांची प्रचीती येईल.

 
<< Start < Prev 11 12 13 14 15 Next > End >>

Page 11 of 15

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो