नवनीत
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत


नवनीत : शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ Print E-mail

इतिहासात आज दिनांक.. : १० नोव्हेंबर
१४८९अकबर बादशाहचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख दिवाण राजा तोडरमल यांचे निधन. त्यांच्या पद्धतीचे अनुकरण पुढील सत्तांनी केले.
१६५९ शिवरायांनी अफझलखानाचे पारिपत्य केले.
१९८२ रशियन अध्यक्ष लिओनीद इलिय्च ब्रेझनेव्ह यांचे निधन. युक्रेन प्रांतात (आता स्वतंत्र देश) १९०६ साली त्यांचा जन्म झाला. क्रांतीनंतर १९२३ मध्ये कम्युनिस्ट यूथ लीगचे ते सदस्य झाले. शेतीशी निगडित अशा प्रश्नांवर ते काम करू लागले. बेलारूस, उरल या भागात त्यांनी कृषीविषयक कामे केली. १९३१ मध्ये ते कम्युनिस्ट पार्टीचे क्रियाशील अधिकृत सदस्य झाले. याच काळात त्यांनी धातुशास्त्रातील आपला अभ्यास पूर्ण केला. १९३८ मध्ये पार्टीच्या प्रचार विभागाचे प्रांतप्रमुख झाले. विभागीय पातळीवर काम करीत असताना कम्युनिस्ट पार्टीचे युक्रेन विभागाचे प्रमुख निकिता क्रुश्चेव्ह यांच्या संपर्कात आले आणि त्यांची मर्जी ब्रेझनेव्ह यांच्यावर बसली. १९४१ ते ४५ या दरम्यान ब्रेझनेव्ह दक्षिणेकडील लष्कराचे राजकीय कोमिसार बनले. युद्ध समाप्तीनंतर त्यात मोल्दाव्हिया येथे पक्षप्रमुख म्हणून पाठविण्यात आले. या भागाच्या सोव्हिएतीकरणाची जबाबदारी  त्यांच्यावर होती. स्टॅलिन यांच्यामुळे ब्रेझनेव्ह पॉलिट ब्युरोचे सदस्य झाले.१९६४ मध्ये ते कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी झाले. क्रुश्चेव्ह यांच्यानंतर त्यांच्याकडे सत्ता चालून आली. १९७० पासून त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच्याच काळात रशियाने आफ्रिका व आशियात स्वत:चा प्रभाव वाढवला.
डॉ. गणेश राऊत  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : विजयनगर साम्राज्याचा विस्तार
alt

विजयनगर राज्याची राजधानी हंपी येथे होती. प्राचीन काळी हंपीचे नाव विरूपाक्षतीर्थ किंवा पंपक्षेत्र असे होते. बल्लाळ तिसरा या होयसाळ राजाच्या मुलाचे नाव विजय विरूपाक्ष बल्लाळ असे होते व त्यावरून हंपीचे नाव विजय विरूपाक्ष होयपट्टण असे ठेवले होते. पुढे या शहराचे नाव विजयनगर असे झाले. हरिहर याला आणखी चार भाऊ होते. त्यांची नावे कंपण्णा, बुक्क, मरप्पा आणि मुद्दप्पा. पैकी कंपण्णाने कडप्पा, नेल्लोर येथे राज्य केले. मरप्पाकडे गोव्याचा अंमल होता तर मुद्दपाकडे कोलारचे राज्य  होते.
कंपण्णा याने मदुराईच्या सुलतानास मारून मदुराईपर्यंत राज्य वाढविले. त्याचा मंत्री गोपण्णाने श्रीरंगमच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हरिहर दुसरा याने कन्नड साहित्यात मोलाची भर टाकली. या काळात विजयनगरचे नाव विद्यानगर असे झाले. लंकेपर्यंत राज्याचा विस्तार झाला. इ.स. १३४७ मध्ये तुंगभद्रेच्या उत्तर तिरावर कलबुर्गी (गुलबर्गा) येथे हसन गंगू बहामनी याने मुस्लीम राज्य स्थापन केले. तुंगभद्रा व कृष्णा या नद्यांमधील प्रदेशासाठी विजयनगर व बहामनी या दोन राज्यांत सतत लढाया होत असत. रायचूर व मुद्गल येथे या लढायांमध्ये विजयनगरने विजय मिळविला. सन १४८५ ते १४९१ एवढा अल्पकाळ साळुव या घराण्याची राजवट विजयनगरवर होती. साळुव घराण्यानंतर तुळुव घराण्याची राजवट सन १४९१ ते १५७० अशी होती. कुळुव घराण्यातील कृष्णदेव राया हा सर्वात अधिक कर्तृत्ववान राजा होऊन गेला. कृष्णदेव रायाची कारकीर्द इ.स. १५०९ ते १५२९ अशी झाली. या काळात विजयनगर  राज्याला साम्राज्याचे स्वरूप आले. विजयनगर  साम्राज्याच्या इतिहासातले हे एक सुवर्णयुग होते.
सुनीत पोतनीस  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : गाडीचा विंडस्क्रीन
गाडी वेगात जात असल्याने तिचे वाऱ्यापासून आणि पावसापासून संरक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. शिवाय हे संरक्षण ज्या पडद्यांमुळे करायचे ते पारदर्शक हवेत, कारण विंडशील्ड अथवा विंडस्क्रीन काय, की मागची काच असो, की बाजूच्या खिडक्या असोत, त्या पारदर्शक हव्यात, त्यातून दिसायला हवे, तरच गाडी सुरक्षितपणे चालवता येते; पण गाडीला जेव्हा अपघात होतो तेव्हा पुढची-मागची काच खळकन फुटते. मुंबईत पडणाऱ्या धुवाधार पावसाने काचेवर पाणी जमते, काश्मीरसारख्या ठिकाणी काचेवर बर्फ जमा होते. या अडचणींवर मात केली नाही तर परत प्रवास असुरक्षित असतो. यासाठी विंडस्क्रीनला असा आकार दिलेला असतो की काचेवरून पावसाचे पाणी आपोआप ओघळून जाईल, पण तरीही काचेवर शिल्लक राहणारा पाण्याचा थर पारदर्शकता बिघडवतो. म्हणून काचेवर वायपर्स आले. त्यांच्या टोकांना बसवलेले रबराचे तुकडे पाणी नीटपणे निपटून काढतात. तसेच हवेतील दमटपणामुळे किंवा बर्फामुळे जाणाऱ्या पारदर्शकतेला उत्तर आले डिफॉगरमुळे. वातावरणातील या शत्रूंना काबूत आणले तरी अपघातात फुटणाऱ्या काचांचे व त्यामुळे ड्रायव्हर आणि आतील प्रवाशांना होणाऱ्या इजेचे काय? त्यासाठी काचा फुटून त्याचे टोकदार छर्रे उडण्याऐवजी अन्य काही उत्तर शोधता आले तर ते हवे होते. मग जर हे तुकडे बिनटोकाचे करता येतील का? ते इजा करणार नाहीत असे त्याचे तुकडे पडतील का? यावर संशोधन झाले व मग त्यातून आली षटकोनी आकारात फुटणारी टेम्पर्ड काच. ही काच फुटताना तिचे टोकदार तुकडे पडत नाहीत. लॅमिनेटेड काचेत दोन थर असतात व ते एकमेकाला चिकटवलेले असतात. ही काच फुटली तरी ती खाली न पडता जागेवरच राहते आणि गाडी गॅरेजला नेईपर्यंत ड्रायव्हरला अडचण पडत नाही. खिडक्यांच्या काचातून ऊन येऊ नये म्हणून त्याला सनफिल्म लावतात. यामुळे आतून बाहेरचे दिसते, पण बाहेरून आतले दिसत नाही, पण अशा फिल्मला पोलिसांची हरकत असते, कारण त्यांना आतून कोण जाते हे समजणे महत्त्वाचे असते.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,
मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : विचारणा आणि आस्थेवाईक विचारपूस
मानस, तुझा ना कधी कधी भलताच राग येतो. लोकांशी बोलता बोलता ते तुला त्यांच्या मनातली गुपितं अशी कशी सांगून टाकतात? तू खेळ करतोस? असं कसं करतोस? मानसवर प्रश्नांची सरबत्ती करीत विचारलं. मानस त्यावर मंद हसला. त्यामुळे आणखी रागावून म्हटलं, ‘हे बरय तुझं! मुद्दामहून सांगत नाहीयेस. ट्रेड सिक्रेट ठेवतो आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी दडवण्यासारखं आहे. सांगायला घाबरतो आहेस. हे कबूल कर बघू!! तरी मानस तसाच मंद हसत राहिला.
‘तुला खूप उत्सुकता वाटतेय, कुतूहल आणि कौतुक वाटतंय. आपल्याला ही मानससारखं बोलता आलं पाहिजे. चटकन संवाद साधता आला पाहिजे, असं वाटतंय. ते माझ्याकडून तुला जाणून घ्यायचंय. म्हणून तू अशी विचारणा करतोयस. इन फॅक्ट मित्रा, तु तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू  ऑलरेडी दिलेलं आहेस.’
पुन्हा कोडय़ात टाकू नकोस. सांगायचं तर सांग, नाहीतर गेलात उडत.. मी रागावून म्हटलं. मानस थोडं गंभीत होत म्हणाला, ‘मित्रा, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत उत्तर दडलेलं असतं. जशी पृच्छा, तसे उत्तर. म्हणजे प्रश्न विचारताना तुझ्या आवाजाचा टोन, बॉडी लँग्वेज यावरून तुझ्या प्रश्नांमागची तुझी अ‍ॅटिटय़ूड लक्षात येत होती. ती अ‍ॅटिटय़ूड क्रिटिकल म्हणजे टीकात्मक होती. क्रिटिकल अ‍ॅटिटय़ूट म्हणजे क्रिटिकल एनक्वायरी. मी अशी क्रिटिकल एनक्वायरी करीत नाही.’
‘नीट सांग ना’ मी म्हटलं. ‘हे बघ तुला प्रश्न विचारण्याच्या दोन मुख्य पद्धती सांगतो. तू वापरतोस ती टीका करण्याच्या उद्देशाने, दुसऱ्याच्या मनातला कुटिल अंतस्थ हेतू शोधून काढण्यासाठी वापरलेली चौकशीची पद्धत म्हणजे क्रिटिकल एनक्वायरी. अपराधी, गुन्हेगार, संशयित व्यक्ती, गुंड आणि लबाड लोकांना अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. यातून समोरच्या व्यक्तीवरचा अविश्वास प्रकट होतो. जणू काही समोरची व्यक्ती खोटं सांगून फसवत्येय असं गृहित धरून प्रश्न विचारले की त्याला क्रिटिकल चौकशी म्हणतात. सीबीआय, सीआयडी पोलिसी यंत्रणामधले लोक अशा पद्धतीचा वापर करताना आपण टीव्ही मालिकात पाहातो. मित्रा, दुर्दैवानं पालक आपल्या मुलांची अशीच उलट तपासणी घेतात. यातून सत्याचा उलगडा होत नाही. फारतर कबुली जबाब मिळतो. मुलांच्या वागणुकीत होकारात्मक बदल तर होत नाहीत उलट पालकांविषयी दुरावा निर्माण होतो.’
 ‘मग दुसरी पद्धत कोणती?’
‘दुसरी पद्धत विचारपूस करणे म्हणजे अ‍ॅप्रिशिएटिव्ह एनक्वायरी. इथे आरोप सिद्ध करणे, चुकांची कबुली मागणे, कचाटय़ात पकडणे असा हेतू नसतो.  उलट, त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध घेतलेला असतो. अमृक कृत्य करण्यामागे कोणती मानसिक कारणं होती? एखादी चूक वारंवार घडण्यामागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न असतो. त्या व्यक्तीवर विश्वास टाकून मन मोकळे करण्याचं आवाहन करता येतं. त्यातून सत्यपरिस्थितीचा हळू हळू उलगडा होतो. समोरची व्यक्ती खोटं बोलू लागली तर तिच्यावर अ‍ॅटक न करता, ती काय प्रकारचं खोटं बोलली, कोणती लबाडी केली यांची शांतपणे, न रागावता, आरोपाती सरबत्ती न करता, प्रश्न विचारता येतात. या प्रक्रियेला वेळ लागतो, पण दुसऱ्या व्यक्तीपर्यंत आपल्या मनातलं सत्य सांगण्याचा अवकाश आणि संधी मिळते. मी तशी संधी देतो म्हणून संवाद घडतो. आता कळलं? ’ मानसनं विचारलं.
तू अ‍ॅप्रिशिएटिव्ह एनक्वायरी केलीस ना! मी हसत म्हटलं.
डॉ. राजेंद्र बर्वे  -  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
नवनीत : शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२ Print E-mail

इतिहासात आज दिनांक.. : ९ नोव्हेंबर
१८७१  आधुनिक असामी साहित्यातील महत्त्वाचे लेखक पद्मनाथ  गोहाहन बरूआ यांचा जन्म. त्यांची आठ नाटके विलक्षण गाजली.
१८९०  पुण्यातील सामाजिक पुढाऱ्यांनी स्वत:हूनच आचरणाचे काही नियम शपथपूर्वक स्वीकारण्याबद्दलचे एक प्रतिज्ञापत्र जाहीर केले. सामाजिक इतिहासातील ही महत्त्वाची घटना होय. लो. टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, नाटककार देवल यांच्या त्यावर सह्या होत्या.
१९७०  फ्रान्सला जागतिक पातळीवर प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करून देणारे फ्रान्सचे नेते चार्लस् द गॉल यांचे निधन. त्यांचा जन्म लिल् प्रांतात झाला. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून लढताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यावर गॉल यांनी केलेले चिंतन हे त्यांनी शब्दरूपाने १९३२ मध्ये ‘द आर्मी ऑफ द फ्यूचर’ या ग्रंथात प्रसिद्ध झाले आहे. या ग्रंथाकडे फ्रान्सने दुर्लक्ष केले आणि जर्मनीने या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास केला. १९४० मध्ये त्यांना जनरल आणि ज्युनिअर वॉर सेक्रेटरी पदी बढती देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला फ्रान्सचे पानिपत झाले. हिटलर फ्रान्सच्या भूमीवर नेतेपदाच्या भूमिकेतून वावरला. युद्धाचे पारडे फिरले. जर्मनी पराभूत झाला. द गॉल फ्रान्समध्ये सत्तेवर आले. सर्व पक्षीयांना एकत्र आणणे ही त्यांच्या पुढील मोठी समस्या होती. पाचव्या प्रजासत्ताकाच्या काळात ते प्रमुख झाल्यावर त्यांत फ्रेंच वसाहतींना मुक्त करण्याचे ठरविले. यातूनच पुढे अल्जिरिया स्वतंत्र झाला. पश्चिम जर्मनीबरोबर त्यांनी संबंध सुधावले. १९६५ मध्ये ते विजयी होऊन पुन्हा सत्ताधीश झाले. त्यांच्या आठवणींचे ३ खंड प्रकाशित झाले आहेत.
प्रा. गणेश राऊत  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : विजयनगर साम्राज्याची स्थापना
हिंदुस्थानवर इस्लामी हल्ले इ.स. १०००च्या आसपास सुरू झाले. उत्तर हिंदुस्थानला त्यांचे हल्ले पहिली तीनशे वर्षे सहन करावे लागले. त्या काळात विद्वान, पंडित व कलाकार लोक दक्षिणेकडील राजे लोकांच्या आश्रयाला आले. पुढे मुसलमान दक्षिणेकडे येऊ लागले. इ. स. १०२६ ते इ.स. १३४३ या काळात होयसाळ घराण्याची सत्ता कर्नाटक व तामिळनाडूचा काही भाग या प्रदेशात होती. होयसाळांच्या पदरी संगमा हा एक सरदार होता. अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने होयसाळ राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले व त्यानंतर मंदिरांची तोडफोड केली. संगमाचा पाच मुलांपैकी हरिहर राया व बुक्क राया हे दोघे बंधू वारंगळच्या राजाकडे प्रथम नोकरीला होते. ते राज्य मुसलमानांनी खालसा केल्यावर ते दोघे होयसाळांच्या राज्यात कपिल देवाकडे कुम्मटा इथे नोकरीला लागले. कुम्मटाचा पाडाव झाल्यानंतर त्या दोघांना कैद करून दिल्लीला नेण्यात आले. तिथे त्यांना दया दाखवून मांडलिकत्वाची शपथ घेऊन  परत पाठविले. परत आल्यावर हरिहर राया व बुक्क राया या दोघांनी विद्यारण्य या आपल्या गुरूंच्या प्रेरणेने १३३६ साली प्रथम अनीगुंदी येथे व नंतर विजयनगर येथे आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली.
प्रथम हरिहर हा गादीवर बसला व त्याच्या नंतर बुक्क राया हा राजा झाला. या संगमा घराण्याची राजवट विजयनगरच्या साम्राज्यात इ.स. १३३६ ते १४८५ या काळात होती. संगमा घराण्यानंतर ‘साळुव’ या घराण्याकडे सत्ता आली. साळुव घराण्याचे राज्य इ. स. १४८५ ते १४९१ असे झाले. त्यानंतर ‘तुळुव’ घराण्याचे राज्य इ.स. १४९१ ते १५७० असे झाले. तुळुव घराण्याचा राजा कृष्ण देवराया याची वीस वर्षांची कारकीर्द हा काळ विजयनगरच्या भरभराटीचा व संपन्नतेचा काळ होता.
सुनीत पोतनीस  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : गाडीची सुरक्षितता

भीमसेन जोशींना एकदा कोणीतरी विचारले होते की, ‘तुम्ही गायक झाला नसता तर कोण झाला असता?’ त्यावर ते म्हणाले होते, ‘मला मोटार मेकॅनिक व्हायला आवडले असते.’ गाडी ते वेगात चालवायचे तरी सुरक्षितपणे चालवायचे. गाण्यामुळे त्यांना लयीचे उत्तम ज्ञान होते. ते एकदा त्यांच्या मेकॅनिककडे गेले आणि म्हणाले, ‘डावीकडचा पुढचा टायर बदल.’ मेकॅनिक गाडी घेऊन एक चक्कर मारून आला आणि म्हणाला, ‘पंडितजी, टायर आताच बदलायची गरज नाही.’ त्यावर पंडितजी त्याला म्हणाले, ‘मला तुझ्यापेक्षा लयीचे ज्ञान अधिक आहे आणि पैसे मी देणार आहे, तू तो टायर बदलून टाक.’
आपल्या वाहनाचे टायर गुळगुळीत (बाल्ड) झालेत का, त्याला किती वेळा पॅच मारले आहेत. टय़ूब किती वेळा पंक्चर झाल्याने दुरुस्त केली आहे, गाडीचे ब्रेक्स नीट लागतात ना, गाडी चालवताना कोणकोणते भाग आवाज करतात, गाडीचे सर्व दिवे नीट लागतात का- विशेषत: ब्रेक लाइट्स, टर्निग लाइट्स, पार्किंग लाइट्स, हॉर्न वाजतो का, गाडीचे दरवाजे नीट उघडतात-बंद होतात का, त्याची इंटरलॉक्स लागतात ना, वायपर्स चालतात का, गाडीचे विंड शिल्ड्स स्वच्छ आहेत ना, गाडीची मागची काच मागचे दिसण्यासाठी मोकळी आहे की तेथे काही सामान ठेवले आहे, गाडीच्या सगळ्या खिडक्यांच्या सगळ्या काचा नीट खाली-वर होतात ना, ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्यासाठी सीट बेल्ट्स आहेत ना (किंबहुना गाडीत बसणाऱ्या सगळ्यांसाठी सीट बेल्ट्स हवेत) आणि ते दोघेही जण ते दरवेळी लावतात ना की पोलीस दिसल्यावर लावतात, गाडीतील सगळ्या सीट्स नीट आहेत ना, गाडी वेळच्या वेळी ओव्हरऑल होते का, गाडी बिघडल्यावर लगेच ती दुरुस्त केली जाते ना, गाडीच्या टायरमधील हवा किमान आठवडय़ातून एकदा तरी तपासली जाते का? या सगळ्या गोष्टी वरवर छोटय़ा दिसल्या, तरी गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी आणि चालकाच्या व आत बसणाऱ्या इतरांच्या सुरक्षिततेसाठी ते फार महत्त्वाचे आहे.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,   मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : ओबामा ओबामा
असा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही, असा राष्ट्राध्यक्ष दहा हजार वर्षांत झाला नाही; अशा हशा, टाळ्या आणखी दहा हजार वर्षे.. आम्हाला सोडून (हशा, टाळ्या) आणखी कोणाला मिळणार नाहीत. पुढील दहा हजार वर्षांत.. इ.आचार्य अत्रे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं भाषण ऐकून, पाहून असंच काही तरी म्हणाले असते, याची खात्री आहे. आणि फॉर वन्स मित्रा, त्यांनी केलेली अतिशयोक्ती कमी आहे, असं वाटलं असतं..
बराक ओबामा यांनी निवडून आल्यानंतर आपल्या निळ्याभोर डेमोक्रॅट पार्टीच्या पाठीराख्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा समस्त मंडळींनी मनापासून अभ्यास करावा. जगातल्या करोडो लोकांनी ते पाहिलं असणार यात शंका नाही. अर्थात, अमेरिकेतील पब्लिक प्लेसमधली प्रत्येक मूव्हमेंट राष्ट्राध्यक्षाकडून गिरवून घेतली जाते, हे तर नक्कीच; परंतु कालच्या भाषणामध्ये ओबामा यांच्या भाषणातल्या कारागिरीपेक्षा स्वयंस्फूर्तीने अधिक बोलले, असं वाटतं.
मुळात, अशा भाषणातून मतदारांचे आभार मानणं, नव्या कालखंडासाठी भरमसाट आश्वासनं देणं आणि विरोधकांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांची व्यक्तिगत पातळीवर खिल्ली उडविणं, भरपूर टाळ्या आणि शाबासकी मिळवणं इतपतच उद्देश समोर ठेवलेला असतो. ओबामा मात्र त्यापलीकडे गेले. ज्या गोष्टी बोलले त्याद्वारे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडले, भावना व्यक्त केल्या ते केवळ अजोड. त्यातले विचार आणि स्वप्नं खास अमेरिकन होते. अमेरिका हा देश केवळ भौगोलिक रिअ‍ॅलिटी नसून तो अभिव्यक्ती, व्यक्तिमत्त्वस्वातंत्र्याचं प्रतीक आहे, असं ठामपणे म्हटलं. ते अर्थातच लोकांना आवडलं. ओबामा यांच्या देहभाषेचं विशेष वाटतं.
मतदारांसमोर येताना, राष्ट्राध्यक्ष पत्नी मिशेल मोठय़ा मुलीबरोबर, तर ओबामा धाकटीबरोबर. (हेदेखील इमेज मेकर्सनी सांगितलं असावं) त्यांच्या चालण्यात आत्मविश्वास होता, त्यापेक्षा कुटुंबमग्नता होती. रविवारी सकाळी चर्चला एकत्रितपणे जाणाऱ्या कुटुंबासारखी ती ‘फर्स्ट फॅमिली’ दिसली. मग स्टेजवर सर्वाना जवळ घेणं आणि त्यानंतर मतदारांना अभिवादन असं करण्यातला विचार विशेष वाटतो. ओबामा यांच्या बोलण्यात सहज आत्मविश्वास, चेहरा ठाम परंतु भावमग्न. त्यांची नजर थेट लोकांपर्यंत पोहोचते. मानेच्या हालचाली सहज होतात. साधारण १५० अंशापर्यंत मान फिरते. विशेष शब्द उच्चारताना ते निमिषभर थांबतात आणि उजवा हात वर उंचावून लोकांपर्यंत ते आपल्या मनातला आत्मविश्वास पोहोचवतात. त्यांचा डावा हात किंचित उंचावला जातो. आपल्या मुद्दय़ाला अधिक ठासून सांगण्याकरिता ते डावा हात वापरतात. त्यांच्या भाषणातली बोलण्याची गती श्रोत्याबरोबर चालते. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना गहिवरून येत नाही; परंतु लोकांचे डोळे पाणावतात. (पहिल्या निवडणुकीनंतर जेसी जॅक्सनचा डोळे पुसणारा चेहरा अद्याप डोळ्यासमोर आहे.) ओबामा कोणालाही शिवीगाळ न करता, अचरट नकला न करता, केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या ठामपणाच्या आधारे लोकांच्या मनाचा ठाव घेतात. भारतीय नेत्यांनो, ऐकताय ना?
डॉ. राजेंद्र बर्वे  -  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
नवनीत : गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२ Print E-mail

इतिहासात आज दिनांक.. : ८ नोव्हेंबर
१८४८ जर्मन गणितज्ञ व ‘आकारिक तर्कशास्त्र’ या शाखेचे जनक गोटलोप फ्रेग यांचा जन्म.१९१९महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ऊर्फ ‘पु.ल.’ यांचा मुंबईत गावदेवी भागातील हेमराज चाळीत जन्म. वडील आबा ऊर्फ लक्ष्मणराव आणि मातोश्री लक्ष्मीबाई यांच्याकडून पुलंना संगीत आणि साहित्याचा वारसा मिळाला. शालेय जीवनापासून पुलं नकला करणे, गाणे म्हणणे, पेटी वाजविणे, नाटकात भूमिका करणे, प्रसंगी नाटुकली लिहिणे, भाषणे करणे आणि ऐकणे या गोष्टी करीत असत. निरीक्षण, भाषाप्रभुत्व, हरहुन्नरीपणा यांमुळे ते बालपणापासूनच लोकप्रिय झाले. बी.ए., एलएलबी, एम. ए. झाल्यावर पुलंच्या प्राध्यापकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. राणी पार्वतीदेवी विद्यालय, कीर्ती महाविद्यालय, मालेगाव शिक्षण संस्था येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. १९४३ मध्ये बडोद्याच्या ‘अभिरुची’ मासिकात त्यांचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले. १९४६ मध्ये सुनीताबाई देशपांडे यांच्याशी रत्नागिरी येथे त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला व पुढे या दाम्पत्याने समाजसेवेचाही आदर्श निर्माण केला. पुलंनी साहित्य, नाटय़, चित्रपट, संगीत या सर्वच क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविला. १९५९ ते १९६१ या काळात भारतातील दूरदर्शनचे पहिले निर्माते या नात्याने त्यांनी ठसा उमटविला. साहित्यात ते अजरामर झाले.
१९८७ पुणे आंतरराष्ट्रीय  मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले. ही राज्यातील पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन.
डॉ. गणेश राऊत  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : होयसाळ कारकीर्द
होयसाळ घराण्याची कारकीर्द इ. स. १०२६ ते १३४३ या कालखंडात कर्नाटक व तामिळनाडूच्या काही प्रदेशांत झाली. प्रथम त्यांची राजधानी बेलूर येथे होती. नंतर त्यांनी हळेबीड येथे राजधानी हलविली. होयसाळ वंशाचे लोक मूळ पश्चिम घाट प्रदेशातले राहणारे होते. त्यांच्यापैकी अरेकल्ल या माणसाने साधारणत: इ.स. ९५० मध्ये एका छोटय़ा वसतीचे किंवा पाडय़ाचे नेतृत्व केले. त्याचा मुलगा मरूग हा त्या प्रदेशाच्या चालुक्य राजांचा मांडलिक झाला. त्यांचे वारस नृपकाम, मुंडा इत्यादींनी त्यांचे छोटे राज्य वाढवूनही चालुक्यांचे मांडलिकत्व चालूच ठेवले. पुढे चालुक्य आणि कलाचुरी या राजांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धाच्या धुमश्चक्रीत होयसाळ राजांनी चालुक्यांचे मांडलिकत्व झुगारून देऊन स्वतंत्र राज्य जाहीर केले.
होयसाळांच्या सुरुवातीच्या राज्यकर्त्यांपैकी साल याने लहानशा तलशरीने वाघावर वार करून जैन गुरू सुदत यांस वाचविले. होय म्हणजे वार करणे. साल राजाने वार केला म्हणून होयसाळ. यावरून या राजवंशाचे नाव होयसाळ झाले. होयसाळ घराण्यातले नृपकर्म दुसरा, होयसाळ विनयदत्त, वीर बल्लाळ पहिला, विष्णुवर्धन, नरसिंह पहिला, वीर बल्लाळ दुसरा हे राजे प्रसिद्धी पावले. विष्णुवर्धनच्या कारकीर्दीत श्रीवैष्णव संत रामानुज यांचा उदय  झाला. रामानुजांनी इ.स. १११६ मध्ये विष्णुवर्धनला वैष्णव पंथ स्वीकारण्याचा आग्रह केला. पण त्याची राणी जैन तर वडील शैव होते. त्यामुळे विष्णुवर्धनने त्यांना नकार दिला. वीर बल्लाळ याने तामिळनाडूत पांडय़ांचा पराभव करून तिथे पाय रोवले. त्याने दक्षिण भागातली त्यांची राजधानी श्रीरंगम् येथे उभारली. चालुक्यांच्या अस्तानंतर ते राज्य देवगिरीचे यादव आणि द्वारसमुद्रचे (हळेबीड) होयसाळ यांच्या विभागले गेले. या गोष्टीचा फायदा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक कपूरने उठवीत १३०७ साली यादवराज्य आणि १३४३ साली होयसाळ राज्य मदुराई येथील लढाईत विजय मिळवून नष्ट केले. बल्लाळ तिसरा हा राजा या युद्धात मारला गेला.
सुनीत पोतनीस  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : दूषित पाण्यामुळे होणारे रोग-२
जैविक घटकांप्रमाणेच जर पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळले गेले असतील तर आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. रासायनिक कारखान्यातून सोडलेल्या पाण्यात काही विषारी मूलद्रव्य असण्याची शक्यता असते.
शिसे : शिसंमिश्रित पाणी आपल्या शरीरात गेल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होतो. लहान मुले आणि स्त्रिया यांना या पाण्यापासून जास्त धोका असतो.
फ्लोराइड हे दातांसाठी उपयुक्त मूलद्रव्य पण जास्त प्रमाणात पाण्यात मिसळले गेले असेल तर दात पिवळे पडतात तसेच पाठीच्या कण्यावर परिणाम होतो.
अर्सेनिक जर पाण्यात असेल तर यकृत, मूत्रपिंड, आतडी मज्जासंस्थेवर परिणाम होतो.
रोग होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून काळजी घेणे जास्त चांगलं असते. दूषित पाण्यामुळे होणारे रोग टाळणे हे बऱ्याच प्रमाणात आपल्या हातात असते. नदी, तळे, तलाव, विहिरी हे पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक महत्त्वाचे स्रोत. पाण्याचे साठे सुरक्षित राहावेत यासाठी आपण बऱ्याच लहान लहान गोष्टी करू शकतो.
सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणार नाही याची काळजी घ्या. बऱ्याच वेळेला पाण्याची पाइप लाइन आणि सांडपाण्याची गटारे एकमेकांच्या हातात हात घालून जातात, त्याची अशी मैत्री असेल तर ती तोडा. आपल्या गावात किंवा शहरात असं चित्र दिसल्यास परिसरातील संबंधित सरकारी यंत्रणेच्या ही गोष्ट लक्षात आणून द्या.
पाण्याच्या साठय़ात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये.
तसेच आपल्या घरातील पाणी आपण सोप्या पद्धतीने शुद्ध करू शकतो.
निवळणे : जर पाणी थोडंसं जरी गढूळ असेल तर त्याला तुरटी लावा. तुरटी पाण्यात मिसळली की मातीतील बारीक कण तळाला बसतात.
गाळणे :  तुरटी लावून निवळलेले पाणी नंतर पांढऱ्या, सुती तीन पदरी कापडानं गाळावं.
उकळणे : पाणी साधारणपणे १५ मिनिटं उकळल्यावर पाण्यातील जीवाणू मरतात. उकळलेले पाणी हा एक सुरक्षित पर्याय आहे. त्याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले क्लोरोव्ॉट हे औषध मिसळले तर उत्तमच. पाणी उकळवून थंड झाल्यावर कॅण्डल फिल्टने गाळावे. त्याची चव पूर्ववत होते.
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,  मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : जे न देखे रवी..
जे न देखे रवी, ते देखे ‘कवी’ या ओळीत गेली अनेक र्वष पाठलाग केलाय. जे सूर्यालाही दिसू शकत नाही. ते कवीला कसं काय बुवा दिसू शकतं? कवीला जे दिसतं. ते मित्रा, तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वकुबाच्या माणसाला दिसेल का? ते रवीला न दिसलेलं ते सत्य असतं की ती केवळ कवीकल्पना, कवीने लढविलेली अक्कल? कवींची ती प्रतिभा म्हणायची की दिव्य दृष्टी? की तर्कट? अशा प्रश्नांची उत्तरं अचानक मिळाली आणि न विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरं मिळाली.
गंमत म्हणजे ही उत्तर साहित्य. साहित्य समीक्षा किंवा मानसशास्त्राकडून मिळाले नाहीत तर ‘मेंदू’ शास्त्रांमध्ये सापडली. पुढे जाऊन असंही म्हणतो की बिघडलेल्या मेंदूच्या अभ्यासातून उत्तरं मिळाली. इथे मांडलेल्या दोन आकृती पाहा. इंग्रजी ५ आणि २ या आकडय़ांनी इथे करामत केली आहे.
‘आकृती १’ मध्ये नीट पाहिलंस तर तुला ‘२’ हा आकडा सापडेल एकाहून अधिक आकडेही दिसतील. काही मित्रांना मात्र शोधायला वेळ लागेल. स्वत:वर करून झाल्यावर हा प्रयोग इतरांवर करण्यापूर्वी स्टॉप वॉचचा वापर केलास तर तुझ्या कुटुंबीयांचे मित्र-परिवाराचं डोकं कसं चालतं? किंवा किती झपाटय़ानं काम करू शकतं? याचा अंदाज येईल. आता दुसरी आकृती (आकृती २) पाहा. इथेदेखील ‘२’ आकडे दिसतील आणि मोजून पाच सेकंदांनी दोन आकडय़ांनी एक त्रिकोण (उलटा) तयार केल्याचं लक्षात येईल. पुन्हा पाहा बरं.. दिसला ना त्रिकोण? जास्त वेळ लागला नाही ना? नाऊ, गो बॅक टू ‘आकृती १’ . इथेदेखील ‘२’ या आकडय़ांनी त्रिकोण तयार केलाय. नीट पाहा. वरून तिसऱ्या लाइनमध्ये सलग ‘२’ हा आकडा तीन वेळा दिसेल. तो त्रिकोणाचा पाया.. बाकीचे ‘२’ आकडे शोध म्हणजे त्रिकोण पूर्ण होईल. या गोष्टीला नक्कीच अधिक वेळ लागला. होय ना?
आता या प्रयोगाचा रवी-कवीशी काय संबंध? मेंदू शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास आणि संशोधन करून मेंदूच्या विशिष्ट केंद्रामध्ये अशा दृष्य अनुभवाचं विश्लेषण केलं जातं, ते (केंद्र) कोणतं ते शोधून काढलं त्यांच्या लक्षात आलं की ‘आकृती १’ मधला त्रिकोण पटकन दिसत नाही आणि ‘आकृती २’ मधला दिसतो कारण ‘आकृती २’ मध्ये दोन हा आकडा अधिक ठळक रंगात आहे त्या मानाने पाच आकडा फिकट आहे. तर ‘आकृती १’ मध्ये ५ आणि २ यांचा ठळकपणा सारखाच आहे. परंतु नीट लक्ष दिल्यास चाणाक्षपणे निरीक्षण केल्यास ‘आकृती १’ मधला त्रिकोण दिसू शकतो. मेंदूच्या त्या विशिष्ट केंद्राला इजा झाली तर मात्र त्रिकोण हुडकणं कठीण होतं आणि भरपूर सराव केला आणि मेंदूला काळजीपूर्वक पाहण्याचं प्रशिक्षण दिलं तरीदेखील हे त्रिकोण पटकन सापडू शकतात. काही लोकांना मात्र ‘आकृती १’ मधला त्रिकोण कोणी सांगण्याआधीच दिसतो! हेच ते कवी!! मेंदू-मेंदूमध्ये फरक असतो, क्षमतांमध्ये फरक असतो, तो असा. मेंदूतल्या अशा तथाकथित कमतरतेवर प्रशिक्षणाने मात करता येते, आहे की नाही, गंमत!
आता हा खेळ कोणाकोणाबरोबर खेळणार? अ‍ॅण्ड बी रेडी फॉर सरप्राइजेस!!
डॉ. राजेंद्र बर्वे  -  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
नवनीत : बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२ Print E-mail

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
इतिहासात आज दिनांक.. ७ नोव्हेंबर
१८८४- डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा पालकवाडी (जि. वर्धा) येथे जन्म. आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले क्रांतिकारक, आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ अशी त्यांची कारकीर्द होय. लो. टिळकांच्या सांगण्यावरून ते लष्करी शिक्षण घेण्यासाठी जपानला गेले. हे शिक्षण उत्तम पद्धतीने पूर्ण करून अमेरिकेत गेले. कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन या दोन विद्यापीठांमधून त्यांनी शेतकीचे शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत असतानाच मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी तेथेच ‘इंडियन इंडिपेंडंट पार्टी’ स्थापून विदेशातील क्रांतिकारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या महायुद्धाच्या धामधुमीचा फायदा घेऊन त्यांना मोठय़ा प्रमाणावर ब्रिटिशविरोधी आघाडी संघटित करण्यास सुरुवात केली. परंतु  फितुरीमुळे इंग्रज सरकारच्या गुप्तहेरांना या कार्याचा सुगावा लागला. इंग्रज मागावर असताना डॉक्टर त्यांची दिशाभूल करून इराणला निघून गेले. तिथे काही काळ शांततेत घालवून ते युरोपला परतले. युरोपच्या विविध देशांत व विशेषत: मेक्सिकोत त्यांनी स्थायिक होऊन कृषिसंशोधन केले. तेथील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सने त्यांचा गौरव केला. १९६७ मध्ये नागपुरात ते निधन पावले.
१९०५आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे निधन.
१९१३ महान फ्रेंच साहित्यिक आल्बेर कामू यांचा अल्जिरियातील माँडॉव्ही येथे जन्म.
प्रा. गणेश राऊत  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : शिल्पकलेचे आश्रयदाते राष्ट्रकुट
आठव्या शतकात चालुक्य घराण्याचा ऱ्हास झाला. त्यानंतर कर्नाटकात दंतीदुर्ग याने ७५७ मध्ये राष्ट्रकुट नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजघराण्याची स्थापना केली. संपूर्ण कर्नाटकवर राज्य करणारे ते पहिलेच साम्राज्य होते. कर्नाटक राज्याचा विस्तार करण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक यशस्वी स्वाऱ्यांमुळे हा राजवंश प्रसिद्धी पावला. त्यांचा दबदबा रामेश्वरपासून दिल्लीपर्यंत होता. दंतिदुर्गाचा उत्तराधिकारी पहिला कृष्ण याने जगातील आश्चर्यापैकी एक म्हणून मान्यता पावलेल्या व खडकात कोरून काढलेल्या वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती केली. मान्यखेत म्हणजेच आजचे गुलबर्गा येथे त्यांची राजधानी होती.
तिसरा गोविंद या राजाने विंध्यच्या उत्तरेस व दक्षिणेस स्वाऱ्या करून प्रतिहार व पाल यांचा पराभव केला. अमोघ वर्ष नृपतुंग या विख्यात राजाने ६५ वर्षे राज्य केले. नृपतुंग हा निष्ठावान जैन होता. तो युद्धांच्या विरुद्ध होता. त्याने कवी व तत्त्वज्ञ यांना राजाश्रय दिला. ‘कविराज- मार्ग’ हे कन्नडमधील प्राचीन महाकाव्य नृपतुंग याचा राजकवी श्रीविजय याने लिहिले. तिसरा कृष्ण या राजाने चोळांचा पराभव करून रामेश्वपर्यंत धडक मारली. राज्याचा विस्तार आणि ललितकलांची प्रगती या दोन्हींमुळे त्याची राजवट वैशिष्टय़पूर्ण झाली. राष्ट्रकुट राजांचा कल जैन धर्माकडे असला तरी त्यांनी शिव व विष्णू या दोन्ही देवांची मंदिरे बांधून उपासनेच्या लोकप्रिय पद्धतींना उत्तेजन दिले.
राष्ट्रकुटांच्या कारकीर्दीत दोन जगप्रसिद्ध शिल्पे घडली. वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिराने व्यापलेले क्षेत्र अ‍ॅथेन्समधील जगप्रसिद्ध पार्थेनान इतके मोठे आहे, पण कैलास मंदिरांची उंची पार्थेनानच्या दीडपट आहे, तसेच राष्ट्रकुटांनी घडविलेल्या घारापुरी (एलिफंटा) गुंफांमधील महेशमूर्तीचे आकारमान प्रचंड (२३ फूट उंच व २० फूट रुंद )आहे. या दोन्ही शिल्पांचे नाव जागतिक श्रेष्ठ कलाकृतींमध्ये घेतले जाते.
सुनीत पोतनीस  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : दूषित पाण्यामुळे होणारे रोग - १
alt

पाणी म्हणजे जीवन हे घोषवाक्य आपण भित्तिपत्रकावर, पुस्तकात नेहमी बघतो. हेच पाणी कधी कधी आपलं जीवन संपवण्यास कारणीभूत होऊ शकतं. दूषित असलेले पाणी जर एखाद्या व्यक्तीने प्यायलं तर त्याच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. त्या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागते, ती व्यक्ती आजरी आहे असं आपण म्हणतो. पाणी मुख्यत: जैविक घटकांमुळे दूषित होते.
पटकी : व्हायब्रिओ कॉलेरा जीवाणूमुळे पटकी हा रोग होतो. पावसाळ्यात फैलावणारा हा एक मुख्य रोग. या रोगात पचनसंस्थेवर परिणाम होतो. पायात गोळे येतात, डोळे खोल जातात, चेहरा निस्तेज होतो, वारंवार शौचाला जावं लागतं, शौच भाताच्या पेजेसारखं हिरवट पातळ असतं. शरीरातून जास्त प्रमाणात पाणी गेल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीरातील पाणी कमी होणे प्राणघातक असते. या रोगात पेशंटला जलसंजीवनी देणे हितकारक असते. एक लिटर पाण्यात एक मूठ साखर आणि एक चिमूटभर मीठ घातलं की जलसंजीवनी तयार होते. जलसंजीवनी एकदम न घेता थोडय़ा थोडय़ा वेळाने पिण्यास द्यावे, पटकी प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. या लसीमुळे कॉलराच्या जीवाणूपासून सहा महिने संरक्षण मिळते. विषमज्वर : सालमोनिका टायफी या जीवाणूमुळे विषमज्वर हा रोग होतो. दोन ते तीन आठवडे सतत ताप येणे, अशक्तपणा जाणवणे, भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, ही या रोगाची लक्षणे आहेत. विषमज्वर झालेल्या व्यक्तीचे मल किंवा उलटी पिण्याच्या पाण्यात मिसळले गेले आणि ते पाणी निरोगी व्यक्तीने प्यायले किंवा सांडपाण्यावर पकवलेल्या कच्च्या भाज्या खाल्या तर व्यक्तीला विषमज्वर होतो. डॉक्सिसायक्चीन, क्लोरोमायसिटीन ही प्रतिजैवके विषमज्वर या रोगावर उपयुक्त आहेत.
कावीळ : कावीळचे विषाणू मलमुत्रातून पाण्यात मिसळतात आणि काविळीची साथ पसरते. काविळीमध्ये रक्तात बिलुरुबीनचे प्रमाण वाढते. ताप येतो, मळमळते, उलटय़ा होतात, लघवी पिवळसर लाल होते. या आजारापासून प्रतबंध होण्यासाठी कावीळ झालेल्या व्यक्तीचे कपडे, भांडी उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवून मग धुवावीत, तसेच प्रतिबंधात्मक लस घेणे हिताचे आहे.
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. भाषेची गम्मत जगण्यातली जम्मत
जगण्याबद्दल आणि जीवनाविषयी आसक्ती ऐवजी जिज्ञासा वाटू लागली ना मित्रा, की आयुष्य बदलून जातं. जगण्याविषयी उत्सुकता म्हणजे जगणाऱ्या माणसांविषयी कुतूहल. कोण कसा जगतो? त्यानं तसं जीवन का निवडलं याविषयी कोणताही अभिनिवेश न बाळगता विचार केला की आपला स्वत:विषयीचा दृष्टिकोन बदलतो. आपण अधिक सजगपणे जगतो, जगण्याचा ना कंटाळा येत, नाही त्यात मन गुंतूनही राहात.
जगण्यातल्या या गमतीजमती शोधण्याकरता भाषेचा अभ्यास करायला ही गंमत वाटते. भाषेतल्या म्हणी नि वाक्प्रचार यांच्याकडे विश्लेषक नजरेनं पाहिलं की त्या समाजाविषयी अधिक माहिती कळते. उदा. पूर्वी आपल्याकडे परीक्षा देणे याला मांडवाखालून जाणे असा वाक्प्रचार होता. परीक्षेचा नि मांडवाचा काय संबंध? लग्नाचे मांडव आपल्याला निदान alt
ऐकून माहिती आहेत, पण परीक्षेचे? मित्रा, पूर्वी परीक्षेला बसण्यासाठी वर्गाची आणि बंद खोलीची सोय नव्हती, त्यामुळे मांडवात मॅट्रिकच्या परीक्षा घेतल्या जायच्या. त्यामुळे लग्नाच्या मांडवात शिरण्यापूर्वी परीक्षेच्या मांडवातून जावं लागायचं. त्यासाठी परीक्षेत पास व्हावं, अशीही अपेक्षा नव्हती. त्यामुळे मांडवाखालून ‘नॉन मॅट्रिक’चा शिक्का घेऊन बाहेर पडलात तरी पुरे. ‘तारांबळ’ उडणे असा शब्दप्रयोग ऐकला असशील, होय ना? हे तारांबळ आलं कुठून? लग्नात मंगलाष्टके म्हणताना तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं, ‘चंद्रबलं तदैव’ अशा शेवटच्या चरणापाशी आलं की एकच घाई उडत असे. त्या ताराबलंच तारांबळ आणि लग्नासाठी मुलीचं नशीब बलवत्तर म्हणजे उत्तम चंद्रबळ!
मराठीतल्या अशा गमतीजमती ऐकून ठाऊक असतात. इंग्रजीतल्या, ‘लॉजिंग बोर्डिग’विषयी खूप कुतूहल होतं. लॉजिंग म्हणजे राहण्याची सोय नि बोर्डिग म्हणजे जेवणाची सोय. नि बोर्डिग स्कूल म्हणजे राहून, जेवून, खाऊन शिक्षणाची सोय करणाऱ्या शाळा. त्यांचा शिस्तीशी नंतर संबंध आला. परगावातल्या लॉजवर राहाणाऱ्यांना बोर्डर म्हणायचे. हे ठीकाय, पण कंपनीमधल्या स्वच्छ
व्यवहाराला अबव्ह बोर्ड का म्हणायचं? पैसे ‘खाण्या’शी संबंध नाही म्हणून?
एके दिवशी कोडं उलगडलं. ‘मध्ययुगातल्या लोकांच्या जेवणाच्या सवयी’ यावर वाचता वाचता बोर्डाचा संबंध लक्षात आला. पूर्वी आताच्या सारखी डायनिंग टेबलं नव्हती. म्हणजे आडव्या फळकुटाला चतुष्पादांसारखे चार पाय लावले तर स्थिर राहाणारी वस्तू तार करता येते. त्या आडव्या पृष्ठभागावर डिश ठेवून जेवता येतं हा शोध माणसाने लावलेला नव्हता. (कमाल आहे ना?) त्यामुळे जेवणारी माणसं फळकुटं मांडीवर अथवा गुडघ्यावर घेत, त्या फळकुटाना ‘बोर्ड’ म्हणत असत. त्यामुळे जेवायचं तर फळकुटं हवीत. जेवणारा माणूस आपापल्या फळकुटांची सोय लावी. पुढे जेवणं म्हणजे ‘बोर्डा’चा वापर आणि नंतर जेवण  म्हणजे ‘बोर्डिग’ असा शब्दप्रयोग तयार झाला. त्यात काही लबाड माणसं अन्न आपल्या फळकुटाखाली लपवायचे. त्यामुळे जेवताना आपले दोन्ही हात फळकुटावर म्हणजे बोर्डवर ठेवले की ते लोक अबव्ह बोर्ड म्हणजे प्रामाणिक! बोर्ड या शब्दाचा उपयोग कंपन्यांच्या संचालनात होऊ लागला, त्यामुळे बोर्ड म्हणजे अधिकारी वर्ग, शासनकर्ते असा अर्थ तयार झाला.
मी म्हटलं ना, भाषेच्या अशा वापरातून जीवनपद्धतीची माहिती मिळते. अरे, अशीच गम्मत असते, त्याला हाय फंडा नॉलेज हवे, असेच काही नाही!
डॉ. राजेंद्र बर्वे  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
नवनीत : मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२ Print E-mail

इतिहासात आज दिनांक.. : ६ नोव्हेंबर
१९०३पनामाच्या स्वातंत्र्याला अमेरिकन सरकारने मान्यता दिली.  १९२५मॅडेलिन स्लेड ऊर्फ मीराबेन भारतात- मुंबईत म. गांधी यांच्या भेटीसाठी आल्या.
ब्रिटिश नौदल अधिकाऱ्याची ही कन्या गांधीविचारांनी प्रभावित होऊन भारतात आली. २५ ऑक्टोबर १९२५मध्ये त्यांनी ‘पी अँड ओ’ जहाजावरून प्रवास सुरू केला. मुंबईत उतरल्यावर दादाभाई नौरोजी यांचे वारस आणि महात्मा गांधीजींचे पुत्र देवदास गांधी यांच्याशी त्यांची भेट झाली. ७ नोव्हेंबरला त्या साबरमतीस पोहोचल्या. वल्लभभाई पटेल त्यांना घेऊन महात्माजींकडे गेले. अगोदरच पत्रव्यवहार झाला होता. गांधीजी त्यांना म्हणाले, ‘इथून पुढे तू माझी
मुलगी म्हणून आश्रमात राहशील.’ पुढे त्यांनी आपले सारे आयुष्यच भारताच्या सेवेत घालविले. त्यांनी आत्मकथा इंग्रजीत लिहिली. ‘दि स्पिरिट्स पिल्ग्रिमेज’ या नावाचे आत्मचरित्र गाजले. त्याचा हिंदी अनुवाद ‘एक साधिका की जीवन-यात्रा’ या नावाने रामनारायण चौधरी यांनी केला. कस्तुरबांना भेटण्यासाठी त्या गांधीजींबरोबर रसोईघरात गेल्या. कस्तुरबा मीराबेनच्या पायांकडे बघत होत्या. मीराबेन यांच्या पायांत बूट होते. गांधीजींनी मीराबेन यांना भारतीय संकेत समजावून सांगितला. त्या बाहेर गेल्या व बूट काढून आल्या. ‘हा पहिला संस्कार’ असे त्या म्हणतात. २००२स्वत:च्या सुवाच्य अक्षरांतून हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे नाशिक येथे निधन.
प्रा. गणेश राऊत - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : सातवाहन साम्राज्य
प्राचीन भारतातील मोठय़ा साम्राज्यांपैकी एक सातवाहन साम्राज्य होते. इ. स. पूर्व २३० मध्ये स्थापन झालेले हे राज्य इ. स. २२० पर्यंत हिंदुस्थानातील फार मोठय़ा क्षेत्रावर पसरलेले होते. सिमुक हा मौर्य साम्राज्यातला एक सरंजामदार. मौर्याच्या अस्तानंतर सिमुकाने स्वतंत्र राज्य स्थापन केले. सिमुकने पूर्व भारतात गोदावरी व कृष्णा नद्यांमधील प्रदेशात स्थापन केलेले हे राज्य ४५० वर्षे टिकले. सिमुकच्या वंशाला आंध्र भृत्य, सालवाहण, सातवाहन, शालिवाहन  अशी नावे होती. सिमुक हा मद्रासमधला राहणारा होता व तो आर्य नसून सुधारलेला द्रवीड ब्राह्मण होता. सातवाहन साम्राज्याची चार मुख्य राजधानीची
शहरे होती. आंध्र प्रदेशातील अमरावती, धरणीकोट व महाराष्ट्रातील जुन्नर व प्रतिष्ठान (पैठण) येथून हा कारभार चालत असे. पुढे पश्चिम समुद्रापर्यंत विस्तार झाल्यवर प्रतिष्ठान (पैठण) येथे त्यांनी राजधानी केली. सातवाहन राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. होम हवन, वेद पठण हे नेहमी चालत असे. राजा सतकर्णी याने अश्वमेध यज्ञ केला होता. सातवाहन राजांचे विशेष म्हणजे त्यांच्या नावात आईचा संबंध जोडलेला असे. जसे गौतमीपुत्र, वासिष्ठीपुत्र,
हरीतीपुत्र वगैरे. त्यांच्या राज्यातून माकडे, मोर व हस्तीदंत निर्यात करीत. सोपारा व कारवार ही त्यांची बंदरे होती. सातवाहनांचे मोठे कार्य म्हणजे त्यांनी शक, यवन वगैरे परकियांची आक्रमणे थोपविली. गौतमीपुत्र शालिवाहन याने इ. स. ७८ मध्ये शकांचा पराभव करून त्यांना पळवून लावले. त्यानिमित्त त्याने शालिवाहन शक संवत सुरू केला. सतकर्णी शालिवाहन राजाने ५६ वर्षे राज्य केले. त्याने माळवा प्रांत जिंकून साम्राज्यात जोडला. तसेच कलिंग घेतले. त्यांच्या नाण्यांवर एका बाजूला राजांच्या प्रतिमा छपाईची पद्धत सुरू केली. त्याने दक्षिण पूर्व आशियामध्ये प्रथम हिंदू संस्कृती पोहोचवली. त्यांनी नंतर बौद्ध धर्मालाही राजाश्रय देऊन जुन्नर, वेरुळ येथे लेणी खोदली व स्तूप, विहार उभारले. सातवाहन राजांच्या अस्तानंतर इ. स. २२० नंतर त्यांचे राज्याचे लहान-लहान तुकडे झाले.
सुनीत पोतनीस - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : दूषित पाणी प्यायल्यामुळे प्राण्यांना होणारे रोग

स्वच्छ, शुद्ध असले पाहिजे हे आपण शाळेत असल्यापासून शिकतो. आपल्या घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी गाळून घेणे, उकळून घेणे, त्यात क्लोरोवॅटसारखे द्रवपदार्थ घालणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आपण करतो. माणसाप्रमाणेच इतर प्राण्यांनासुद्धा शुद्ध पाण्याची गरज असते. गाय, बल हे किंवा इतर कोणतेही प्राणी पाण्यावर विविध प्रक्रिया करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना जे पाणी मिळेल तेच पाणी पिऊन त्याची तहान भागवतात, परिणामी दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगांना बळी पडतात. दूषित पाणी प्यायल्यामुळे कोंबडय़ा, कावळे असे पक्षी किंवा गाय, बल, शेळ्या, मेंढय़ा अशा जनावरांना माणसाप्रमाणेच पटकी, हगवण रोग असे रोग होतात. असे रोग झाल्यास पक्षी किंवा जनावरे उदास होतात. नेहमीप्रमाणे पंख स्वच्छ करणे किंवा जिभेने स्वत:चे शरीर स्वच्छ करणे या क्रिया करण्याचा त्यांना उत्साह राहत नाही. हिरवट पिवळ्या रंगाची विष्ठा होते. पाण्यातील जिवाणू, विषाणू
यांसारख्या जैविक घटकांमुळे हगवण किंवा पटकी असे रोग होतात, तसेच पाण्यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे काही रोग होतात. रासायनिक प्रदूषणामुळे पाण्यात शिसे किंवा पारा मिसळलेले पाणी प्राण्यांच्या शरीरात गेल्यास त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो. आकडी येणे, लाल रंगाची लघवी होणे ही याची लक्षणे आहेत. ऑरगॅनो फॉसफेट, ऑरगॅनो क्लोरेट अशा प्रकारची कीटकनाशके पाण्यात मिसळले गेले तर जनावरे मलूल होतात, जास्त ऊठबस करीत नाहीत, स्वस्थ बसून राहतात. तोंडातून लाल गळते. पाण्यातील विषारी घटकांचा बेडकांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. काही
रासायनिक मूलद्रव्यांमुळे पाण्यातील शैवालची प्रचंड वाढ होते. अशा प्रकारचे शैवाल प्राण्यांच्या खाण्यात आले तर त्यांना घातक आजार होऊ शकतात, त्या
आजारातून प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी आपण हे करू शकतो. पाण्याचे साठे स्वच्छ ठेवू या! स्वत:ची आणि इतर सजीवांची काळजी घेऊ या!
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी , मुंबई २२ This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : ऱ्हाइनस्टोन काऊबॉय
काळ १९७५ चा बेबी बूमर्सची पोरं टोरं आता वयात आलेली. स्वप्न भन्नाट, बीटल्सची गाणी, संगीत आणि बेधुंद जग यात हरवलेली तरुण पिढी. त्यांच्या जीवनात फक्त मुक्ततेला स्थान होतं. अशा अख्ख्या पिढीला प्रचंड वेड लावणारे अनेक गायक होते. त्यांच्या गाण्यात साध्या भोळ्या प्रेमावर विश्वास होता, जगात शांतता नांदावी, युद्ध बंद व्हावीत, माणसान्ांी गाणी गात ऐकत मदहोषीत जगावं; परंतु, मित्रा अशा पिढीवर राज्य करण्यासाठी संगीतकारांना प्रचंड धडपड, मेहनत आणि खस्ता खाव्या लागल्या होत्या. यशाची ओढ, प्रसिद्धीची चटक, ग्लॅमरचं वेड उरात आणि प्रेमाच्या गाणी कंठात घेऊन ब्रॉडवेवर गाण्यासाठी धडपडणारे शेकडो तरुण रेकॉर्डिग स्टुडिओ आणि संगीत कंपन्यांच्या दाराबाहेर बसून असायचे. अशा सर्व स्ट्रग्लर्सकरिता आणखी एका स्ट्रग्लरने गाणं म्हटलं होतं. ‘ऱ्हाइनस्टोन काऊबॉय’ नावाचं गीत, ग्लेन कॅम्बलनं गायलं आणि अनेक अ‍ॅवॉर्ड आपल्या नावावर केली. आपल्या रत्नजडित खोगिरावर पकड ठेवून तो यशाच्या वाटेनं ‘रोडिओ’सारखी कसरत करत घोडदौड करतो, त्याचं गाणं..
या वाटा सर्वकाळ
तुडवल्या आहेत सांजसकाळ
गात गात तीच गाणी
जुनी विराणी
अशी खडकाळलेली ही वाट
खळगे नि खाचा मला पाठ
क्योंकी ये है ब्रॉडवे का रास्ता
मांडवली नि सेटिंग इथला शिरस्ता
सरळ, सज्जन, साधे भोळे
वाहून जातात बघता बघता
जसं बर्फ, पाऊस, पाणी
मेरी मंझिलकी इस राहपर
हाय! कांटे फैले रस्ताभर
तरी पोचेन मी ब्रॉडवेवर
प्रकाशाचा फोकस आहे प्रखर
नि प्रसिद्धीचा झोत झगझगीत
माझ्यावर, येस फक्त माझ्यावर
चढवून खोगीर रत्नजडित
क्षितिजावर, घोडेस्वार
दौडत जाय दौडत जाय
ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय, ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय
केवढी फॅनमेल, केवढी आवतणं
चाहते माझे आहेत सर्वजण
‘प्लीज करा हो गाणं रेकॉर्ड माझ्याकडे’
फोनवर ही कोणी धडपडे!
तसं बिघडत नाही म्हणा फारसं
पाऊस कोसळला म्हणून
आणि वेदनेचं केलं हसं
तर ती ही जाते छपून
पण आपण गाठलेली गाडी जेव्हा
फार अवघड वळसा घेते तेव्हा
अवसान आपलं अशा वेळी
ठेवावं तरी कसं जपून?
मग आपल्या स्वप्नात भरून रंग
त्यामध्ये मी होतो दंग
.लोकलगाडीचं चुरगळलेलं तिकीट सोबतीला
आणि एखादा डॉलर बुटात दडवलेला
तरी पोचेनच तिथवर
ब्रॉडवेवर
प्रकाशाचा फोकस आहे प्रखर
प्रसिद्धीचा झोत झगझगीत
माझ्यावर येस फक्त माझ्यावर
ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय
दौडत जाय, दौडत जाय
ऱ्हाइनस्टोन काऊ बॉय
डॉ. राजेंद्र बर्वे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गाण्याचा स्वैर अनुवाद : ललिता बर्वे

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 1 of 4

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो