नवनीत
मुखपृष्ठ >> नवनीत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत
Print E-mail

शनिवार, ३ नोव्हेंबर
इतिहासात आज दिनांक.. ३ नोव्हेंबर
१६८९ स्वराज्याची राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेली.
१७९९ युरोप, आफ्रिका, आशिया खंडात पराक्रम गाजवलेले ब्रिटिश सेनापती सर हय़ू गॉफ यांचा जन्म. बॅरोनेट किताब, भारताचे सरसेनापतिपद आणि ग्वाल्हेरच्या शिंद्यांचा पराभव यामुळे ते भारतात गाजले.
१९३३अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचा शांतिनिकेतन (पश्चिम बंगाल) येथे जन्म. कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज व केंब्रिजचे ट्रिनिट्री कॉलेज येथून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. १९६३ ते ७१ या कालखंडात ते दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये १९७१ ते ७७, ऑक्सफर्ड विद्यापीठ १९७७ ते ८८ व हार्वर्ड विद्यापीठ १९८८ ते ९८ येथे त्यांनी अध्यापन केले. दारिद्रय़, दुष्काळ, भूक, आरोग्य, आर्थिक विकास, मानवी चेहरा असणारे अर्थशास्त्र या विषयांवर त्यांनी भर दिला. ‘पॉवर्टी अँड फेमिन्स’ या ग्रंथाने त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. १९८९च्या सुमारास ‘हंगर अँड द पब्लिक अ‍ॅक्शन’ हा त्यांचा जीन ड्रेझ यांच्याबरोबरचा अभ्यासही गाजला. मानवी विकास निर्देशांकासंदर्भात त्यांनी मूलभूत कार्य केले. ‘थिअरी ऑफ हाऊसहोल्ड’ मध्ये त्यांनी अर्थप्रक्रियेत स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीवर टीका केली.
डॉ. गणेश राऊत  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : ओटोमन साम्राज्याचा अस्त
तुर्कस्तानच्या ओटोमन साम्राज्यातील सुलतानांपैकी सुलेमान याची कारकीर्द सर्वात वैभवशाली झाली. ओटोमन साम्राज्याखालील भूप्रदेश त्याने आधीच्या दुप्पट वाढविला. ओटोमन सैन्यदल अत्यंत विस्कळीत होते. सुलेमानने चौदाव्या शतकात त्याची नीट बांधणी केली. त्याने गुलाम, भाडोत्री सैनिक आणि नवीन तरुण यांच्यातून सैनिक भरती करून त्यांना पद्धतशीर सैनिकी शिक्षण दिले. त्यांना वेतन नक्की करून दिले. या सैनिक दलाला ‘जानीसेरीज’ म्हणत. ‘कॅपीकुल्ली’ हा तोफखाना सुरू केला. हे केल्यावर युद्धांमध्ये मोठे विजय त्याने संपादन केले. सुलतान सुलेमानच्या राजवटीत ओटोमन साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला होता. उत्तरेकडे हंगेरीपासून दक्षिणेकडे एडनपर्यंत, पश्चिमेला अल्जिरियापासून पूर्वेस इराणपर्यंत असा मोठा भूप्रदेश त्यांच्या साम्राज्यात होता.
ओटोमन सुलतानांच्या या तडाख्यामुळे पूर्व युरोपीय राज्ये संकटात आली. सन १५६६ मध्ये सुलेमानचा मृत्यू झाल्यावर ओटोमन साम्राज्याची ओहोटी सुरू झाली. त्याचे एक कारण म्हणजे पोर्तुगालने शोधून काढलेला हिंदुस्थानकडे जाण्याचा जलमार्ग हे होते. तोपर्यंत महत्त्वाचे व्यापारी रस्ते ओटोमन साम्राज्यातून जात होते व त्यामुळे त्यातून उत्पन्न मिळत असे. ते बंद झाले. सुलतान सुलेमाननंतर आलेले सुलतान दुर्बळ निघाले. दक्षिण अमेरिकेतून स्पेनने मिळविलेल्या चांदीमुळे ओटोमनच्या अक्का या चलनाची किंमत कमी झाली. युरोपीय नाविक सत्ता प्रबळ होऊन स्पेनचा राजा फिलीप दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली सर्व कॅथलिक देश एकत्र आले. १६८३ साली व्हिएन्ना येथे युरोपीय देशांशी झालेल्या युद्धात ओटोमनांचा पराभव झाला. पहिल्या महायुद्धात ओटोमन सुलतानांनी जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया या युतीला पाठिंबा दिला होता. महायुद्धात ब्रिटिशांनी इराक, सीरिया व इजिप्त घेतला. इटालीने लिबिया घेतला. फ्रान्सने अल्जिअर्स, उत्तर आफ्रिका घेतले. ग्रीस, सर्बिया, रोमानिया यांनी स्वत: स्वातंत्र्य घोषित केल्याने ओटोमन साम्राज्यातला फक्त तुर्कस्थानची मुख्य भूमी एवढाच प्रदेश राहिला. पुढे १८२३ मध्ये तुर्की पुढारी मुस्तफा केमाल पाशा याने सर्व सत्ता ताब्यात घेऊन तुर्कस्थान प्रजासत्ताक जाहीर केले. केमाल पाशा प्रजासत्ताकाचा अध्यक्ष झाला.
सुनीत पोतनीस  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : विंचू दंश
alt

विंचू हा संधिपाद या गटातील आठ पाय आणि नांगी असलेला प्राणी. नांगी म्हणजे विंचवाची संरक्षक ढाल. िवचवाच्या शेपटाकडील फुगीर भागात दोन मोठय़ा विषग्रंथी असतात. शेपूट कमानीप्रमाणे गोल वळवून विंचू नांगीने दंश करतो. एका दंशात विंचू साधारण पाच ते सहा मिलिग्रॅम म्हणजे जवळपास चहाचा अर्धा चमचाएवढे विष सोडतो. जगात विंचवाच्या जवळपास ६५० जाती आहेत. भारतात ८९ जाती आढळतात. यापकी २८ जातीचे विंचू विषारी असतात. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात उष्णतेचे प्रमाण खूप वाढलेलं असतं. कधीतरी पावसाची एखादी सर येते. वातावरणात थोडासा गारवा येतो. अशा वेळेस विंचू जास्त प्रमाणात दिसतात. कौले किंवा घराच्या सांधी-कोपऱ्यात बसलले विंचू अशा वेळेस बाहेर पडतात. विंचू जर विषारी असेल तर विंचू चावलेल्या व्यक्तीला दरदरुन घाम येतो. छातीत दुखू लागते. हृदयाच्या ठोक्यांच्या गतीत वाढ झालेली असते. साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटांत वैद्यकीय सेवा मिळणार असेल तर प्रथम त्या सेवेचाच विचार करा. तसे शक्य नसेल तर पुढील प्रथमोचार करता येतील. विंचू चावल्यावर प्रथम विंचू चावला असेल ती जागा साबणाने स्वच्छ धुवावी. त्या जागेवर चुना लावला तरी चालेल. विष हे आम्लधर्मी असतं. साबण किंवा चुन्यातील आम्लारीची विषाबरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यावर विषाचे प्रमाण कमी होते. एका स्वच्छ फडक्यात बर्फ घेऊन त्या जागेवर दाबून धरावे. पाच ते दहा मिनिटे तसेच दाबून धरावे. हीच कृती चार ते पाच वेळा करावी. हाताला किंवा पायाला विंचू चावला असेल तर पाय किंवा हात हृदयापासून उंच स्थितीत ठेवा. डोंगर कपारी किंवा कडे चढताना दोन दगडांमध्ये हात ठेवण्याचा प्रसंग येतो, अशा वेळेस दगडांमधील जागेत काही नाही ना ते तपासून घ्यावे. घराबाहेरच्या जागेत कुठेही ओलावा/ अडगळ ठेवू नये. चुलीच्या जवळपास लाकडे-काटक्या यांचा ढीग करून ठेवू नये.
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. आपके मनमें जलन..
‘वैसा देखेंगे ना तो मुंबै के ट्रॉफिकमें गाडीका ऑक्षिडेंट होनेका सवालच पैदा नहीं होताय!’ असं म्हणून सर्जू हसला. आपल्याच विनोदावर! मग डोळे रोखून, हातातल्या कटिंग चायच्या ‘गिल्लास’ला वर उंचावून म्हणाला, ‘पूछो क्यू?’ त्याच्या या सवालाला कसं उत्तर द्यायचं हे ठाऊक असल्यानं मीदेखील ‘गिल्लास’ किंचित वर नेला आणि भुवया उंचावल्या..
‘क्योंकी मुंबैमें रातको छोडके कोई अपनी गाडी इस्पीडमें चलाह नहीं सकता.. ट्रॉफिकमें कैसे हल्लु हल्लु चलानेका? इसका ट्रेनिंग मुंबैका ट्रॉफिक देताय. लेकीन भाअर (बाहेर) जाव ना तो रोडपे गाडीका इस्पीड कैसा कन्ट्रोल करने का अपने आप समझताय!’
मी होकारार्थी मान डोलाविली. सर्जू हा ‘डरायविंग इन्स्ट्रक्टर’ (त्याच्या भाषेत माष्टर) आपल्या परिचयाचा आहे. सर्जू थेट alt
बोलायचा. ‘लैफ’ का फिलॉसॉफी आपण झाडतोय याचं त्याला भान नसायचं. एकदा प्रयत्न केला आणि म्हटलं की, ‘तुम जो बोलताय ना, वो सब लाइफके लिए अच्छाय. रोड माने अपनी लाइफ और अपनी गाडी माने आपन खुद..’ सर्जूनं पुढे फार बोलू दिलं नाबी. त्यानं जोराजोरात श्वास घेऊन ‘तुम पिएला नहीं ना?’ असं डोळे मिचकावून विचारलं. मग तो प्रयत्न सोडून दिला. भाअर के ट्रॉफिक में हर एक इन्सान को अपना गाडी आगे लेनेका रहताय. पिछेसे हॉरन मार मारके, डिपर चला के. (असे म्हणताना त्यानं पाचही बोटं जुळवून हॉर्न वाजवल्यासारखं केलं.) सबको आगे जानेका तो पिछू कौन रहे गा?
‘मेरे को ये बिल्कुल अच्छा नहीं लगताय. अपना गाडी अपने इस्पीडमें चलाव ना. लेकिन दुसरे का गाडी और उसका इस्पीड देखके लगताय आपन भी ऐसा ही चलाना मंगताय. ऐसे डायवर लोगके मनमें खौफ पैदा होताय की बाकीका लोग आपनको ओवरटेक करेगा और..’ थोडं विचारात पडल्यासारखं करून माझ्याकडे रोखून पाहत म्हणाला, ‘अपना गाडीका इस्पीड छोडके, दुसरे गाडी के इस्पीडसे चलने के पिछु ओर एक कारन हैं, पब्लिकके मनमें ना ‘जलन’ होता है. दुसरे का गाडी और इस्पीड देखको आपके मनमें बहुत जलन होता हैं. दुसरे के इस्पीड देखके आप मनमें जलते हैं. एक बार डायवरके मनमें जलन हुआ ना तो आप इस्पीड बढाते हैं. जिसके कारन ऑक्षिडेंट होताय.’ हे वाक्य सर्जू माझ्याकडे रोखून पाहत म्हणाला. ‘सर, आप बडे डॉक्टर है ये मेरेको मालूम है, लेकिन आपके मनमें बडी जलन है, आपके मनकी जलन मैं बाजूमें बैठके समझ सकताय. आपके जलन होता है ना तब आप अपना मूँह टाइट करते हैं और इष्टिअरिंग वील जोरसे पकडते है.. काय को सर? अपने इस्पीडसे गाडी चलाओ. दुसरे का इस्पीडसे नहीं. आपका गाडी हैं. आपको कौनसे इस्पीडसे चलानेका हैं आपका काम है, दुसरा गाडी वालेका नहीं. बराबर ना..’
स्टिअरिंग वीलवरची माझी बोटं क्षणभर थिजली. बसल्या बसल्या त्याच्याकडे पाहून मंद स्मित केलं. उजवा हात हृदयाला लावला नि म्हटलं, ‘गुरू आहेस गुरू’.. पिसारा फुलला..
डॉ. राजेंद्र बर्वे  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो