नवनीत
मुखपृष्ठ >> नवनीत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत
Print E-mail

इतिहासात आज दिनांक.. : २ नोव्हेंबर
१७९५ अमेरिकेचे ११ वे अध्यक्ष जेम्स नौकस पोल्क यांचा जन्म. टेक्सास प्रांत त्यांनी अमेरिकेला जोडला व मेक्सिकोबरोबरचे युद्ध जिंकले. १८७१ मराठी भाषेतील पहिला दिवाळी अंक काढणारे ‘मनोरंजन’कार काशीनाथ रघुनाथ मित्र यांचा जन्म. ते मूळचे आजगाव (जि. रत्नागिरी)चे त्यांचे मूळ आडनाव ‘आजगावकर’.  १८९३ ला मुंबईत आल्यावर मित्रांच्या मदतीने त्यांनी ‘मनोरंजन’  मासिक  सुरू केले. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ असे त्यांचे घोषवाक्य ‘मनोरंजन’च्या अंकावर असे. बंगाली भाषेच्या प्रेमापोटी त्यांनी मित्र आडनाव धारण केले. १९०९ मध्ये त्यांनी मराठीतील पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला. कथेबरोबरच कथा लेखकांची नावे छापण्याला मित्र यांनी सुरुवात केली. वसंत विशेषांक, दिल्ली दरबार अंक, आगरकर अंक, अण्णासाहेब कर्वे अंक यांसारखे विशेषांक त्यांनी काढले. स्वत:ची प्रकाशन संस्था असावी म्हणून ‘मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळी’ असे प्रकाशन सुरू केले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याकडून आत्मचरित्रात्मक लेख लिहवून घेऊन तो ‘मनोरंजन’मध्ये १९१५ मध्ये प्रसिद्ध केला. त्यात पुढे भर घालून ‘आत्मवृत्त’ प्रकाशित झाले.  मित्र यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अंकाची जबाबदारी सांभाळली.
१९८३  तारापूर प्रकल्पाला सुटे भाग पुरविण्यासंदर्भात भारत आणि पश्चिम जर्मनी यांच्यात करार झाला. उभय देशांनी करारावर सह्य़ा करून एकमेकांस साहाय्य केले.
प्रा. गणेश राऊत  -  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : ओटोमन साम्राज्याचा विस्तार
उस्मान या टोळीवाल्याने तुर्कस्थानमधील सोगत या गावी आपल्या राज्याचे मुख्य ठाणे केले. इ.स. १२९९ मध्ये स्थापन केलेले हे ओटोमन राज्य इ.स. १९२२ पर्यंत टिकले. ६२३ वर्षे टिकलेले हे साम्राज्य जगातील सर्वात अधिक आयुष्यवान साम्राज्य झाले. ओटोमन साम्राज्याचा संस्थापक उस्मान याला त्याच्या तरुणपणी एक झाड नेहमी स्वप्नात येई. ते झाड इतके मोठे होते की, त्याच्या फांद्या आशिया, युरोप व आफ्रिका या तीन खंडांमध्ये पोहोचल्या होत्या. त्याचे स्वप्न अखेर खरे ठरून त्याच्या साम्राज्याचा विस्तार या तीन खंडांत झाला. त्याच्या साम्राज्यातून चार मोठय़ा नद्या वाहत होत्या. तैग्रिस, युफ्रेटिस, नाईल व डॅन्यूब. उस्मानने सन १३२६ पर्यंत राज्य केले. त्याने बायझंटाइन राज्यातले आशिया मायनरमधला प्रदेश जिंकला. त्यातील बरसा हे शहर घेऊन तिथे राजधानी केली.
उस्मान नंतर ओटोमन राज्यकर्त्यांपैकी मुराद दुसार, सलीम, मेहमद दुसरा, सुलेमान दी मॅग्निफिशंट हे विशेष कर्तृत्ववान सुलतान होऊन गेले. मुराद दुसरा याने व्हेनिसकडून थेसालोनिकी प्रांत घेतला. हंगेरी व दोस्त राष्ट्रांच्या संयुक्त फौजांचा १४४४ आणि १४४८ असा दोन वेळा पराभव केला. मुरादनंतर आलेल्या सुलतान मेहमद याने १४५३ साली बायझंटाइन साम्राज्याची राजधानी काँक्टंटाइनवर चढाई करून कब्जा केला. या विजयांमुळे भूमध्य सागरी प्रदेश आणि दक्षिण पूर्व युरोपात इतर राज्यांपेक्षा प्रबळ झाला. मेहमदने सन १४५३ मध्ये काँस्टंटिनोपल शहराचे नाव बदलून इस्तंबूल असे केले व राजधानी इस्तंबूल येथे केली. त्या शहरात अनेक सुधारणा केल्या. बागबगीचे, कारंजी व अनेक मशिदी बांधल्या. तोपकॅपे हा प्रसिद्ध महाल बांधला. मेहमद सुलतानाला रोम जिंकून कैसर-इ-रम (रोमचा बादशहा, सिझर रोमॅनियस) व्हायची इच्छा होती, पण त्यापूर्वीच १४८१ साली त्याचा मृत्यू झाला.
सुनीत पोतनीस  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : लेफ्टोस्पायरिसिस

लेफ्टोस्पायरिसिस हा रोग तुलनेने नवा आहे. सर्व शहरांत आणि गावांत पावसाळ्यात पाण्याचा निचरा नीट होत नाही. आपल्याकडे भारतभर भटके प्राणी खूप संख्येने पाहायला मिळतात. भटक्या प्राण्यांचे मलमूत्रादी विसर्जन उघडय़ावर होते. उन्हाळ्यात या गोष्टी वाळून जातात, पण पावसाळ्यात तसे होत नाही. एक तर त्या वेळी ऊन नसल्याने ते चटकन वाळत नाही व घाण वास वातावरणात कोंडून राहातो.  लेफ्टोस्पायरिसिस हा रोग कुत्र्याच्या मूत्रातून पसरणारा रोग आहे. हे मूत्र जर पावसाच्या साठलेल्या पाण्यात मिसळले आणि त्याच्याशी माणसाला झालेली एखादी जखम संपर्कात आली तर हे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. या रोगात मूत्रिपड व यकृताचे आजार होऊ शकतात. लिशमॅनियासिस हा कुत्र्यांना होणारा रोग आहे. कुत्र्यांचा हा रोग माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम वालुकामाशी नावाचा एक कीटक करतो. ही माशी चावल्यास यकृताचे विकार होतात. यात जास्त ताप येतो. या रोगामुळे त्वचेवर डाग पडतात. हे डाग लवकर बरे होत नाहीत. िपजऱ्यातील पाळीव पक्ष्यांना सिटॅकोसिस या नावाचा विषाणूंमुळे होणारा रोग होतो. माणसाच्या संपर्कात हे पक्षी आल्यास न्यूमोनियाची लक्षणे दिसून येतात. श्वसनाच्या काही रोगांचे विषाणू माणसांकडून कुत्री, मांजरे आणि कुत्र्या-मांजरांकडून पुन्हा माणसांकडे असा त्यांचा प्रवास होतो. प्राणी पाळण्यामागे माणसाचा कधी स्वार्थ असतो तर कधी प्राण्यांबद्दलचे प्रेम असते, कारण कोणतेही असले तरी एकदा ते प्राणी आपल्या घरातील सदस्य झाले की आपले त्यांच्याबद्दलचे प्रेम वाढते. या प्राण्यांनासुद्धा आपल्याप्रमाणे डॉक्टरांची गरज असते. जनावरांच्या बहुतेक रोगांवर प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध आहेत. भारतातील सर्व शहरे, जिल्हे आणि तालुक्याच्या ठिकाणी जनावरांसाठी दवाखाने आहेत. या दवाखान्यातून गुरांना लसी विनामूल्य दिल्या जातात. तसेच रोग झालेले प्राणी किंवा पक्षी यांचा इतर प्राण्यांशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. मेलेले पक्षी जाळून टाकावेत. पशू-पक्ष्यांच्या निवासाच्या जागा नियमितपणे डेटॉल, फिनाइल, लायसॉल यांसारख्या जंतुनाशकांनी स्वच्छ कराव्यात.
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,  मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : अनिच्च अनिच्च..
मित्रा, आत्मचिंतन फक्त पद्मासन घालून गुडघ्यावर हात ठेवूनच करावं लागतं किंवा करता येतं, या आदेशाचं आणि विचाराचं मनावर बसलेलं जोखड झुगारून दिलं तेव्हापासून मुक्त मनाने, अंतर्मुख होऊन, चिंतन करता येऊ लागलं. आता कुठेही केव्हाही चिंतन करायला मोकळा झालोय. बुद्ध विचारांचा अभ्यास करताना मन वारंवार गटांगळ्या खातं. पाली शब्दांचे तत्कालीन अर्थ समजून मग त्यावर निरुपण आणि चिंतन व मनन असा काहीसा गमतीचा प्रवास करतोय. विपश्यनेच्या साधनेमध्ये वारंवार ‘अनिच्च’पणावर (अनित्य) भर दिला जातो. सगळे मानसिक व शारीरिक अनुभव तात्पुरते, निसटते व न टिकणारे असतात. ते कधी सुखसंवेदना निर्माण करतात, तर कधी दु:ख. हे अनुभव ‘अनिच्च’ असतात, त्यांच्या शरीरावर आणि मनावर उमटणाऱ्या संवेदनादेखील अनित्य असतात. हा बुद्धप्रणीत सिद्धान्त, तथागतानी त्याच्या ‘परिच्चसम्मुपाद’ नावाच्या व्यापक सिद्धांतामधून मांडला. कोणत्याही सुखकारक वा दु:खकारक संवेदनांचा अनित्यपणा लक्षात न घेता त्यात गुंतून पडल्यास त्यातून तृष्णा निर्माण होते. सुखकारक संवेदनांचा हव्यास आणि दु:खकारक संवेदनांचा अव्हेर अथवा तिरस्कार यामधून कायमस्वरूपी दु:खसंस्कार होतात. यासाठी अनेक (बारा) पायऱ्यांचा सिद्धांत तथागतांनी ‘परिच्चसम्मुपाद’मध्ये मांडला. मानवी मनाची अत्यंत मूलगामी विचारप्रक्रिया तथागतांनी विषद केली. ‘हाय फंडा स्टफ’ आहे मित्रा, पुन:पुन्हा वाचून मनन केल्यास उलगडेल.
तथागतांच्या या विचारसिद्धांतावर चिंतन करता आलं पण त्याचा शारीरिक अनुभव घेणं आवश्यक आहे, असं लक्षात आलं. सैद्धांतिक पातळीवर समजणं आणि प्रत्यक्ष अनुभवातून सत्य प्रतीत होणे यात फरक आहे. पैकी प्रत्यक्ष अनुभवसिद्ध विचार अधिक मोलाचा असतो असं तथागतांनी म्हटलंय.
मला या विचारांची प्रचिती आली त्याची गोष्ट मजेशीर आहे. थायलंडमधल्या एका बुद्ध आश्रमात राहत असताना आंघोळ करता करता या विचारांचा उलगडा झाला. आश्रम साधा होता आणि न्हाणीघर म्हणजे एका खडकाच्या भिंतीआडचा आडोसा वर आकाश, समोर नदीचा खळाळता प्रवाह आणि अंगावर खडकातल्या झऱ्यातून झिमझिमणारं पाणी अंगावर शिरशिरी आणणारं गार. आंघोळ करता करता अंगावर येणाऱ्या तुषारांच्या थंड स्पर्शाने नकोसं वाटायचं, पण पाण्याचे थेंब खांद्यावरून ओघळले की, छान वाटायचं काही क्षण थंडपणानं नकोसा वाटणारा स्पर्श कधी संपतोय असं वाटायचं तोच त्या स्पर्शाचं ऊबदारपणात रूपांतर व्हायचं आणि हे ओघळ अंगावर असेच रेंगाळावेत असं वाटायचं. दोन्ही अनुभव मनात उमटत होते. अशा दोन्ही अनुभवांशी चिकटून राहिलं तर अस्वस्थपणा येतो, हवेसे वाटल्यामुळे वाटणारी तृष्णा आणि नकोसे वाटल्यामुळे वाटणारी नकारात्मक तृष्णा क्षणोक्षणी अनुभवली. आंघोळ झाली, अंग पुसता पुसता लक्षात आले की डोळे पाणावलेत तथागतांच्या दिव्य विचारांचा प्रत्यक्ष पडताळा आल्यानं मन ओथंबलं होतं.. साधा अनुभव, क्षुल्लक गोष्ट, गहन विचार..
डॉ. राजेंद्र बर्वे  - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो