नवनीत
मुखपृष्ठ >> नवनीत
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नवनीत
Print E-mail

इतिहासात आज दिनांक.. : १ नोव्हेंबर
१८५८इंग्लंडची तत्कालीन सम्राज्ञी राणी व्हिक्टोरिया हिच्या नावाने एक जाहीरनामा भारतात प्रसृत करण्यात आला. यालाच ‘राणीचा जाहीरनामा’ असे म्हणतात. या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून हिंदुस्थानचा कारभार काढून घेऊन तो पार्लमेंटकडे गेला. राणीच्या वंशजांशी भारतीयांनी राजनिष्ठ राहून ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आज्ञापालन करावे. लॉर्ड कॅनिंग हे राणीचे पहिले प्रतिनिधी या नात्याने भारतावर त्यांची सत्ता चालणार. हिंदुस्थानातील संस्थानिकांशी करण्यात आलेले करारमदार पाळण्यात येतील. त्यांचे हक्क, मान व अधिकार यांची जपणूक करण्यात येईल. सध्या अंमल असलेल्या प्रदेशात भर घालण्याची पार्लमेंटची इच्छा नाही. परंतु आमच्या राज्यावर आक्रमण केल्यास त्याचा प्रतिकार करू. प्रजेतील नोकरांना अधिकारांच्या जागांवर नेमताना शिक्षण, लायकी, शील यांचाच विचार केला जाईल. नवे कायदे करताना किंवा जुन्यांची अंमलबजावणी करताना लोकांचे पूर्वापार हक्क, चालिरीती, वहिवाटी यांकडे लक्ष देणार. भारतातील उद्योगधंद्यांना उत्तेजन देणे, सार्वजनिक उपयोग व सुधारणेची कामे हाती घेणे हे कार्य करू.
१९५६ राज्य (भाषावार) पुनर्रचना कायदा अमलात आणण्यास सुरुवात झाली. आंध्र प्रदेश, केरळ व म्हैसूर (पुढे कर्नाटक) राज्यांची स्थापना.  
१९७८हरिहर गुरुनाथ कुलकर्णी ऊर्फ कुंजविहारी या कवी, स्वातंत्र्यसैनिक व सोलापुरातील अनेक विधायक उपक्रमांचे संयोजक यांचे निधन. ‘समग्र कुंजविहारी’ हा ग्रंथच त्यांचे स्मारक होय.
डॉ. गणेश राऊत  -  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सफर काल-पर्वाची : ओटोमन साम्राज्याची स्थापना
उत्तर आशियाच्या गवताळ कुरणांच्या प्रदेशात राहणाऱ्या तुर्की भटक्या जमातींना आक्रमक मंगोल टोळ्यांनी तिथून हुसकले. त्या टोळ्या अनातोलिया म्हणजे हल्लीच्या मध्य तुर्कस्तान या भागात येऊन राहू लागल्या. त्या टोळ्यांतील बहुतेकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. या टोळ्यांपैकी सेल्जुक या टोळीने दहाव्या शतकात आपले भटके जीवन थांबवून ते स्थिर झाले. त्यांनी मध्यवर्ती प्रशासन व कर आकारणी सुरू केले. थोडय़ाच दिवसांत ते सर्व टोळ्यांपेक्षा प्रबळ होऊन त्यांनी काँस्टंटिनोपल येथे आपले मुख्य ठाणे केले, पण बाकीच्या दहा तुर्की भटक्या टोळ्यांनी मात्र आपल्या गाझी परंपरेनुसार भटके जीवनच चालू ठेवले. या टोळीवाल्यांनी प्रथम ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. या लोकांचा पशुपालन हा व्यवसाय होता; परंतु हे लोक जमेल तेथे लूटमार करणे हेही करीत.
पुढे त्या टोळीवाल्यांचा इस्लामशी संबंध आला. सातव्या शतकात आपल्या धर्माच्या रक्षणासाठी व प्रसारासाठी अरबस्थानात इस्लामी लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला. खलिफांनी आशिया व युरोपात शिरून इस्लामी साम्राज्य उभे केले. तलवारीच्या जोरावर राज्ये जिंकून लोकांना बाटविणे किंवा जबर कर भरावयास लावणे ते करीत. भटके तुर्की टोळीवाले अरबी भागात शिरून त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. काही टोळीवाले अरबी सैन्यात भरती झाले. सेल्जुक टोळीवाल्यांनी आधीच स्थिर होऊन आपल्या राज्याचा विस्तार केला होता; परंतु आपसातल्या भांडणाचे पर्यवसान सेल्जुक राजवट नष्ट होण्यात झाली. त्याच वेळी इतर टोळ्यांपैकी उस्मान हा टोळीप्रमुख पुढे येऊन सर्व टोळ्यांचा प्रमुख होऊन त्याने इ.स. १२९९ मध्ये राज्य स्थापन केले. उस्मान या नावाचा अपभ्रंश प्रथम ओत्तमन असा झाला व पाश्चात्त्य, युरोपियन यांनी त्याचे ‘ओटोमन’ असे केले.
सुनीत पोतनीस - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कुतूहल : पाळीव प्राण्यांपासून होणारे रोग

गाय, बल, कुत्रे, मांजर, कोंबडय़ा, पोपट, शेळ्या, मेंढय़ा हे प्राणी पाळीव प्राणी म्हणून आपल्याला परिचित आहेत. याबरोबरच अस्वल, माकड, साप, मोर हे प्राणीही पाळले जातात. सुरुवातीला अन्नाची गरज भागविण्यासाठी माणसाने प्राणी पाळण्यास सुरुवात केली. त्याबरोबर प्राण्यांपासून चामडे किंवा कातडे मिळवणे, लोकर मिळवणे अशा कारणांसाठी पाळीव प्राण्यांचा उपयोग केला जातो. एवढेच नाही तर कधी कधी माकड, अस्वल, साप या प्राण्यांचे खेळ करून उदरनिर्वाह करणे हासुद्धा प्राणी पाळण्यामागचा उद्देश असतो. माणूस हा मुळात स्वार्थी असला तरी प्राण्यांशी मैत्री करणे, प्राण्यांविषयीचे प्रेम असा नि:स्वार्थीपणासुद्धा प्राणी पाळण्यात असतो.
पाळीव प्राणी जेव्हा आपल्या सहवासात असतात तेव्हा या प्राण्यांपासून आपल्याला कळत नकळत उपद्रव हा होतच असतो. कुत्री किंवा मांजरे यांना न्यूरोटॉपिक या जंतुसंसर्गामुळे रेबीज किंवा अलर्क हा रोग होतो. पिसाळलेल्या प्राण्यांच्या लाळेमध्ये हे विषाणू असतात. या जंतूचा संसर्ग झालेले कुत्रे, मांजरे इतर प्राण्यांना चावल्यास त्यांच्या शरीरात रेबीजचे जंतू प्रवेश करतात. कुत्रा चावल्यानंतर त्याला रेबीज झाला होता का हे पाहणे महत्त्वाचे असते. कुत्रा पाळीव असेल तर त्याचे बारकाईने निरीक्षण केले तर ते समजू शकते. कुत्र्यामध्ये पुढील लक्षणे आढळल्यास त्याला रेबीज झाला आहे असे समजावे.
कुत्रा रागीट होणे, कुत्र्यांच्या आवाजात फरक पडणे, गिळताना त्रास होणे, पाय, अंग लुळे पडणे पुढे पाच ते सात दिवसांत कुत्रा मृत्यू पावणे. कुत्रा चावल्यानंतर लगेचच जखम साबणाने धुवावी त्यावर सोफ्रामायसिन लावावे त्यामुळे जंतू मरतात. जखम बांधून ठेवू नये. हा झाला साधा प्रथमोपचार. कुत्रा चावल्यानंतर तो रेबीज बाधित होता किंवा नाही हे न बघता रेबीजसाठी प्रतिबंधात्मक लस घेणे उत्तम. तसेच धनुर्वाताची लसही घेणे आवश्यक आहे.  
सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,  मुंबई २२  This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मनमोराचा पिसारा.. : सूर आले जुळूनी..
मानस, किती दिवसानं भेटलास रे! कामाच्या धावपळीत, तुझ्यासारख्या जिवलग मित्राशी गप्पा मारता येत नाहीत. तुला भेटलं की स्वत:शी नवा संवाद सुरू होतो. जुन्या संवादातली अर्थपूर्ण सूत्रं पुन्हा गवसतात. खूप छान वाटतं..
‘‘अगदी खरंय रे, बीन मिसिंग यू! मलादेखील असं वाटत होतं की, तुझ्याबरोबर बोलावं, जस्ट भेटावं. माझ्या मनात तीच इच्छा होती..’’
मानस नेहमीप्रमाणे थट्टामस्करी न करता म्हणाला आणि आम्ही खुदकन हसलो. ‘‘येस मानस, याच विषयावर बोलायचं होतं. बऱ्याच वेळा एक आगळा अनुभव येतो. आपण एखादी इच्छा मनात धरतो, अमुकला भेटावं, तमुकला फोन करावा. एखाद्या व्यक्तीशी भेटगाठ घडावी आणि मानस, नेमका तोच मित्र, तीच मैत्रीण, भाऊ-बहीण आपल्याला भेटतात. गंमत म्हणजे, समोरच्या व्यक्तीला तसंच वाटतं. जणू काही आपण ठरवून भेटतोय. आधी वेळ ठरवून, भेटगाठ होतेय. मैत्रिणीला फोन लावण्यासाठी मोबाइल हातात घ्यावा, तो तिचाच फोन येतो. मला जे विचारायचं असतं, तेच तिला सांगायचं असतं. नवल वाटतं अशा योगायोगांचं. मानस मला सांग, असं खरंच काही असतं का? मला वाटतं, याला टेलिपथी म्हणतात ना?’’
मानस मंद स्मित करीत म्हणाला, ‘‘येस, अशा अनुभवांना ‘टेलिपथी’ म्हणतात.’ याला काही शास्त्रीय आधार आहे का? असं विचारलंस तर मात्र यावर पुरेसा रिसर्च झालेला नाही आणि खरं सांगायचं तर असे मानसिक प्रयोग करणं तसं कठीण आहे. त्याचा ‘स्टॅटिस्टिकल’ संख्याशास्त्रीय पुरावा तयार करणं जवळजवळ अशक्य आहे.
ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे, असं मात्र नक्की म्हणता येईल. लाखो लोकांना तसे अनुभव आलेले आहेत. याउलट असे योगायोग आपल्या आयुष्यात घडावे, अशी प्रखर इच्छा असूनही तसे अनुभव येत नाहीत. असंदेखील काही लोक म्हणतात. मित्रा, खरोखर त्यामुळे फार फरक पडत नाही. एक गोष्ट नक्की आहे की, आपल्या इच्छाशक्तीला हवा तसा होकारात्मक प्रतिसाद मात्र नक्की मिळतो. उदा. एखादं गाणं, विचार किंवा भावना एकाच वेळी अनेकांना सुचतात आणि ते सगळे एकत्र येतात. अशा रीतीने एकमेकांची मनं जुळून येणं, विचार शेअर होणं अशा अनुभवांना ‘टेलिपथी’ न म्हणता ‘सिंक्रॉनिसिटी’ म्हणतात. आपली तीव्र इच्छा आणि विचार अदृष्य लहरींप्रमाणे परिसरात पसरतात. दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्या व्यक्तीचा जणू काही ‘अ‍ॅन्टेना’च त्या लहरी पकडतो, कॅप्चर करतो आणि ते विचार त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. आपल्या मनातला विचारांचा ट्रान्समीटर अशा विचारसुरांच्या लहरी बाहेर सोडतो आणि आपणही काही विचार आपल्या मनाच्या अ‍ॅन्टेना (किंवा डिश) वरून उतरून घेतो. असे अनुभव येतात हे खरंय. अशी स्िंाक्रॉनिसिटी मनाला सुखद धक्के देते. त्या अनुभवावर आपला विश्वास बसतो. आपण अधिक सजगतेने आपले विचार त्यांची व्हायब्रेशन प्रसारित करतो आणि रिसिव्ह करतो. मैत्र जुळतं. जसं तुझं नि माझं. यातूनच मनमोराचा पिसारा फुलतो.’’
डॉ. राजेंद्र बर्वे - १ि१ं्नील्ल१िुंं१५ी@ॠें्र’.ूे

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो