अंबानी बंधूंसह अनेक उद्योगपतींचा काळा पैसा स्विस बँकेत असल्याचा आरोप विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली- शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
रिलायन्स उद्योगसमूहाचे मुकेश आणि अनिल अंबानी तसेच जेट एअरवेजचे नरेश गोयल, राहुल गांधी यांच्या निकटस्थ मानल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या खासदार अनू टंडन, डाबर समूहाचे बर्मन बंधू यांच्यासह ७०० भारतीयांचे स्विस बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा असल्याचा नवा गौप्यस्फोट इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी केला.मात्र, रिलायन्स समूहासह सर्वानीच त्यांचे आरोप फेटाळून लावले.
|
प्रतिनिधी , मुंबई
समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या स्वार्थनिरपेक्ष कामाची समाजाला ओळख व्हावी आणि त्यांच्या कामात समाजाचाही सहभाग वाढावा या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमास या वर्षीदेखील लाखो वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. असंख्य वाचकांनी या संस्थांच्या कामाला आर्थिक हातभार लावून रचनात्मक कामांशी असलेल्या बांधीलकीच्या स्तुत्य मानसिकतेचा प्रत्यय दिला. |
खास प्रतिनिधी, मुंबई
आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे समाधानकारक चित्र नसतानाच दुष्काळ, सिलिंडरचे अनुदान, कर्मचाऱ्यांचा महागाईभत्ता आदींमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढू लागला आहे. यातूनच तीन सिलिंडरकरिता अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी लगेचच ही रक्कम वळती करायची नाही, अशी सावध भूमिका सरकारने घेतली आहे.
|
राष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाचा ठपका गोविंद तुपे, मुंबई
बालमजुरी ही एक सर्वात मोठी समस्या आहे असे शासन वारंवार सांगते. पण ही बालमजुरी कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाय-योजना शासकीय अधिकारी प्रभावी पणे करत नसल्याचा ठपका राष्ट्रीय बाल सरंक्षण आयोगाने ठेवला आहे. त्यामुळे बालमजुरी रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रभावीपणे काम करून सर्व बालमजुरांचा सर्वे करून सद्य स्थितीचा आढावा देणारा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले आहेत.
|
तीन कंपन्यांना विनापरवानगी अतिरिक्त स्पेक्ट्रमवाटप पीटीआय , नवी दिल्ली - ९ नोव्हेंबर २०१२
टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दूरसंचार मंत्र्यांना वारंवार लक्ष्य करणारा भाजपही याच मुद्दय़ावरून अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील तत्कालीन दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी सर्व संबंधितांना अंधारात ठेवून तीन मोबाइल कंपन्यांना सहा पूर्णाक दोन दशांश मेगाहर्टझच्या स्पेक्ट्रमचे विनापरवानगी अतिरिक्त वाटप केले, असा गंभीर दावा केंद्रीय गुप्तचर विभागाने अहवालात केला आहे. |
लोकलच्या छतावर चढण्याचा प्रयत्न भोवला? खास प्रतिनिधी, नवी मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन महाविद्यालयीन तरुणांचा गुरुवारी दुपारी जुईनगर-नेरुळदरम्यानच्या प्रवासात पडून मृत्यू झाला. या तरुणांच्या मृत्यूबद्दल रेल्वे पोलिसांना साशंकता असून या तरुणांचा लोकल ट्रेनच्या छतावर चढताना पडून मृत्यू झाला की रेल्वे ट्रक ओलांडताना याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरूहोता. |
पी.टी.आय., हैदराबाद
सामनानिश्चिती प्रकरणाने देशवासीयांना जबर धक्का देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अझरुद्दीनवर लादलेली आजीवन बंदी ही बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.अझरुद्दीनवर बीसीसीआयने लादलेली बंदी कायद्याला अनुसरून नसल्याचा निर्वाळा देत, आशुतोष मोहन्ता आणि कृष्ण मोहन रेड्डी यांच्या खंडपीठाने अझरला दिलासा दिला आहे.
|
बनावट टीडीआर वापरून टोलेजंग ‘देव कार्पोरा’ खास प्रतिनिधी, मुंबई प्रशासकीय अधिकारी, राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या अभद्र युतीतून उदयास आलेल्या आदर्श घोटाळयामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असतानाच शेजारील ठाण्यातही असाच एक घोटाळा उघडकीस आला आहे.
|
अमेरिकी अध्यक्षपदाच्या चुरशीच्या संघर्षांत सलग दुसऱ्यांदा निवड, आशावादाची सरशी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांच्या पारडय़ात मतांचा ‘मिट्ट’ अंधार, पराभव मान्य शिकागोपासून न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकापर्यंत ओबामा समर्थकांचा जल्लोष, अभिनंदनाचा वर्षांव शहाणी आणि समंजस अग्रलेख
पीटीआय , वॉशिंग्टन - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२ कोटय़वधी रोजगारांची निर्मिती, अर्थव्यवस्थेत अमूलाग्र बदल, पाकिस्तानशी घट्ट मैत्री, इराणशी युद्ध.. अशी आश्वासने देणारे रिपब्लिकन उमेदवार मिट रोम्नी यांना न भुलता अमेरिकी जनतेने बुधवारी (अमेरिकन प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री) पुन्हा एकदा शांत-संयत आणि आश्वासक व्यक्तिमत्त्वाचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आणि अमेरिकेसह जगभर ‘जीत गये रे ओबामा’चा जल्लोष झाला!
|
पीटीआय, नवी दिल्ली अमेरिकेसह अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या ओबामा-रोम्नी लढतीचा रोमांच भारतानेही अनुभवला. ओबामांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करतानाच दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा भारताने व्यक्त केली. तर उद्योगविश्वानेही ओबामांवर शुभेच्छांचा वर्षांव केला. ओबामांच्या विजयाचा परिणाम शेअर बाजार आणि रुपयाच्या तेजीमध्येही दिसून आला. |
चार महिन्यांचा महागाई भत्ता रोख देण्याबाबत आखडता हात खास प्रतिनिधी, मुंबई गॅस सिलिंडरप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाईभत्ता देताना सरकारने हात आखडता घेतला आहे. जुलैऐवजी १ नोव्हेंबरपासून वाढीव सात टक्के महागाईभत्ता देण्यात येणार असला तरी जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांची रक्कम रोख स्वरूपात मिळणार नाही हे संकेत देण्यात आले.
|
ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत प्रतिनिधी, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून आसनगावकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीचा पेंटोग्राफ अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत झाली नव्हती.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|