सदाशिव अमरापूरकर यांची उपस्थिती
प्रतिनिधी मुंबई समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन अथकपणे काम करणाऱ्या निवडक संस्था व व्यक्तींना वाचकांच्या मदतीचा हात लाभावा, या हेतूने ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात हाती घेतलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमांतर्गत जमा झालेल्या धनादेशांचे वाटप शनिवार १० नोव्हेंबर रोजी ‘लोकसत्ता’च्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात होणार आहे. |
संघातही भूमिकेबाबत दोन गट विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची स्थिती बुडत्याचा पाय अधिक खोलात अशी झाली आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड होण्याचे त्यांचे मनसुबे शुक्रवारी वांध्यात आले. आतापर्यंत त्यांची पाठराखण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पत्रक प्रसिद्धीस देऊन त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या वादाबाबत तटस्थ असल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या शुक्रवारी रात्री झालेल्या कोअर ग्रुपच्या बैठकीतही गडकरी यांच्यावरून दोन तट पडले असल्याचे समजते. पक्षात चटकन पर्याय उपलब्ध नसल्याने यासंदर्भात आस्ते कदम भूमिका अवलंबण्यात येत असल्याचे समजते.
|
इटली संघाच्या कारवर नौदलाचा झेंडा केंद्राकडून गंभीर दखल तुषार वैती, नोएडा
भारतीय सागरी हद्दीत घुसून दोन केरळी मच्छिमारांना गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी इटालियन नौदलाच्या दोन जहाजांवरील कर्मचाऱ्यांवर भारतात खटला सुरू असतानाच इंडियन ग्रां. प्रि. स्पर्धेत सहभागी असलेल्या इटालियन फेरारी संघाने नौदलाचा झेंडा लावत शुक्रवारी आगळीक केली. इटलीच्या या आगळिकीमुळे स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत इटालियन संघावर टीका केली तर राष्ट्रीय मच्छिमार संघटनेनेही (एनएफएफ) फेरारीच्या निर्णयावर तोंडसुख घेतले आहे. |
वढेरांना हरयाणा सरकारची ‘क्लीन चिट’ पीटीआय, चंडिगढ/नवी दिल्ली
रॉबर्ट वढेरा यांनी डीएलफ कंपनीशी हरयाणात केलेले जमिनीचे सर्व व्यवहार पारदर्शी आहेत, त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही अशा प्रकारची ‘क्लीन चिट’ देत हरयाणा सरकारने शुक्रवारी सोनिया गांधींच्या जावईबापूंना ‘निर्दोष’ ठरवले. वढेरांना मिळालेल्या या ‘क्लीन चिट’वर मात्र भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे अध्वर्यू अरविंद केजरीवाल व भाजप यांनी कडाडून टीका केली आहे. रॉबर्ट वढेरा यांनी गुरगाव, फरिदाबाद, पलवाल आणि मेवात या हरयाणातील चार जिल्ह्य़ांत कोटय़वधी रुपयांचे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केले होते. |
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शुक्रवारी दुपारी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तब्येत ठीक नसल्याने बाळासाहेब शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर हजर राहू शकले नव्हते. ‘मी आता थकलो आहे, उद्धव, आदित्यला सांभाळा,’ असे भावनिक आवाहन बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने केले होते. त्यांची तब्येत खालावली असल्याचे आणि बोलताना धाप लागत असल्याचे त्यावेळी जाणवले होते. |
स्थानकात रेल्वेखाली घेतली उडी प्रतिनिधी, मुंबई कांदिवली येथे दोन वर्षांच्या मुलीसह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेबाबत उलटसुलट चर्चा असतानाच विरार रेल्वे स्थानकात शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास एक महिलेने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. या प्रकारामुळे विरार परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. |
चंदीगड, २६ ऑक्टोबर २०१२ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना गुडगाव, फरिदाबाद, पलवल आणि मेवात या चार जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी जमीन खरेदीप्रकरणी क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे जमीन घोटाळ्यांमधून वढेरा सुखरूप सुटण्याची शक्यता आहे. |
विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘अनेक सेना आल्या आणि गेल्या, राजची सेना हे नव्याचे नऊ दिवस असतील’ हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज यांच्या बंडानंतर लगेचच काढलेले उद्गार. त्यानंतर मनसेचा जोर वाढून शिवसैनिक मनेसमध्ये जाऊ लागल्यानंतर ‘चिमण्यांनो परत फिरा’ हे आवाहन. आणि कालच्या दसरा मेळाव्यात ‘मला सांभाळले, तसेच आता उद्धव व आदित्यलाही सांभाळा’ हे भावनावश होत केलेली व्याकुळ विनवणी. ही बाळासाहेबांची आगतिकता तर नव्हती ना, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेक दिग्गज सेनेतून बाहेर पडले.
|
विशेष प्रतिनिधी , नवी दिल्ली - शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती पॉवर अॅण्ड शुगर लिमिटेड कंपनीमागे आयकर विभाग आणि कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार ऑफ कंपनीज्कडून चौकशीचा ससेमिरा लागला आहे. गडकरींच्या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांपाशी पैसा कुठून आला, याची चौकशी मुंबई आणि पुण्यात आयकर खात्याचे अधिकारी करणार आहेत, तर गुंतवणूकदार कंपन्यांनी माहिती दडवून ठेवली तर नाही, याची मुंबई आणि नागपुरात रजिस्ट्रार ऑफ कंपनीज्कडून शहानिशा करण्यात येणार असल्याचे समजते.
|
जेवढा पाण्याचा वापर तेवढे बिल येणार प्रतिनिधी, ठाणे ठाणे महापालिकेने गुरुवारी शहरातील सर्व इमारतींना पाण्यासाठी मीटर लावण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे ‘जेवढा पाण्याचा वापर त्या प्रमाणात बिलाची आकारणी,’ असे नवे सूत्र शहरातील सर्व वसाहतींना लागू होणार आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या पट्टय़ात सुमारे ६० टक्क्यांहून अधिक इमारती, झोपडपट्टी तसेच गावठाण भागात ठराविक दराने पाण्याची बिले आकारली जातात. या पद्धतीनुसार कितीही पाणी वापरले तरी ठराविक दरानेच बिल आकारणी होत असल्याने काही भागांत पाण्याची नासाडी सुरू आहे. |
जोंधळे पॉलिटेक्निकमधील गोंधळ रेश्मा शिवडेकर, मुंबई डोंबिवलीतील जुन्या ‘समर्थ समाज’ या शिक्षणसंस्थेवर आपलाच वरचष्मा राहावा यासाठी शिवाजीराव जोंधळे आणि समीर जोंधळे या पितापुत्रांमध्ये जुंपलेल्या भांडणाचा नाहक मनस्ताप संस्थेच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या १३४ विद्यार्थ्यांना सोसावा लागतो आहे. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी संस्थाचलित ‘एस. एच. जोंधळे पॉलिटेक्निक’मध्ये मेकॅनिकल, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या तीन अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मान्यतेची फाईलच अडवून ठेवली आहे. |
जालंधर, २५ ऑक्टोबर २०१२ हास्यकलाकार जसपाल भट्टी यांचे आज (गुरूवार) पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. भट्टी हे आपला आगामी चित्रपट 'पॉवर कट'च्या प्रसिद्धीसाठी नाकोदार येथून भटिंडा येथे जात होते, त्यावेळी हा अपघात घडला. अपघातात भट्टी यांचा मुलगा जसराज आणि अभिनेत्री सुरिली गौतम हे दोघेही जखमी झाले आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|