|
स्वस्त एसएमएसवर र्निबध येणार |
|
|
पीटीआय, नवी दिल्ली उत्पादनांच्या प्रचारार्थ मोबाइलधारकांना दर पाच मिनिटांना एसएमएस पाठवणाऱ्या कंपन्यांना लगाम घालण्यासाठी भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आता प्रत्येक सिमकार्डवर दिवसाला फक्त १०० एसएमएसच पाठवण्याचे बंधन लागू केले आहे. त्यापुढील प्रत्येक एसएमएसला ५० पैसे आकारले जाणार आहेत. १५ दिवसांत ही बंधने लागू केली जाणार आहेत.
|
|
स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा 'आयक्यू' सारखा - गडकरी |
|
|
भोपाळ, ५ नोव्हेंबर २०१२ स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डाँन दाऊद इब्राहिम यांची बौध्दिक क्षमता (आयक्यू) सारखी आहे, पण विवेकानंद यांनी आपल्या बुद्धीचा वापर समाज आणि देशहितासाठी केला तर दाऊदने आपल्या बुद्धीचा वापर गुन्हेगारी जगतात केल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले आहे.
|
पाकिस्तानबरोबरचे क्रिकेट सामने उधळून लावा! - शिवसेनाप्रमुख |
|
|
मुंबई, ५ नोव्हेंबर २०१२ भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात भारतात होणा-या भारत-पाकिस्तान सामन्यांना शिवसेनेने नेहमीप्रमाणे आपला विरोध दर्शवला असून, पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' या दैनिकातून आज बाळासाहेबांनी कडक बोल सुनावले आहेत.
|
|
काँग्रेसने कंबर कसली! |
|
|
* एफडीआय समर्थनार्थ महारॅलीतून शक्तिप्रदर्शन * ‘रामलीला’वरून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२ महागाई, भ्रष्टाचार यांमुळे आक्रमक झालेले विरोधी पक्ष आणि आर्थिक सुधारणांच्या मुद्दय़ावर घटक पक्षांतूनही उमटत असलेला नाराजीचा सूर या दोन्ही गोष्टींमुळे राजकीय अस्थिरतेकडे वाटचाल करीत असलेल्या सत्ताधारी काँग्रेसने रविवारी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर विराट रॅलीद्वारे २०१४च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
|
मग गुंडांसोबत राहिलात कशाला? |
|
|
शरद पवार यांचा मुख्यमंत्री-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना टोला
वार्ताहर, कराड ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुंड आहेत’ या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी आपल्या मित्रपक्षावर चांगलीच टोलेबाजी केली. ‘सात-आठ वर्षे गुंडांच्या सोबत का राहिलात?’ असे माणिकरावांना सुनावतानाच ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते जनतेतून निवडून येतात, वरून येत नाहीत. असा टोला पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही फिरकी घेतली.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 6 of 53 |