|
भवताल : देशी जनावरं कालबा? |
|
|
अभिजित घोरपडे - गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एकीकडे शेतीची तंत्रं बदलली, दुसरीकडे शहरांच्या गरजा वाढल्या. मग अधिक दूध देणारे संकरित वाणच उपयुक्त ठरू लागले.. पण संकरासाठी तर अस्सल देशी वाण टिकवायला हवेत, अशी परिस्थिती आता आली आहे.. देशात असलेल्या जनावरांच्या गणनेचे आकडे नुकतेच उघड झाले. त्यात अपेक्षेप्रमाणे देशी जनावरांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसले.
|
|
भवताल : गोष्ट छोटी.. डोंगराएवढी! |
|
|
अभिजित घोरपडे - गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भारतीय झाडांऐवजी परदेशी झाडे आवर्जून लावली जातात.. कधी रस्त्यांची शोभा वाढवण्यासाठी, तर कधी वनीकरण दिसले पाहिजे म्हणून! पण झाडांमध्ये ‘स्वदेशी’चा आग्रह आपण जपला, तर त्या झाडांना घर मानणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना अधिक उपकारक ठरेल.. हैदराबादला नुकतीच जैवविविधतेवरील आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्यात या विषयात काम करणारे देशोदेशीचे हजारो तज्ज्ञ, अभ्यासक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. जैवविविधतेवर आलेले संकट ही वस्तुस्थितीच आहे. प्राणी-पक्षी, वनस्पती व इतर जिवांच्या प्रजाती नामशेष होत असल्याचे संकट आहेच.
|
भवताल : नद्या.. वाळूविना! |
|
|
अभिजित घोरपडे , गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नदीपात्राची झीज रोखण्याचं आणि नदीला जिवंत ठेवण्याचं काम करणारी वाळू प्रचंड प्रमाणावर उपसली जाते आहे.. नदीत वाळू येते कशी, हे लक्षात घेतल्यास आज उपसलेली वाळू येत्या काही वर्षांत भरून येणार नाही, हेही उघड आहे..
|
|
भवताल : हक्क आणि शिस्त |
|
|
अभिजित घोरपडे, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२ abhijit.ghorpade@expressindiacom
जायकवाडी , उजनी पाणीवाटपाचे वाद पेटल्यावर दरवर्षी आपल्याला पाणी व्यवस्थापनाची आठवण होते. पण हक्कांबद्दल बोलताना शिस्त आणि जबाबदारी विसरलीच जाते. वाढत्या शहरांनी प्रक्रिया केलेले सांडपाणी शेतीसाठी सोडावे ही अपेक्षा यामुळेच कोरडी ठरते!... जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मुद्दय़ावरून नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा यांच्यात जो काही वाद पेटला आहे, तो आणखी लवकर पेटला असता तर बरं झालं असतं. हा वाद उभा राहिला त्याच्या मुळाशी अनेक कारणं आहेत.
|
भवताल : पावसाचा काळ बदलतोय? |
|
|
अभिजित घोरपडे - गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ऑक्टोबरातल्या पावसानं महाराष्ट्रभर हजेरी लावली, विदर्भाला तर दिलासाच दिला.. पुण्यात ऑक्टोबर हा पावसाचाच महिना मानावा लागतो आहे.. हा बदल कधी झाला? ‘२०० वर्षांत दोन आठवडय़ानं पुढे’ सरकणाऱ्या पावसाळ्यानं चाल बदललीय का? या वेळचा पावसाळा अनेक दृष्टीनी वेगळा ठरला. इतका की मोसमी पावसाने त्याचे सर्वच वेळापत्रक झुगारून दिलं. आता तर निम्मा ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस पूर्णपणे थांबल्याची खात्री देता येत नाही. उकाडय़ाने दुपापर्यंत हैराण केल्यानंतर कधी आणि कसा पाऊस पडेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
|
Page 1 of 4 |