|
भवताल : ..असे पुनर्वसन तुम्ही स्वीकारले असते ? |
|
|
संजीव साने, गुरुवार, १६ ऑगस्ट २०१२
‘बारवी धरण दुप्पट होण्याचा मार्ग मोकळा’ या मथळ्याखाली आलेली बातमी (लोकसत्ता ठाणे तसेच मुंबई वृत्तान्त, १ ऑगस्ट) मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर व त्या परिसरातील वाढत्या नागरीकरणाचे फायदे घेणाऱ्यांना सुखकारक निश्चितच आहे, पण मुरबाड तालुक्यातील ज्या ग्रामीण जनतेने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशी वाद घालून आमदार किसन कथोरे यांच्या मध्यस्थीमुळे ३० कोटींचे पॅकेज स्वीकारले ते किती अत्यल्प आहे हे त्याचे तपशील बघितले तर लक्षात येते. यातूनच असे पुनर्वसन महानगरातील जनतेने स्वीकारले असते का? हा प्रश्न उपस्थित होतो.
|
|
भवताल : संवर्धनातील गुंतागुंत |
|
|
अभिजित घोरपडे - गुरुवार, ९ ऑगस्ट २०१२ abhijit.ghorpade@expressindiacom
संवर्धनामध्ये प्राधान्य कोणाला- दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूंना की त्यात राहणाऱ्या वटवाघळांसारख्या महत्त्वाच्या जीवांना? हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. आपण दोन्ही वारशांचे इतके नुकसान केले आहे, की आता एकाच्या संवर्धनाचा दुसऱ्यावर विपरीत परिणाम होणार हे स्पष्टच आहे. दिवसेंदिवस ही गुंतागुंत अधिकच वाढणार आहे आणि संवर्धनाचे मुद्दे आतापेक्षा कितीतरी पटींनी किचकट बनणार आहेत..
|
भवताल : पुनरागमनाचा संदेश! |
|
|
अभिजित घोरपडे - गुरुवार, २ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मान्सूनचा पाऊस कधीच सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी होत नाही, असा इतिहास आहे.. तो गेल्या तीन दिवसांत राज्यभर झालेल्या पावसाने यंदाही खरा ठरू लागेल. पाऊस आला की दुष्काळ विसरला जातो, हा इतिहास मात्र आपण बदलायचा आहे! मान्सून कधीच दगा देत नाही, तो येतो आणि त्याच्या वाटय़ाचा पाऊस देऊन मगच माघारी फिरतो.. मान्सूनची नेमकेपणाने ओळख असलेले सर्वजण त्याचे हे वैशिष्टय़ जाणतात. त्याचाच प्रत्यय गेल्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात आला.
|
|
भवताल : कृत्रिम पावसाचं उत्तर? |
|
|
अभिजित घोरपडे, गुरुवार, २६ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आता दुष्काळ पडल्यावर अनेक जण कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी करत आहेत. पण तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखा हा प्रयोग करता येत नाही. त्यासाठी काही वर्षे अभ्यास करावा लागेल. त्यात हा पाऊस फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले तर हा मार्ग चोखाळावा, नाही तर कायमचा विसरून जावा.. देशातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे नुकतेच पंतप्रधानांनीही मान्य केले. देशात सरासरीच्या २२ टक्के अपुरा पाऊस झाला आहे. त्यामुळे दर आठवडय़ाला त्याचा आढावा घेण्याचे आदेशही पंतप्रधानांनी दिले आहेत. महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाही.
|
भवताल : दुष्काळ.. १९७२ ते २०१२! |
|
|
अभिजित घोरपडे - गुरुवार, १९ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
१९७२च्या दुष्काळात जमिनीत पाणी होते, पण ते काढण्याची व्यवस्था नव्हती. आता पाणी काढण्याची सर्व साधने उपलब्ध असली तरी जमिनीत पाणीच शिल्लक राहिलेले नाही. दोन्ही परिस्थितीतील हा फरक जमीन-अस्मानचा आहे.. पावसाने बरीच मोठी उघडीप दिल्यामुळे या वर्षी दुष्काळाची भरपूर चर्चा झाली. कालपासून काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली खरी, पण तो आल्यामुळे किती प्रदेशावरील पाणीटंचाई दूर होईल, हे आताच सांगता येणार नाही.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
|
Page 3 of 4 |