|
वनातलं मनातलं : मानव वन्यजीव संघर्ष.. एक दुखद अध्याय! |
|
|
डॉ.बहार बाविस्कर, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ ९९७५६८०३७५
निसर्गाला ओरबाडता ओरबाडता काय घेऊ अन् किती घेऊ, अशी विमनस्क झालेल्या आजच्या माणसाची विचारशक्ती निसर्गावर नियंत्रण कसे ठेवता येईल, यातच खर्ची पडत आहे. प्रचंड मोठाली डोंगरं पोखरून मोठमोठी धरणं बांधायची, या कर्तृत्वपूर्तीच्या अभिमानाने अभिस्नात व्हायचं अन् पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी निसर्गावर अत्याचार करण्यासाठी नव्या उमेदीनं कामाला लागायचं, ही आपली मानसिकता आपल्यासाठी खूप घातक ठरणार आहे.
|
|
गर्डनिंग : कमी वेळेत फुलवू सुंदर बाग |
|
|
सीमा मामीडवार, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ ९८९०२८५२८६
पर्यावरण किंवा निसर्ग हे शब्द उच्चारले तरी आपल्याला खूप आनंद होतो. झाड, फूल, पशुपक्षी, झरे, नदी ही सगळी आपल्या डोळय़ासमोर येतात. निसर्गाचं संवर्धन करणं आणि निसर्गातला आनंद टिपणं हा छंद खूप मानसिक समाधान देणार आहे. सर्वानीच निसर्गात रमण्याचा आनंद लुटायला हवा, पण आजकाल सगळय़ांचं जीवन इतकं घाईगर्दीचं झालं आहे की, आपल्याला बागेची आवड जरी असली तरी कमी वेळेत हे शक्य होत नाही, असेच नेहमी ऐकिवात येतं.
|
दखल : मनातील ॠतूंच्या नोंदी जपणारी कविता |
|
|
प्रमोद लेंडे-खैरगावकर, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ ९७६७६३६२९१
वसंत वाहोकर हे नाव काव्यक्षेत्रात स्थिरावलेले नाव आहे. वृत्तपत्रीय स्तंभलेखन, कथालेखन, मुलाखतकार, अशा भूमिका ते निभावत वाङ्मय सेवा सातत्याने करीत आहे. ते केवळ हौसेनं लेखन करणारे अर्धकच्च्या वृत्तीचे ते कवी नाहीत. गंभीर, चिंतनशीलतेबरोबरच समकालीन वास्तवदर्शी भान त्यांच्या कवितांना मूलत: प्राप्त झालं आहे. हे भान अभिव्यक्त करताना त्यांचा प्रतिभाधर्म काव्याभिव्यक्तीशी एकरूप झाला आहे. त्यात उपरोधात्मक काव्यशैलीचा वापर करताना ते दिसून येतात.
|
|
जाणिजे जे यज्ञकर्म : आगळावेगळा चारू ताल! |
|
|
संध्या दंडे, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
९२२५६६६८९१ अंगी उपजत कला असली की, त्या कलेशिवाय त्या व्यक्तीचे मन दुसरीकडे लागत नाही. ओढ असते कलेचीच! मग कलेची कोणत्या ना कोणत्या प्रकारात सेवा घडतेच. असंच घडलं चारूदत्त जिचकारांच्या बाबतीत. घरात संगीताचं वातावरण होतचं. आई व बहीण दोघीही संगीत विशारद. साहजिकच चारूदादाही गाणं शिकू लागले. बुलढाण्याला राहत असताना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं वार्षिक संमेलन होतं. त्यात बहीण गाणार होती.
|
चळवळ आणि साहित्य : एका पंढरीनाथाची कहाणी |
|
|
प्रा. अजय देशपांडे, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
९८५०५९३०३० ‘पंढरीनाथाचा प्रवास’ हे रमेश राऊत यांनी लिहिलेलं व साक्षात प्रकाशनानं प्रकाशित केलेलं पुस्तक एका अलक्षित आणि वेगळ्या विषयावरचं आहे. काही माणसं आभाळाएवढं कार्य करीत असतात, पण त्याची माहिती आणि महती सभोवतीच्या जगाला माहीत असतेच, असं मात्र म्हणता येत नाही. पंढरीनाथ तुकाराम पाटील ढाकेफळकर ही सामान्य माणसातली असामान्य व्यक्ती होय. या माणसानं मराठा शिक्षण संस्था स्थापन केली. या शिक्षण संस्थेचा वेलु गगनावारी गेला.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>
|
Page 1 of 7 |