|
सांस्कृतिक : सामूहिक कलाविष्काराने गुरूंचे स्मरण |
|
|
मोहन अटाळकर, रविवार, २ सप्टेंबर २०१२ ९४२२१५७४७८
तबलावादनाच्या क्षेत्रात उस्ताद लड्ड मिया खाँ यांनी आपली स्वतंत्र छाप सोडली होती. ज्या कलावंतानं एक पिढी घडवली त्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं शिष्यांनी सामूहिक कलाविष्कार सादर करण्यापेक्षा कोणते मोठे अभिवादन असू शकेल! तबल्यावर उमटलेल्या बोटांच्या आवर्तनातून या शिष्यांनी आपल्या गुरूला श्रद्धांजली वाहिली. एका तालयात्रेत एका ठेक्यावरून दुसऱ्यात जाताना या कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध होण्यास भाग पाडलं.
|
|
चळवळ आणि साहित्य : शब्द; नव्या विचार क्रांतीसाठी |
|
|
प्रा. अजय देशपांडे, रविवार, २ सप्टेंबर २०१२ ९८५०५९३०३०
‘कामगार साहित्य: दहा भाषणे’ हे पुस्तक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने २००१ मध्ये प्रकाशित झाले. नारायण सुर्वे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात कामगार साहित्य संमेलनाच्या दहा अध्यक्षांची भाषणे आहेत. सर्वश्री नारायण सुर्वे, बाबुराव बागूल, आनंद यादव, सदा काहाडे, अरुण साधू, उत्तम बंडू तुपे, शिवाजी सावंत, नामदेव ढसाळ, विठ्ठल वाघ, मधू मंगेश कर्णिक यांची अध्यक्षीय भाषणे असलेल्या या पुस्तकाची अर्पणपत्रिका अशी आहे
|
वनातलं मनातलं : आकाशी झेप घे रे.. |
|
|
डॉ. बहार बाविस्कर, रविवार, २६ ऑगस्ट २०१२ ९९७५६८०३७५
अजूनही आठवतोय अमेरिकेत साजरा केलेला १५ ऑगस्ट २०११ चा दिवस अन् ती मनातली हुरहूर. अमेरिकेत राहायला आल्यापासून दिवस भराभर पळत होते. तशीही एकंदरीत अमेरिकन जीवनशैलीच खूप पळणारी आहे. ‘थांबला तो संपला’ हा नियम इथं जरा जास्तच काटेकोरपणे पाळला जातो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब होती ती म्हणजे ओक्लाहोमा हे राज्य तसं शांत होतं आणि मी रहात होतो ती जागा म्हणजे ‘स्टीलवॉटर’ तर आणखीनच शांत होती. जणू काही एखादं मॉडर्न खेडं. न्यूयॉर्क, कॅलिफोíनयासारख्या शहरांमध्ये आढळून येणारी प्रचंड गर्दी इथं नाही, पण तरीही लोकांची कार्यशैली एकदम व्यस्त.
|
|
दखल : युगवाणीचा ‘ग्रेस’फुल विशेषांक |
|
|
ज्योती तिरपुडे, रविवार, २६ ऑगस्ट २०१२ ९४२१८०१८७८
विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या वाङ्मयीन नियतकालिकाने ग्रेस विशेषांक प्रकाशित करून ग्रेस यांच्या आकलनीय आणि अनाकलनीय पैलूंना ताजेतवाने केले आहे. ग्रेस जिवंत असताना अनेक मंडळींच्या लेखण्या मौन बाळगून होत्या, मात्र त्यांच्या मृत्यूनंतर लहान-मोठय़ा व्यासपीठांवरून त्यांच्यावर बोलण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ग्रेस यांच्या मी किती जवळ होतो आणि मला ग्रेस कित्ती समजले, हे सांगण्यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या वाढू लागली.
|
गार्डनिंग : कुंडय़ांची आकर्षक बाग |
|
|
सीमा मामीडवार, रविवार, २६ ऑगस्ट २०१२ ९८९०२८५२८६
जागेच्या अभावामुळे शहरात फ्लॅटमध्ये बागेला पुरेशी जागा नसते. बागेची हौस कमी जागेत पूर्ण करण्याकरिता कुंडय़ांची आकर्षक बाग सहज करता येऊ शकते. लहान मोठय़ा कुंडय़ांमधून निसर्गाला सहज आपल्या घरात फुलवू शकतो. कुंडय़ांच्या बागेचे मुख्य वैशिष्टय़े म्हणजे कुंडय़ा नीट लावून, त्यात अदलाबदल करूनही बागेत नावीन्य आणता येते. रंगीबेरंगी पानाफुलांनी भरलेली कुंडय़ांची बाग सर्वानाच आकर्षित करेल, यात संशय नाही.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 Next > End >>
|
Page 5 of 7 |