जगाविषयी सामान्य ज्ञान Print
संकलन-प्रशांत देशमुख , बुधवार , १३ जानेवारी २०१०
संचालक-संत गाडगेबाबा प्रबोधिनी, मुंबई
फोन - ९९६९५३९०५१/९३७१९१९००६

*    भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.
*    भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.
*    भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.
*    भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.
*    श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
*    नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
*    जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
*    येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
*    जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
*    अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
*    फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
*    व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
*    बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.
*    इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
*    लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
*    नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
*    चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
*    स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
*    केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
*    जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
*    रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
*    नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
*    चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना ‘टायफून’ म्हणतात.
*    स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.
*    दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
*    टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
*    नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
*    तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
*    हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
*    अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान ‘व्हाईट हाऊस’ या नावाने ओळखतात.
*    अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
*    लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
*    दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.
*    मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
*    दुबईतील ‘बुर्ज दुबई’ या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.
*    फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
*    बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.     
*    शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
*    फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
*    ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.
*    बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
*    मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना ‘हाजी’ ही उपाधी दिली जाते.
*    पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
*    लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय ‘स्कॉटलंड यार्ड’ या नावाने प्रसिद्ध आहे.
*    चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
*    बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
*    चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
*    कॅनडा सर्वात लांब रस्ते.
*    जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
*    चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
*    कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
*    ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.
*    भारत चहा उत्पादनात प्रथम.
*    बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
*    घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
*    अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
*    सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
*    क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
*    चिली तांबे उत्पादनात प्रथम.
*    मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
*    कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
*    अमेरिका जगातील सर्वात मोठा अ‍ॅल्युमिनियम उत्पादक देश.
*    कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
*    अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
*    ऑस्ट्रेलियात  जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
*    अ‍ॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
*    इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली ‘डी’ नदी आहे.
*    चीनचे दु:खाश्रू ‘‘हो-हॅग-हो’’ नदीस म्हणतात.
*    इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.
*    जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
*    ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
*    ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला ‘कॅम्पोज’ म्हणतात.
*    दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला ‘प्रेअरीज’ म्हणतात.
*    इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द ऑब्झव्‍‌र्हर’.
*   रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘प्रवदा’
*   अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द वॉशिंग्टन पोस्ट’
*   चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’
*   भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द इंडियन एक्स्प्रेस’
*   व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
*   ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
*   मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.
*   हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
*   केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
*   ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
*   मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
*   अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
*   नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
*   आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
*   रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
*   थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
*   मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
*   जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
*   शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
*   इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
*   जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
*   इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध ‘झुकता मनोरा’ आहे.
*   भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’ ही वास्तू बांधली.