रुपयाचा तीन आठवडय़ाचा नीचांक Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
अमेरिकन अर्थव्यवस्था भक्कम असल्याची आकडेवारी जाहीर झाल्याने गुरुवारी विदेशी चलन व्यवहारात अमेरिकी चलन- डॉलरही भाव खाऊन गेला. परिणामी भारतीय चलन रुपयाने ५४ पैशांची घसरण नोंदवित तीन आठवडय़ांपूर्वीचा तळ गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया ५३.४१ पर्यंत खाली आला. महिनाअखेरपयर्ंत रुपया ५४ पर्यंत घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरुवारी दिवसभरात तो ५३.४३ या नीचांकापर्यंत गेला होता. रुपयाने अलिकडेच म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी ५१.७४ हा सहा महिन्यांचा उच्चांक दाखविला होता.
निकालाआधीच टीसीएसने भाव खाल्ला!
जागतिक शेअर बाजारातील तेजीची साथ मिळाल्याने गुरुवारी ‘सेन्सेक्स’ १८१ अंशांनी वधारला.  देशातील पहिल्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसचे दुसऱ्या तिमाहीचे वित्तीत निष्कर्ष शुक्रवारी जाहीर होत आहेत. टाटा समूहातील या कंपनीने गुरुवारी शेअर बाजारात २ टक्के वाढीची कामगिरी बजावली.