सिंडिकेट बँकेचा शनिवारी स्थापनादिन Print

*  सार्वजनिक क्षेत्रातील सिडिंकेट बँक येत्या शनिवारी, २० ऑक्टोबरला आपला ८८ वा स्थापना दिवस साजरा करीत असून, त्या निमित्ताने देशभरात बँकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सिडिंकेट बँकेच्या मुंबई विभागातर्फे वाशी रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य तपासणी, बोरिवली येथे मोफत रक्त आणि नेत्र तपासणी तसेच चष्मा वाटप आणि उमेळे, नायगाव येथे जिल्हा परिषदेत वृक्षारोपण समारंभ आणि ग्रामसभेचे आयोजन अशा कार्यक्रमांची येत्या शनिवारी आखणी करण्यात आली आहे.