विलासी काळ.. Print

वेळ दाखविणारे उपकरण म्हणून घडय़ाळे ही एक अत्यावश्यक व सर्वापाशी हवी अशी गोष्ट ठरते. गेल्या दीड शतकाहून अधिक काळ घडय़ाळनिर्मितीत असलेल्या स्विस स्वॉच समूहाच्या ओमेगा वॉचेसने विलासी (लक्झरी), ज्वेलरी, स्पोर्ट्स,  डिझायनर आणि आता स्मार्ट अशी मनगटी घडय़ाळांना नवनवी परिमाणे बहाल करीत आणली आहेत. उत्तम कारागिरीचा नमुना असलेली अशी जगातील सवरेत्कृष्ट आणि ऐश्वर्यसंपन्न घडय़ाळे मुंबईकरांना येत्या शनिवार, २० ऑक्टोबपर्यंत नरिमन पॉईंट येथील ‘सीआर२ मॉल’मधील ओमेगाच्या दालनात  सुरू असलेल्या प्रदर्शनात प्रत्यक्षात पाहता येणार आहेत. अगदी ६० लाख रुपये किमतीचे घडय़ाळही यात आहे.