जनकल्याण बँकेच्या ‘ई-लॉबी’चे पनवेलमध्ये रविवारी उद्घाटन Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
दिवसाचे २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवस ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध स्वयंचलित उपकरणाद्वारे कार्यरत असणारी बँकिंग शाखा अर्थात ‘ई-लॉबी’ सुविधा पनवेल शहरात सर्वप्रथम उपलब्ध करून देण्याचा मान जनकल्याण सहकारी बँक पटकावणार आहे. पैसे भरणे व काढणे, पास बुक भरणे, धनादेश भरणे, खाते उतारा तसेच बँकेच्या इतर सेवा-सुविधा व व्यवहार मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये स्वयंचलितरीत्या शक्य करणाऱ्या पनवेलमधील या ‘ई-लॉबी’चे येत्या रविवारी, २१ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. जनकल्याण बँकेच्या विरूपाक्ष मदिराजवळील शाखेमध्ये हा कार्यक्रम होईल. आगामी काळात बँकेची सर्व एटीएम केंद्र ही ‘ई-लॉबी’ सुविधेसह ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस जनकल्याण बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी व्यक्त केला आहे.