श.. शेअर बाजाराचा : परहस्ते गतं धनम् Print

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

कस्तुरचंद प्लँटेशन स्कीममध्ये माझ्या वडिलांनी पसे गुंतविले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी पण आता त्या कंपनीचा पत्ता किंवा फोन काहीच सापडत नाही तेव्हा काय करावे, असे राजेश जडे विचारतात.  या कंपनीसारख्याच अनेक कंपनी सागवान वगरेची लागवड वगरे भूलथापा मारून लाखो रुपये लोकांकडून गोळा करून गायब झाल्या. अशा शेकडो कंपन्यांनी नोंदणी न करताच पसे गोळा करायला सुरुवात केली होती. जनहित ध्यानात घेता नियामक संस्थेने त्याना नोटीसा पाठवून योग्य ती कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत देखील दिली होती. तथापि सुमारे ५२३ कंपन्यांनी दाद न दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई म्हणून लोकांचे पसे त्वरीत परत करावेत असे फर्मान काढले होते.  या बाबतची माहिती http//watchoutinvestors.com/press_release/sebi/2001003.asp या वेब िलकवर मिळू शकते.
 ‘परहस्ते गतं धनम्’ असे म्हणून अनेक लोकांनी यावर उदक सोडले आहे!! जळगाव किंवा पंजाबातील कंपनी मुंबईतल्या माणसांकडून पसे गोळा करून आसाममध्ये सागवानाची लागवड करणार व सागवान मोठा झाल्यावर त्याची लाकडे विकून अनेक पटीने पसे परत करणार हे सांगणारा सांगतो पण ऐकणाऱ्याने त्यावर कितपत विश्वास ठेवावा? त्याने तिकडे झाडे लावली की मुळात नसलेली जमीन विकून टाकली हे पाहायला आसामात आपण जाणार आहोत का हा विचार न करणारे गुंतवणूकदार जिथे आहेत तिथे अशा ठगांचे फावणारच. डॉ. नीळकंठ बापट यांना त्यांच्या ब्रोकरने सांगितले की, एका विवक्षित कंपनीचे शेअर्स ‘एनएसई’वर फक्त ‘खरेदी’ करता येतील व ते शेअर्स ‘बीएसई’वर फक्त ‘विकता’ येतील. ही फसवणूक आहे अशी त्यांची तक्रार आहे. खरे तर जेव्हा एक व्यक्ती शेअर्स खरेदी करते तेव्हा कुणीतरी ते विकलेले असतात म्हणूनच हा व्यवहार पूर्ण होतो. त्यामुळे एखाद्या स्टॉक एक्स्चेंजवर फक्त त्या शेअर्सची खरेदीच होते असे म्हणणे बरोबर नाही. अधिक तपशील मिळाल्यानंतर चौकशी करता असे कळले की, त्या दिवशी त्या कंपनीचे शेअर्स विकायची ऑर्डर टाकली तेव्हा समोर कुणी खरेदीदार नव्हता त्यामुळे ती ऑर्डर      
कार्यान्वित  झाली नाही. योग्यरीत्या ब्रोकरने ही वस्तुस्थिती ग्राहकाला न सांगितल्याने हा गरसमज झाला. पूनम वेरुळकर यांचे बरेच प्रश्न आहेत. कमीत कमी म्हणजे एक हजार रुपये गुंतवणूक करून शेअर बाजारात प्रवेश करायचा त्यांचा मानस आहे. हे शक्य आहे का? नक्कीच.  एखाद्या कंपनीच्या एका शेअरची किंमत एक हजार रुपये असेल तर त्या कंपनीचा एक शेअर तुम्ही घेऊ शकता. शंभर रुपये भाव असेल तर दहा शेअर्स घेऊ शकता. डिमॅट प्रणालीमुळे हे शक्य झाले आहे. पूनमताईंच्या बहिणीचे पॅन कार्ड एका ट्रेिनग कोर्सदरम्यान गहाळ झाले आहे तर काय करावे? त्यांच्या बहिणीने डुप्लिकेट पॅन कार्डासाठी विहित नमुन्यात अर्ज करावा. ९४ रुपये फी असते. सुमारे १५ दिवसात नवीन पॅन कार्ड घरपोच येते. यासाठीचा अर्ज यूटीआयच्या ऑफिसमध्ये किंवा कॉसमॉस बँक अथवा युनियन बँक वगरे बँकात पण मिळतो. गुंतवणूक करण्यापूर्वी काही कोर्स करणे आवश्यक आहे का? अर्थात, किमान माहिती असणे आवश्यकच आहे त्यासाठी माझे विनामूल्य कार्यक्रम नेहमीच होत असतात त्याची माहिती www.cdslindia.com/investor meets इथे मिळू शकते. हे कार्यक्रम विनामूल्य असतात. दोन वर्षांपूर्वी पूनमताईनी डिमॅट खाते उघडण्यासाठी दोनशे रुपये डीपीकडे दिले होते पण आजवर खाते उघडले गेलेच नाही. काय करावे? खाते उघडण्याचा अर्ज भरून दिला की डीपी स्थळप्रत देतो. ती असेल तर संबंधित डिपॉझिटरीकडे तक्रार करू शकता.माधव पेंडसे यांच्याकडे असलेल्या शेअर्स सर्टििफकेटपकी काही शेअर्स हरवले आहेत पण त्याची किंमत सुमारे सहाशे रुपये आहे पण एकूणच प्रचलित कार्यपद्धती व कागदपत्रे त्यावरील स्टँप डय़ुटी  वगरेचा खर्च त्याहूनही जास्त होतो आहे.
 हे चुकीचे नाही काय? इलाज नाही. कारण नियमानुसार जी काही प्रक्रिया आहे ती पार पाडलीच पाहिजे. मात्र यावर पेंडसे यांचा उपाय असा की, तेवढय़ा रकमेचे नवीन शेअर्सच मी विकत घेईन!  कल्पना चांगली आणि व्यवहार्यही आहे. कारण हरवलेल्या शेअर्सवरील डिव्हिडंड अधिक नवीन शेअर्सवरील डिव्हिडंड मिळेल.