रिझर्व्ह बॅंकेने केली सीआरआरमध्ये कपात Print

alt

नवी दिल्‍ली, ३० ऑक्टोबर २०१२
रिझर्व्ह बॅंकेने सीआरआर ०.२५ टक्के कमी करून ४.२५ टक्के केला आहे. ऐन सणासुदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने हा निर्णय घेतल्याने सामान्य नागरिकांना महागाई आणि गृहकर्जाचा वाढता बोजा यातून मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने आपल्या नव्या क्रेडिट पॉलिसीची घोषणा केली आहे. या धोरणानुसार गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर कर्जाच्या मासिक हफ्त्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या धोरणात मासिक हफ्ता कमी होईल, अशी आशा लावून बसलेल्यांची मात्र साफ निराशा झाली आहे. मात्र सीआरआर रेट कमी केल्याने बँकेचे व्याज दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.
रिझर्व्‍ह बँकेने सीआरआर दरात पाव टक्‍क्‍यांची कपात केल्याने नवा दर आता सव्वाचार टक्के असेल. बँकेने २०१२-१३ मधील एकूण देशांतर्गत उत्पादनाचा दर (जीडीपी) ६.५ टक्‍क्‍यांवरून ५.८ टक्‍क्‍यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली आहे. वर्षाअखेर घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक ७ टक्‍क्‍यांवरून ७.५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्‍याची शक्‍यताही बँकेने वर्तविली आहे.