बाजारात नवे काही.. Print

दिवाळीनिमित्ताने रांगोळी संच
यंदाच्या दिवाळीनिमित्ताने रंगोली हॅम्पर योजनेखाली रांगोळीचा संच भेटस्वरुपात देण्यासाठी सादर करण्यात आला आहे. यामध्ये एका ट्रेमध्ये सहा रंगांची रांगोळी, ग्लिटर पॅकेट, पांढरी रांगोळी, एक डस्टर, रंग भरण्यासाठी एक डबा आणि रांगोळी तयार करण्यासाठी बोर्ड यांचा समावेश आहे. मुंबई उपनगरातील विलेपार्ले (पश्चिम) येथील श्रीनाथ शॉपिंग सेंटरमध्ये रांगोळी कलाकृतीच्या दालनात हा रांगोळी संच उपलब्ध आहे. रांगोळी कलाकृतीतर्फे संकेतस्थळाच्या माध्यमातूनही रांगोळी शिकण्याची सुविधा आहे. अनिवासी भारतीय महिलांना याचा मोठा लाभ घेता येईल, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती ‘रांगोळी कलाकृती’च्या स्नेहा सावंत यांनी दिली. अधिक माहिती www.rangolikalakruti.com वर उपलब्ध आहे.

गीतांजलीच्या दागिन्यांवर सवलत
गीतांजली समूहाने यंदाच्या सण-समारंभाच्या निमित्ताने समृद्धी ही विशेष योजना सादर केली आहे. याअंतर्गत समूहातील विविध ब्रॅण्डचे दागिने खरेदी केल्यानंतर त्यावर विशेष सूट मिळणार आहे. समूहाची अस्मी, डीदमस, नक्षत्र, परिणीता, दिया, संगिनी, गितांजली ज्वेल्स, शुद्धी ज्वेल्स आदी ब्रॅण्डअंतर्गत महिलांची आभूषणे आहेत. ही सवलत १५ हजार रुपयांवरील खरेदीवर येत्या १८ नोव्हेंबपर्यंत समूहाच्या विविध दालनांमधून उपलब्ध आहे.

गजाचे सवलतीत दागिने
गजा या तयार दागिने क्षेत्रातील आघाडीच्या ब्रॅण्डने यंदाच्या धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोने आणि हिऱ्यांचा समावेश असलेले दागिने सादर केले आहेत. यामध्ये अंगठी, चेन, बांगडय़ा, कर्णभूषणे आदींचा समावेश आहे. यात घडणावळीवरही ५० टक्क्यांपर्यंतची सूट कंपनीने देऊ केली आहे. कंपनीने तिच्या विविध दालनांमध्ये गजाचे आकर्षक घडणीतील दागिने सवलतीच्या दरात येत्या १३ नोव्हेंबपर्यंत विकण्याचे ठरविले आहे.

पँटिन  ‘नेचर फ्युजन’ मालिका
निसर्ग आणि विज्ञान यांचा मेळ साधणारी अशी उत्पादनांची ‘नेचर फ्युजन’ मालिका केसांच्या निगेचे ब्रॅण्ड पँटिनने सादर केली आहे. अ‍ॅव्होकॅडोचे सत्त्व आणि कॅशियाची फुले या नैसर्गिक तत्त्वांची किमया आणि पँटिनने विकसित केलेले  प्रो-व्ही विज्ञान यांचा मिलाफ असलेले शाम्पू, कंडिशनर आणि इंटेसिव्ह हेअर मास्क अशी तीन उत्पादने ‘नेचर फ्युजन’ मालिकेत प्रस्तुत झाली आहेत. यांच्या वापराने केसांना यापूर्वी कधीही जाणवला नसेल इतका मऊसूतपणा आणि हलकेपणा प्राप्त करून दिले जाईल, असा पँटिनचा दावा आहे.

उषाची ‘प्ले विथ एअर’ ऑफर
सणासुदीच्या काळात उषा पंख्याची खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकाला आपल्या स्वप्नातील घरकुलाचे म्हणजे तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या घर मिळविता येणार आहे. ‘प्ले विथ एअर’ नावाची ऑफर उषा इंटरनॅशनल लि.ने येत्या १५ नोव्हेंबपर्यंत मर्यादीत काळासाठी सुरू केली असून, आपल्या प्रत्येक ग्राहकाला सणासुदीच्या खरेदीचा आनंद दुप्पट करण्याची हमी तिने देऊ केली आहे. कंपनीने आपल्या पंख्यांची नवीन २८ मॉडेल्स या निमित्ताने बाजारात आणली असून, प्रत्येक खरीदल्या जाणाऱ्या पंख्यासोबत असणाऱ्या स्क्रॅच कार्डवर काही ना काही इनामाची हमी दिली आहे.

ईगलच्या नव्या वर्षांची डायरी
आघाडीच्या डायरी निर्माती ईगल प्रेस कंपनीने नव्या वर्षांचा गिफ्ट डायरी सेट प्रकाशित केला आहे. उच्च गुणवत्तेसह नैसर्गिक शेडमध्ये पांढऱ्या कागदांपासून बनविलेल्या या डायऱ्या विविध रंगांमध्ये, उत्कृष्ट लेदर कव्हरसह उपलब्ध आहेत. सोनेरी बाजू आणि वर्तुळाकार कोपऱ्यांसहही त्या आहेत. या डायरींमध्ये विविध व गटवार माहितीसाठी सोय आहे. ५९८, ६३० रुपयांमध्ये या डायऱ्या एक हजारांहून अधिक दालनांमध्ये उपलब्ध आहेत.

फटाक्यांच्या रुपात चॉकलेट
चोकोलाने यंदाच्या दिवाळीनिमित्ताने खास चवींचे चॉकलेट तयार केले आहे. दिवाळीत उडविले जाणाऱ्या फटाक्यांच्या प्रकारावरून त्यांची नावे ठेवण्यात आल्आहेत. चोको स्पार्कल हे डार्क चॉकलेट तर चोको ब्लास्ट हे यम्मी चॉकलेट आहे. रॉकेट रोझ आणि चोको अनार हेही चॉकलेट आहेतच. हे सर्व चॉकलेट २,२९५ रुपयांच्या आकर्षक पॅकमध्ये उपलब्ध आहे. मुंबईतील दोन्ही विमानतळ तसेच कुर्ला (पश्चिम) येथील फिनिक्स मार्केट सिटी या मॉलमधील दालनात ते उपलब्ध आहे.

अमेरिकन टूरिस्टरच्या नव्या बॅगा
अमेरिकन टूरिस्टरने यिन-यॅन्ग नावाने नव्या बॅग कलेक्शनची श्रेणी सादर केली आहे. ‘जोडी ऑफर’ अंतर्गत कंपनीने यंदाच्या सणांच्या निमित्ताने विशेष सवलतीत हे उत्पादन देऊ केले आहे. या दोन्ही बॅगांचे डिझाईन त्यांच्या आकाराप्रमाणेच भिन्न आहे. विविध आकर्षक रंगातही ही उत्पादने उपलब्ध आहेत. मर्यादित कालावधीसाठी सूट असून बॅगांच्या किंमती ४,२०० रुपयांपासून पुढे आहेत. अमेरिकन टूरिस्टरच्या दालनांमध्ये ते उपलब्ध आहेत.

नोकियाचे आशा टच मोबाईल
नोकिया कंपनीने आशा हे टच प्रकारातील नवे मोबाईल सादर केले आहेत. आशा ३०८ आणि आशा ३०९ या नावाच्या या मोबाईलद्वारे वेबचा उपयोग करणे सुलभ होते. मॅप, अ‍ॅप्स, म्युझिक तसेच गेम्स खेळण्याची सुविधाही यात आहे. एकेरी तसेच डय़ुएल सिमचा पर्याय असलेल्या या मोबाईलची किंमत ६,१४९ आणि ६,३४० रुपये आहे. काळा आणि सोनेरी रंगात आशा मोबाईल उपलब्ध आहेत.

अमेरिकन टूरिस्टरच्या नव्या बॅगा
अमेरिकन टूरिस्टरने यिन-यॅन्ग नावाने नव्या बॅग कलेक्शनची श्रेणी सादर केली आहे. ‘जोडी ऑफर’ अंतर्गत कंपनीने यंदाच्या सणांच्या निमित्ताने विशेष सवलतीत हे उत्पादन देऊ केले आहे. या दोन्ही बॅगांचे डिझाईन त्यांच्या आकाराप्रमाणेच भिन्न आहे. विविध आकर्षक रंगातही ही उत्पादने उपलब्ध आहेत. मर्यादित कालावधीसाठी सूट असून बॅगांच्या किंमती ४,२०० रुपयांपासून पुढे आहेत. अमेरिकन टूरिस्टरच्या दालनांमध्ये ते उपलब्ध आहेत.

कॅचचे नवे पेय
विविध फळ आणि चवीचे मिश्रणातून थंड सरबत सादर करण्याचा प्रयत्न म्हणून कॅचने ‘मिक्स एन ड्रिंक’ प्रकारातील ‘पियोज’ हे नवे पेय बाजारात दाखल केले आहे. यामध्ये चटपटा जलजीरा, खट्टा मीठा आम पन्ना, सदाबहार निंबू पानी, टिंगलिंग ऑरेन्ज आदी विविध चव प्रकारातील पेय आहेत. पेलाभर पाण्यात कॅच पियोजचे सॅशे मिसळून चविष्ट सरबत तयार करता येते. हे मिश्रण प्रति सॅशेसाठी ३ रुपयांपासून उपलब्ध आहे.

जेलस २१ महिलांचे तयार कपडे
जेलस २१ या महिलांसाठी हिवाळी पोषाख असणाऱ्या ब्रॅण्डने नवे कलेक्शन सादर केले आहे. जीन्स प्रकारातील वस्त्रप्रावरणे बनविणारा हा आघाडीचा ब्रॅण्ड आहे. रेन्बो जिनी, फ्लिर्टी फ्लोरल, क्रेझीकलर, ईल स्ट्रेको, केलिडोस्कोप आदी नावाने नवी पोषाख रचना बाजारात आणली गेली आहे. या तयार कपडय़ांच्या किंमती १ हजार ते ४ हजार रुपयां दरम्यान आहेत.

हायपरसिटीमध्ये सवलतीत वस्तू
हायपरसिटी या रिटेल क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने यंदाच्या सणानिमित्ताने विविध वस्तूंवर आकर्षक सवलतींचा वर्षांव केला आहे. यामध्ये स्वयंपाक घरात लागणाऱ्या बहुपयोगी वस्तूंपासून ते दिवाणखान्यातील विविध शोभेच्या तसेच बैठकीच्या वस्तू उपलब्ध आहेत. विद्युत उपकरणे, झोपण्याच्या खोलीतील विविध वस्तू यांचाही यात समावेश आहे. शिवाय येथे एक हजार रुपयांहून अधिक होणाऱ्या खरेदीवर अतिरिक्त खरेदीसाठी गिफ्ट व्हॉऊचरही मिळणार आहेत.

‘विशेष’ मुलांची सणावळीची साधने
जगण्याला नवी उभारी, नवी नव्हाळी आणते घरोघरी लखलखती दिवाळी असे म्हटले जाते. ठाण्यातील ‘जिव्हाळा ट्रस्ट’द्वारे संचालित ‘उभारी’ या व्यवसाय कार्यशाळेने गतिमंद मुलांच्या कसब-कौशल्यातून सणासुदीत समाजातील जिव्हाळा वाढीवा लागावा असा प्रयत्न चालविला आहे. ‘उभारी’मध्ये या विशेष मुलांनी बनविलेल्या उदबत्त्या, बांधणीच्या डिझायनर पणत्या, दिवे, उटणे, रांगोळी, खडू, कागदी पिशव्या वगैरे सणावळीच्या साधनांची निर्मिती केली जाते व त्यांच्या वाजवी दरात विक्रीचा उपक्रमही गेले काही वर्षे राबविला जात आहे. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये गाळा क्रमांक ८ मध्ये वर्षभर मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याच्या या उपक्रमात यंदा द्रोण बनविण्याचे मशीनही बसविले गेले आहे. दोन-तीन महिन्यांच्या प्रशिक्षणातून ही विशेष मुले आपापल्या घरातूनही हा उपक्रम सुरू करू शकतील, असे ‘उभारी’च्या संचालिका जयश्री रूके यांनी सांगितले. अधिक तपशिलासाठी त्यांच्याशी फोन- ९९८७२६७२९४ वर संपर्क साधता येईल. विशेष मुलांना स्वत:च्या पायावर उभी करण्याच्या आणि त्यायोगे त्यांच्या सामाजिकीकरणाच्या ‘उभारी’च्या प्रयत्नाला समाजातून जास्तीत जास्त पाठबळ मिळावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

आरोग्यवर्धक ‘कॅलिफोर्निया प्रून्स’
शहरवासियांची तणावपूर्ण दिनचर्या पाहता, कॅलिफोर्निया प्रून बोर्डाने अलीकडेच ‘प्रून्स’ या फलाहाराच्या पौष्टिकतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विख्यात आहारतज्ज्ञ नैनी सेटलवाड यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दैनंदिन आहारामध्ये कॅलिफोर्निया प्रून्सच्या समावेशवर भर देत सेटलवाड यांनी त्यात संतुलित तरीही स्वादिष्ट आहाराचे सर्व गुण समाविष्ट असल्याचे सांगितले. उर्जेने परिपूर्ण असा हा फलाहार आहेच, शिवाय कोलेस्टरॉल कमी करण्यास, रक्तदाबाच्या संतुलनास व परिणामी हृदयरोगाचा धोका करण्यास ते मदतकारक असल्याचा त्यांनी दावा केला.