‘सीएफएसएल’चे खाद्य घटकांमधील जागतिक अग्रणी कंपनी बनण्याचे लक्ष्य Print

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
खाद्य उत्पादनातील अ‍ॅण्टिऑक्सिडंट बनविणारी सर्वात मोठी कंपनी असलेल्या कॅम्लिन फाइन सासन्सेस लि. (सीएफएसएल)ने आगामी काळात खाद्याशी संबंधित उत्पादनांची संख्या अधिकाधिक वाढवून, खाद्य पुरवठा पुरवठा क्षेत्राची अग्रेसर कंपनी म्हणून विकसित होण्याचे नियोजन आखले आहे. कंपनी बेकरी, कन्फेक्शनरी, डेअरी व पेय उद्योगांमध्ये वापरण्यात येणाऱ्या नवनवीन घटकांचा विकासासाठी प्रयत्नरत आहे. अत्याधुनिक खाद्य वापर प्रयोगशाळा व तपासणी सुविधाही कंपनी सुरू करीत आहे, अशी माहिती सीएफएसएलचे मुख्य वित्तीय अधिकारी डी. आर. पुराणिक यांनी माहिती दिली. ३० सप्टेंबर अखेरच्या सहामाहीत कंपनीने रु. १६०.०२ कोटींच्या विक्रीतून, ११.८८ कोटींचा करपूर्व नफा कमावला आहे. आधीच्या वर्षांच्या तुलनेत नफ्यात १५.८३ टक्क्यांची वाढ कंपनीने साधली आहे. अलीकडेच कंपनीचे ब्राझील, लॅटिन अमेरिकेमध्ये विपणन कार्यालय सुरू झाले आहे.