निवृत्तीवेतन १,००० रुपयांपर्यंत होणार Print

पीटीआय
थिरुअनंतपुरम
सध्या अनेक क्षेत्रात असलेले ५० ते ३०० रुपयांचे निवृत्तीवेतन एक हजार रुपयांपर्यंत नेण्याच्या प्रस्तावावर कामगार खाते विचार करत असल्याची माहिती या खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री कोडिक्कुन्नील सुरेश यांनी येथे दिली.
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत १,००० रुपये निवृत्ती वेतन देण्याचा कामगार खात्याचा प्रस्ताव सध्या केंद्रीय अर्थखात्याच्या विचारार्थ प्रतिक्षित आहे; त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचेही लवकरच शिक्कामोर्तब होईल, असे त्यांनी सांगितले. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी निवृत्तीधारक संघटनेसह अनेकांनी आपल्याला निवृत्तीवेतनाची रक्कम वाढविण्याबाबत आग्रह केला असून ही रक्कम १,००० रुपयांपर्यंत वाढविण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. सध्या ५० ते ३०० रुपयांपर्यंतचेच वेतन मिळते. संघटनेने त्याबाबत ३,००० रुपयांची मागणी केली होती.