नव्या विडोंज ८ साठी ‘मोबाइल ट्रेडिंग अ‍ॅप’ही दाखल Print

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
मायक्रोसॉफ्टने अलीकडे ‘विंडोज ८’ ही नवीन कार्यप्रणाली दाखल केली आणि तिच्याशी मेळ साधणाऱ्या ‘फ्लिप मी’ हे विंडोज ८ शी सुसंगत मोबाईल ट्रेडिंग अ‍ॅप्लिकेशन (अ‍ॅप) प्रस्तुत करण्यात आघाडीची वित्तीय सेवा कंपनी जिओजित बीएनपी परिबाने आघाडीही घेतली.
हे अ‍ॅप ‘विंडोज स्टोअर’मधून डाऊनलोड करता येईल. ‘फ्लिप मी’ हे असे पहिले मोबाईल ट्रेडिंग अ‍ॅप आहे ज्यायोगे मुंबई (बीएसई) तसेच राष्ट्रीय (एनएसई) या दोन्ही विद्यमान शेअर बाजारावर खरेदी-विक्रीच्या ऑर्डर्स दाखल करण्याची ग्राहकांना सुविधा मिळेल.
हे अ‍ॅप्लिकेशन डेस्कटॉप पीसीवरील वापराप्रमाणे मोबाईल उपकरणावर तितक्याच सफाइदारपणे वापरात येईल. एकापेक्षा अधिक मार्केट व्ह्यूज्सह विनाविलंब अपडेट्स, कॅश आणि डेरिव्हेटिव्हज् प्रकारात कोणत्याही एक्स्चेंजवर खरेदी अथवा विक्री ऑर्डर्स दाखल करणे, आपल्या ऑर्डर बुक आणि ट्रेड बुकचा हवा तेव्हा पडताळा वगैरे सुविधांचा ‘फ्लिप मी’चे वापरकर्ते विस्तारलेल्या सुरक्षित वातावरणात लाभ घेऊ शकतील. त्याचप्रमाणे फ्लिप मीवर ऑफलाइन ऑर्डर नोंदविण्याचीही सुविधाही दिली गेली आहे, ज्यातून गुंतवणूकदारांना बाजाराचा कार्यकालावधी संपल्यानंतरही आपल्या सोयीनुसार ऑर्डर्स नोंदविता येतील. तर बाजार सुरू असताना फ्लिप मीचे वापरकर्ते अस्सल व्हॉइस कॉल्सद्वारे जिओजित बीएनपी परिबाच्या टेली-ट्रेडिंग सेंटरशी संवादही साधू शकतील.