रुपया दुसऱ्यांदा आपटला Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण पुन्हा एकदा त्याच्या ऐतिहासिक नीचांकाकडे प्रवास करू पाहतेय. भारतीय चलनातील गेल्या काही दिवसातील घसरणीने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी ८० पैशांनी अधिक विस्तारत रुपयाला ५४.६१ या किमान स्तरावर आणून ठेवले. यामुळे रुपया तर गेल्या दोन महिन्यांच्या नीचांक पातळीवर आला असून २०१२ मधील तर त्याने दुसरी सर्वात मोठी आपटी खाल्ली आहे.
रुपयाने सर्वात खालचा स्तर जून २०१२ मध्ये गाठला होता. २७ जून रोजी व्यवहारात ५७.३० पर्यंत खाली गेलेला रुपया २२ जून रोजी सत्राअखेर ५७.१५ या ऐतिहासिक नीचांक पातळीपर्यंत आला होता.
याचदिवशी रुपयाने यापूर्वीची सर्वात मोठी ८५ पैशांची घसरण नोंदविली होती. तर ८ ऑक्टोबर रोजी त्याने आजच्यापेक्षा कमी, ७९ पैशांची घसरण राखली होती. १३ सप्टेंबर रोजी रुपया ५५.४३ या खालच्या स्तरावर होता.