रोजगार संधी Print

सोमवार, १७ सप्टेंबर  २०१२
‘सीएसआयआर’ची नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ‘नेट’ परीक्षा : अर्जदारांनी केमिकल सायन्सेस, अर्थ सायन्स, अॅटमॉस्फेरिक व ओहान सायन्सेस, लाइफ सायन्सेस, गणित, भौतिकशास्त्र व तंत्रज्ञान- अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील बीई/बीटेक्. पदवी अथवा एमबीबीएससारखी पात्रता परीक्षा ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १८ ते २४ ऑगस्ट २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सीएसआयआरची जाहिरात पाहावी अथवा सीएसआयआरच्या www.csirhrdg.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१२.
भारतीय खाद्य निगममध्ये तांत्रिक विभागात १६५२ जागा : अर्जदारांनी कृषी, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, बॉटनी, अन्न विज्ञान, कृषी अभियांत्रिकी यांसारख्या विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा २६ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’ च्या २५ ते ३१ ऑगस्ट २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय खाद्य निगमची जाहिरात पाहावी अथवा निगमच्या http://ssconlinenic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१२.
आयुध निर्माणी- इटारसी येथे कुशल कामगारांच्या १४५ जागा : उमेदवारांनी १० वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय इलेक्ट्रिशियन, फिटर, बॉयलर, फिटर, रेफ्रिजरेशन, इलेक्ट्रॉनिक्स, टर्नर, बॉयलर अटेंडंट वा इन्स्ट्रुमेंट फिटर यांसारख्या विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी-इटारसीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, आयुध निर्माणी, इटारसी (म.प्र.) ४६११२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१२.
नॅशनल फर्टिलायझरमध्ये टेक्निशियन्सच्या पाच जागा : अर्जदारांनी इन्स्ट्रमेंटेशन वा इलेक्ट्रॉनिकमधील पदविका पात्रता कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल फर्टिलायझर लिमिटेडची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या www.nationalfurtilizers.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण तपशील व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, विजयपूर, जि. गुणा (म. प्र.) ४७३१११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१२.
पदवीपूर्व इंजिनीयरिंग विद्यार्थ्यांसाठी सैन्य दलात ६० जागा : अर्जदार सिव्हिल, आर्किटेक्चरल, इलेक्ट्रिक, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रॉनिक, कम्युनिकेशन, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीयरिंग वा संगणक इंजिनीयरिंगच्या पदवीपूर्व परीक्षेला २०१२-२०१३ सत्रात बसलेले असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. वयोमर्यादा २४ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ११ ते १७ ऑगस्ट २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाचा www.joinindiaarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१२.
युनायटेड बँकेत खेळाडूंसाठी कारकुनांच्या १५ जागा : अर्जदारांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी फुटबॉल, क्रिकेट, बॉक्सर, रेसलर यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले असायला हवे. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली युनायटेड बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या www.unitedbankofindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०१२.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय अर्थ/सांख्यिकी सेवा परीक्षा- २०१२ अंतर्गत ६० जागा : भारतीय अर्थ-सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्थशास्त्र, अप्लाइड इकॉनॉमिक, बिझनेस इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिट्रिक्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रता तर भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांनी सांख्यिकी, गणित, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१२.