स्थापत्य अभियांत्रिकीत संधींचा सुकाळ Print

सुधीर मुकणे ,सोमवार,१७ सप्टेंबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जगभरात विविध शास्त्रे व त्यांच्या विद्याशाखांचा उत्तम विकास होत आहे. यात ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ क्षेत्राचा वाटाही लक्षणीय आहे. पायाभूत सुविधा- मोठमोठे राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, पूल, पसरलेले रेल्वेचे जाळे, धरण, विमानतळ, पाणीपुरवठा योजना, असंख्य इमारती अशा निर्मितीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेची भूमिका महत्त्वाची ठरते. या विद्याशाखेचा विकास आणि विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत.

रोजगार, नोकरी, स्वयंरोजगार, संशोधन अशा सर्वच क्षेत्रात स्थापत्य अभियांत्रिकीचा आवाका वाढत असल्याने या विद्याशाखेचे महत्त्व वाढत आहे. kEveryone 'uses Civil Work, So everyone is a user'  अशी ख्याती असलेली ही स्थापत्य अभियांत्रिकीची विद्याशाखा प्रत्येक व्यक्तीच्या घराचे स्वप्न पूर्ण करत असते. तर अशा स्वप्नवत असलेल्या वस्तूंची निर्मिती व उभारणी या गोष्टीला आज अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
शैक्षणिक पात्रता
शासकीय तंत्रनिकेतन तसेच खासगी संस्थामधून स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो आणि हा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर स्थापत्य अभियंता पदवी प्राप्त होते.
करिअरच्या संधी
स्थापत्य अभियांत्रिकी ही विद्याशाखा प्रामुख्याने बांधकाम क्षेत्राशी संबंधित असल्याने बांधकामासाठी लागणारे साहित्य, यंत्रसामग्री, मनुष्यबळ, कामाचे नियोजन, रेखाटन, सर्वेक्षण, संबंधितांच्या लागणाऱ्या मंजुरी, त्यासाठी करावे लागणारे मोजमाप-मूल्यांकन, काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन व पूर्ण झाल्यावर करावी लागणारी देखभाल-दुरुस्ती आदी विषयांचा अभ्यास या विद्याशाखेत करून आवडीच्या क्षेत्रात काम करता येते.इमारत बांधकाम क्षेत्रात दोन प्रकारचे काम करता येते. १)कार्यालयीन काम २) साईट काम.
कार्यालयीन कामात इमारतीचे नकाशे बनवणे, आरसीसी डिझाईन करणे, मंजुरी मिळवणे, मूल्यांकन करणे आदी कामांचा समावेश असतो तर साईटच्या कामात नकाशानुसार इमारत बांधणी-उभारणी करणे, तसेच व्यवस्थापन, नियोजन, देखभाल दुरुस्ती यासारखी कामे करता येतात.
आज या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती असणे अत्यावश्यक ठरते. इमारत मजबूत, टिकाऊ आणि देखणी होण्यासाठी नाविन्यपूर्ण विचार करावा लागतो. काँक्रीट मिक्स डिझाईन, वॉटर-सिमेंटच्या प्रमाणावर नियंत्रण, बांधकाम साहित्याची तपासणी, गुणवत्तेची हमी, भूकंपरोधक बांधकाम यामधील नव्या तंत्रज्ञानामुळे इमारती बांधणी ही अधिक नेमस्त पद्धतीने होऊ शकेल.
साईटवर काम करावे लागते म्हणून टाळाटाळ करण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर उत्तम कमाई शक्य असलेल्या या क्षेत्राकडे नव्या पिढीने वळायला हवे.
इमारत बांधणी पर्यवेक्षक
माल, मजूर व मशिनरी या सर्वाचा सांभाळ करणारा व कामाच्या स्वरूपानुसार त्यांचा योग्य उपयोग करून ‘खरा आउटपुट’ देणारा, अशी विशिष्ट जबाबदारी असलेली ही व्यक्ती म्हणजे ‘साइट सुपरवायझर.’ कामाचे नियोजन इंजिनीअरनी करावे, तर त्या नियोजनाचे खरे काम साइट सुपरवायझरला करावे लागते. प्रत्यक्ष काम करून देण्याची अवघड जबाबदारी हे साइट सुपरवायझर करीत असतात. म्हणून वेगाने चाललेले  इमारतीचे काम होताना दिसत असते.
शैक्षणिक पात्रता- १) कमीतकमी दहावी-बारावी उत्तीर्ण, दहावी व बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थी काही अटींच्या पूर्ततेनंतर या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. इंग्रजी भाषा वाचता, लिहता आले पाहिजे. गणिताचे ज्ञान असावे, कारण माल, मजूर यांच्या कामाचा हिशोब ठेवावा लागतो.
डिप्लोमा प्रोग्रॅम फॉर सिव्हिल सुपरवायझरचे कोर्सेस खालील ठिकाणी आहेत.
० गुरुकुल टेक्निकल हायस्कूल व ज्युनि. कॉलेज. टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुं. ६६.
० सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज, भांडुप (प.).
० शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मिठागर रोड, मुलुंड (पूर्व).
० स्वामी विवेकानंद ज्युनि. कॉलेज, सिंधी सोसायटी, चेंबूर.
० कमला रहेजा विद्यानिधी ज्युनि. कॉलेज, जुहू स्कीम.
० योजना विद्यालय, टाटा पॉवर बस डेपो, बोरीवली (पूर्व).
० शासकीय तांत्रिक विद्यालय, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व).
० इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग इन्स्टिटय़ूट, अशोक सिनेमाच्या बाजूला, दत्त मंदिराजवळ, चेंदणी, ठाणे (प.)
० गुरुकुल टेक्निकल हायस्कूल व ज्युनि. कॉलेज. टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुं. ६६.
वरील सर्वच ठिकाणी दोन वर्षांचा कोर्स असून, प्रत्येकी २५ जागा आहेत. नापास मुलांच्या प्रवेशासाठी शासनाचा अध्यादेश जारी झाल्यावर प्रवेश दिला जाईल. हा कोर्स पूर्ण केल्यावर ‘ज्युनि. इंजिनीअर’ म्हणून कार्यरत होता येते. आपल्याकडे असलेल्या असंख्य बांधकाम कंपन्या, बिल्डर्स, डेव्हलपर्स यांच्या साइटवर नोकरी मिळू शकते. अनुभवानुसार पुढे सिनिअर होऊन स्वतंत्र प्रकल्पसुद्धा सांभाळण्याची जबाबदारी पार पाडता येते. पण त्यासाठी खूप कष्ट करण्याची, मेहनत व प्रामाणिकपणा असल्यास माझ्या मते ती उंची गाठणे सहज शक्य आहे.
विचार करून वेळ घालवण्यापेक्षा, नापास झालेल्यांनी मनात निराशेची भावना काढून टाकून आपल्या आवडीला, आपल्यातील कलेचा उपयोग आपल्या करिअरसाठी करून जीवनात आशेचा किरण जरूर पाहावा. भविष्याकडे चांगल्या दृष्टीने बघून संधीचे सोने केल्याचे भाग्य तेव्हा नक्कीच मिळत असते!