रोजगार संधी Print

सोमवार, २४ सप्टेंबर  २०१२
‘गेल’मध्ये इंजिनीअर्ससाठी एक्झिक्युटिव्हज् ट्रेनी म्हणून संधी :
alt

उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेन्टेशन वा केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी इंडिनय इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटीतर्फे घेण्यात येणारी ‘गेट-२०१३’ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘गेल’च्या www.gailonline.com अथवा ww.gate.iitb.ac.in/gate 2013 या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१२.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या ४०० जागा : अर्जदारांनी सिव्हिल, केमिकल, कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रमेन्टेशन, मेकॅनिकल वा मेटॅलर्जीकल इंजिनीअरिंगमधील पदवी वा पदव्युत्तर परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी वा ते वरील पात्रता परीक्षांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत व त्याशिवाय त्यांनी ‘गेट-२०१३’ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या http://www.gate.iitb.ac.in/gate 2013अथवा www.iocl.com  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१२.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या २५० जागा : उमेदवारांनी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेन्टेशन वा इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या गुणांकासह उत्तीर्ण केलेली असावी व याशिवाय त्यांनी ‘गेट-२०१३’ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या www.hindustanpertroleum.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१२.

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर्ससाठी प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्स म्हणून संधी : अर्जदारांनी बी.ई., बी.टेक्. वा बी.एस्सी. (इंजिनीअरिंग)सारखी पात्रता परीक्षा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पूर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. जे उमेदवार यंदा वरील पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा अर्ज करण्यासा पात्र आहेत. मात्र त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी ६५ टक्के असायला हवी व त्यांनी ‘गेट-२०१२’ ही स्पर्धा पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्याhttp://www.gate.iitb.ac.in/gate 2013 या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१२.

भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये डाक साहाय्यकांच्या ३९८ जागा : अर्जदारांनी बारावीची परीक्षा कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदवीधर असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्ज व माहितीपत्रक ५० रुपये रोखीने भरल्यास महाराष्ट्रातील तालुकास्तरीय टपालघरात उपलब्ध होतील. अधिक माहिती व तपशिलासाठी www.indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज स्पीड पोस्ट वा रजिस्टर्ड पोस्टाने डायरेक्टर, रिक्रूटमेन्ट सेल, नवी दिल्ली मुख्य डाकघर, नवी दिल्ली-११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१२.

आयुध निर्माणी- अंबाझरी, नागपूर येथे कुशल कामगारांच्या ४३१ जागा : अर्जदारांनी १०वीची शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यानंतर बॉयलर अटेंडंट, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोप्लेटर, फिटर, ग्राइंडर, मशिनिस्ट, मॅसन, मिलराइट, पेंटर, टूल मेकर, टर्नर, वेल्डर यांसारख्या विद्यालयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता पूर्ण केलेली असायला हवी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २५ ते ३१ ऑगस्ट २०१२च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- अंबाझरीची जाहिरात पाहावी अथवा आयुध निर्माणीच्या http://www.ofajadmin.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
वरील संकेतस्थळावर संगणकीय पद्धतीने अर्ज करून अर्जाची प्रत आवश्यक त्या डिमांड ड्राफ्टसह जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, अंबाझरी, नागपूर-४४००२१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१२.