रोजगार संधी Print

सोमवार, १ ऑक्टोबर  २०१२
कर्मचारी निवड आयोगाची अनुवादक निवड परीक्षा-२०१२ : अर्जदारांनी इंग्रजी व हिंदी या विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण करून त्यानंतर यापैकी एका विषयातील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी अथवा इंग्रजी-हिंदी-इंग्रजी या विषयांतील भाषांतरविषयक पदविका घेतलेली असावी व त्यांना भाषांतरविषयक कामाचा सुमारे दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती, अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ८ ते १४ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्याhttp://ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ती रिक्रूटमेन्ट टपाल तिकिटे व कागदपत्रांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला माळा, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१२.
आयुध निर्माणी-भुसावळ येथे कुशल कामगारांच्या ४६ जागा : उमेदवारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण करून त्यानंतर मशिनिस्ट, शीट मेटल, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, फिटर इलेक्ट्रॉनिक्स, फिटर-ऑटो, टर्नर, मिलराइट यांसारख्या विषयांतील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ८ ते १४ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी-भुसावळची जाहिरात पाहावी अथवा संस्थेच्या www.ofbh.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१२.
सैन्यदलाच्या शिक्षण विभागात ९२ जागा : या जागांमध्ये ६९ जागा कला विषयासाठी, तर २३ जागा विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी असून त्यासाठी उमेदवारांनी बीए, बीएस्सी, बीसीए व बीएड् अथवा एमए, एमएस्सी, एमसीए यांसारखी पात्रता पूर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १ ते ७  सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाच्या शैक्षणिक विभागाची जाहिरात पाहावी.
जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज महाराष्ट्रातील अर्जदारांनी हेडक्वॉर्टर्स-रिक्रूटिंग झोन, ९, राजेंद्रसिंहजी मार्ग, पुणे-४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१२.
सैन्यदलाची बीएस्सी-नर्सिग व मिडवायफरी प्रवेश परीक्षा २०१२ : सैन्य दलांतर्गत असणाऱ्या आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणजेच एएफएमसी येथे उपलब्ध असणाऱ्या या विशेष पदवी अभ्यासक्रमासाठी अर्जदारांनी १२ वीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय घेऊन व कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व अर्जदार महिला शारीरिकदृष्टय़ा सैन्य दलाच्या नियमांनुसार सक्षम असाव्यात. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ८ ते १४ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाच्या एएफएमसीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील, संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज इन्टिग्रेटेड हेडक्वॉर्टर्स ऑफ एमओडी (आर्मी), डायरेक्टर जनरल ऑफ मेडिकल सव्‍‌र्हिसेस (आर्मी), डीजीएमएस-४बी, एजीज ब्रँच, रूम नं. ४५, एल ब्लॉक हटमेन्ट्स, नवी दिल्ली-११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर २०१२.