‘अॅनालिटिक्स’ शोधणार उमेदवाराच्या क्षमता Print

प्रतिनिधी  ,सोमवार, १ ऑक्टोबर  २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

एखाद्या उमेदवाराच्या क्षमता जोखण्यासाठी कंपन्या आता-आतापर्यंत बऱ्याचअंशी बायोडेटा किंवा रिझ्युमेवर अवलंबून असायच्या. त्यापलीकडे उमेदवारांच्या क्षमता किंवा कवकुवत बाजू लक्षात घेण्यासाठी इतर ताकदीचे पर्यायच नसायचे. यावर उपाय म्हणून अॅनालिटिक्स या विश्लेषण कंपनीने ‘लूक बियॉण्ड रिझ्युमे’ या रिसर्च अॅप्लिकेशनची निर्मिती केली असून यामुळे कंपन्या - संस्था आणि कर्मचारीवर्ग यांना या अॅप्लिकेशनचा उपयोग होऊ शकेल.
‘रेडवूड असोसिएट्स’ या कंपनीने या रिसर्च अॅप्लिकेशनची निर्मिती केली असून गेल्या तीन महिन्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच कंपन्यांमध्ये यासंबंधीचा प्रकल्प राबवला गेला आणि तो कमालीचा यशस्वीही ठरला. सध्याचा ‘लूक बियॉण्ड रिझ्युमे’चा अंदाजित दर ८० टक्क्य़ांपेक्षा जास्त आहे. नजीकच्या भविष्यात याचा वापर विविध कंपन्यांना करता येईल. उदा. शैक्षणिक सल्लागार, आर्थिक सल्लागार आणि आरोग्य सल्लागार.
कंपन्यांकडून त्यांच्या सर्वोत्तम कर्मचाऱ्यांचे ३० सीव्ही, सर्वात कमकुवत असलेल्या ३० कर्मचाऱ्यांचे सीव्हीपासून आणि त्यापाठोपाठ माहीत नसलेले सीव्ही हे ‘लूक बियॉण्ड रिझ्युमे’ला सादर केल्यानंतर ही प्रणाली या माहितीवर काम करते आणि यासंदर्भातील अचूक अहवाल सादर करते.
‘लूक बियॉण्ड रिझ्युमे’च्या प्रणालीमार्फत कंपन्यांना काम करण्यास इच्छुक उमेदवारांची पात्रता लक्षात घेऊन त्यांना जोखणे आणि नेमक्या उमेदवारांना काम देणे शक्य झाले आहे, असे ‘रेडवूड असोसिएट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम मुन्शी यांनी सांगितले.
प्रत्येक संस्था ही आपल्या आदर्श कर्मचाऱ्याचे निकष प्रत्यक्ष माहितीवर न ठरवता आपल्या अंदाजावर ठरवत असते. नोकरीची धरसोड करण्याचा आपल्या देशातील कर्मचाऱ्यांचा दर ३०-५० टक्के आहे. यातून दोन गोष्टींचा संभव आहे- एक म्हणजे आपल्याकडे चित्र योग्य आहे, मात्र माणसे चुकीची आहेत किंवा आपल्याकडे चित्र चुकीचे आहे आणि माणसेही चुकीची आहेत.
कर्मचाऱ्यांची तांत्रिक कौशल्ये वाढीस लागावी, यासाठी कंपन्यांतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यात असे दिसून येते की, तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनेक कार्यक्रम उच्चतम कामगिरी बजावतात आणि त्याबदल्यात कंपनीचीही आगेकूच होते. हे उपक्रम स्पर्धेला चालना देतात आणि नफा वाढविण्यात त्यांना रस असतो. कौशल्य आणि मेहनत या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे कंपनीची कामगिरी उंचावण्यासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र, केवळ एका रिझ्युमेच्या मदतीने कौशल्य आणि मेहनत दोन्ही असलेल्या प्रोग्रामरचा शोध घेणे खरंच शक्य होते?
हा प्रश्न आज शोध आणि निवड पद्धतीमध्ये गुंतागुंतीचा झाला आहे. नोकरी शोधणारे लोक मनुष्यबळ व्यावसायिकांकडे आपल्या की-वर्ड असलेल्या रिझ्युमेंचा पाऊस पाडतात. मात्र ‘लूक बियॉन्ड रिझ्युमे’ची वेबसाइट उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे त्या विशिष्ट संस्थेसाठी उपयुक्त ठरेल, अशा कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी इतर निकष पडताळून पाहण्याची व्यवस्था त्यात आहे. यामुळे नेमक्या उमेदवाराचा शोध घेणे कंपनीला शक्य होते.
कंपनीतील बदलत्या वातावरणानुसार हे सर्च इंजिन स्वत:चे काम बदलत राहते. प्रत्येक नवीन नेमणुकीत सर्वोत्तम व्यक्ती निवडली जाईल, याची काळजी त्यातून घेतली जाते.