रोजगार संधी Print

- द.वा.आंबुलकर,सोमवार,२२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयकर विभागात कर सहायकांच्या २५ जागा : उमेदवाराने कुठल्याही विषयातील पदवीधर व डाटा एन्ट्रीविषयक पात्रता पूर्ण केलेली असून त्याने बँकिंग, गोल्फ, टेबल टेनिस, अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅडमिन्टन, क्रिकेट, हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी यांसारख्या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेले असावे.

 

या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली आयकर विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स (हेडक्वॉर्टर्स- पर्सोनेल), रूम नं. ३७८,  सी. आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली-११०००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१२.
सैन्यदलात शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन योजनेंतर्गत दंतवैद्यांच्या ३६ जागा : अर्जदारांनी बीडीएस वा एमडीएस यांसारखी पात्रता कमीत कमी ५५ टक्केगुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. याशिवाय त्यांनी आवश्यक ती उमेदवारी पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ४५ वर्षे.
अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर जनरल, आर्मड् फोर्सेस मेडिकल सव्‍‌र्हिसेस (डीबीएएएफएमएस-डेंटल), रूम नं. १२, एल ब्लॉक, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, नवी दिल्ली-११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१२.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- मुंबई येथील संशोधकांच्या ९ जागा : अर्जदारांनी एरोस्पेस इंजिनीअरिंग, एन्व्हायरॉन्मेन्ट इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग वा भौतिकशास्त्र यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित विषयातील संशोधनपर कामात रुची असायला हवी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ६ ते १३ ऑक्टोबर २०१२ च्या अंकात प्रसिद्ध झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट- मुंबईची जाहिरात पाहावी अथवा आयआयटीच्या http://www.ircc.iitb.ac.in/RCC-Webpage/md/HRMSLoginPage.job  किंवा http://www.ircc.iitb.ac.in./RCC-Webpage/md/PDF/Application_online.pdf  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१२.
सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख कंपनीत ज्युनिअर टेक्निकल असिस्टन्टच्या ९८ जागा : अर्जदार कृषी विषयातील पदवीधर असायला हवेत अथवा ते प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र वा जीव-रसायनशास्त्र या विषयांचे पदवीधर असायला हवेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी आणि अर्जाच्या नमुन्यासाठी http://jobsapply.in/mrpsu या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१२.