इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीची प्रवेश परीक्षा Print

सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२

इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वैमानिक अभ्यासक्रम पात्रता प्रवेश परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील :
एकूण उपलब्ध जागांची संख्या ८०. यापैकी १२ जागा अनुसूचित जातीच्या, ६ जागा अनुसूचित जमातीच्या तर २२ जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असून, ४० जागा सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
आवश्यक पात्रता :
अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन व कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.
वयोमर्यादा :
अर्जदारांचे वय १७ वर्षांहून कमी नसावे.
निवड प्रक्रिया :
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा निर्धारित परीक्षा केंद्रांवर ९ डिसेंबर २०१२ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये मुंबई परीक्षा केंद्राचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत इंग्रजी, आकलनशक्ती, गणित व भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश असेल व त्याचा स्तर या विषयांच्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना व्यावसायिक विमानचालक अभ्यासक्रमासाठी प्रवेश त्यांच्या मुलाखतीवरील गुणांक व शारीरिक चाचणीच्या आधारे देण्यात येईल. या अभ्यासक्रमाचा कालावधी १८ महिन्यांचा असेल. याशिवाय निवडक व पात्रताधारक उमेदवारांना उडान अकादमीतर्फे घेण्यात येणाऱ्या बी.एस्सी. (एव्हिएशन) या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल.
अधिक माहिती व तपशील :
या अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या १५ ते २१ सप्टेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीची जाहिरात पाहावी अथवा संस्थेचा दूरध्वनी क्र. ०५३५-२४४११४७ वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.igrua.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज दि डायरेक्टर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, फुरसतगंज एअरफिल्ड, छत्रपती शाहू महाराज नगर, रायबरेली (उप्र) २२९३०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०१२.
गणित व भौतिकशास्त्र विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना विमान चालकविषयक अभ्यासक्रम करून आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमाचा अवश्य विचार करावा.