माझा पोर्टफोलियो : बँका आकर्षक! Print

अजय वाळिंबे, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील काही लेखात म्हटल्याप्रमाणे योग्य वेळी शेअर्स खरेदी केल्यास नफा चांगला होऊ शकतो. परंतु ही खरेदीची योग्य वेळ आणि खरेदीनंतर शेअर स्वत:पाशी राखण्याचा योग्य कालावधी हे दोन्ही निर्णय तसे कठीणच. गेले काही महिने आपण चलनवाढ, महागाई, घसरता रुपया, सोन्याचे वाढते भाव, युरोपातील आर्थिक संकट आणि जागतिक मंदी इ. घटना अनुभवतो आहोत आणि त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम आपली अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारावर पडतानाही पाहत आहोत. अर्थात या सर्वाच्या जोडीला कोळसा घोटाळा, टू जी घोटाळा, पेट्रोल-डिझेल वगैरे इंधनादींवर वाढते अनुदान या प्रतिकूल गोष्टी आहेतच. मग अशा वेळी नक्की गुंतवणूक केव्हा, कुठे आणि किती करायची याची चिंता गुंतवणूकदारांना न भेडसावली तरच नवल!
पण इतके दिवस सुस्तावलेल्या केंद्रातील सरकारने अकस्मात जागे होऊन गुरुवार-शुक्रवारी शेअर बाजाराला हव्या असलेल्या महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांची वाट मोकळी करून दिली. आता प्रश्न आहे आज म्हणजे सोमवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँक, व्याजदरात घट करेल काय? चलनवाढ आणि पर्यायाने महागाईवर अंकुश ठेवण्याला आजवर रिझव्‍‌र्ह बँक प्राधान्य देत आली आहे. रिझव्‍‌र्ह बँक यात काही प्रमाणात यशस्वीही ठरली आहे. एका गटाच्या मते रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कमी करणे आवश्यक बनले आहे. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक अवघ्या ०.१ टक्क्यांची वाढ दाखवीत असल्याने चलन पुरवठा वाढणे आवश्यक ठरते. औद्योगिक मंदीचे सावट दूर करण्याकरिता किंवा उद्योगधंद्यांचे कर्ज-थकीताचे (एनपीए)  प्रमाण कमी करण्यासाठीदेखील व्याजदरात घट आवश्यक आहे, असे या गटाचे म्हणणे आहे. मात्र रिझव्‍‌र्ह बँक चलनवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी नक्की काय पावले उचलेल ते आज जाहीर होणाऱ्या पतधोरणातूनच कळेल. पायाभूत क्षेत्र आणि स्थावर मालमत्ता क्षेत्र पार कोलमडले आहेत. व्याजदर कमी झाल्यास या क्षेत्रांना मोठा दिलासा मिळेल.
सध्या सर्वच बँकांचे शेअर्स आणि त्यातही सार्वजनिक बँकांचे अनेक शेअर्स अतिशय आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. वाढलेली अनुत्पादित कर्जे (एनपीए) हे त्यांच्या अनाकर्षकतेचे (पर्यायाने भाव कमी राहण्याचे) प्रमुख कारण असले तरीही वाढलेल्या व्याजदराचा हा परिणाम आहे हे लक्षात घ्यावयास हवे. आजच्या पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर कपात केली नाही तरी आगामी तीन महिन्यांत तरी ती अटळ आहे. म्हणूनच सध्या बँकांचे शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते. बहुतांश बँकांचे शेअर्स त्यांच्या पुस्तकी मूल्यापेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहेत.
(विजया बँकेखेरीज आपण कॉर्पोरेशन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, येस बँक आदींची खरेदी विचारात घेऊ शकता.)     

विजया बँक लि.
सध्याचा भाव     रु. ४४३
वर्षांतील उच्चांक/नीचांक    रु. ५६३/४०७
प्रवर्तक     :    व्हीएसटी समूह
प्रमुख उत्पादन    : टिलर्स, ट्रॅक्टर्स निर्मिती
भरणा झालेले भागभांडवल    :    रु.  ८.६४ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    ५३.८५ %
दर्शनी मूल्य       :     रु. १०
पुस्तकी मूल्य       :     रु. २३७
प्रतिभाग मिळकत (ईपीएस)    :    रु. ६०.९
किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    ७.३ पट