गुंतवणूकभान : लहान मूर्ती,मोठी कीर्ती! Print

वसंत माधव कुळकर्णी ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जानेवारी २०१२ पासून हा स्तंभ लिहायला सुरुवात केल्यापासून आज निर्देशांक सर्वात वरच्या स्तरावर आहे. गुंतवणुकीला लार्ज कॅपने सुरुवात करून नंतर मिडकॅप व शेवटी स्मॉलकॅप या क्रमाने गुंतवणूक करायची असते. याच क्रमाने इथे लिहिले गेले. आणि आज स्मॉलकॅपचा शेवटचा अध्याय लिहिताना निर्देशांक १६ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहे.   
रिझर्व बँकेने तिमाही पतधोरण जाहीर करताना पाव टक्क्यांची रोख राखीव प्रमाणात केलेली कपात अपेक्षितच होती. तरीही ही आश्चर्याचा सुखद धक्का देणारी ठरली. जवळजवळ ठप्प झालेला औद्योगिक निर्देशांक; चालू आर्थिक वर्षांत ओळीने पाचव्या महिन्यात मागणी अभावी घटलेली निर्यात; चलनवाढीचा ७.७% असलेला दर या पाश्र्वभूमीवर रिझर्व बँकेने पाव टक्क्यांची केलेली कपात धाडसी म्हणावी लागेल. सरकारने डिझेलच्या किंमतीत केलेली पाच रुपयांची दरवाढ येत्या काही दिवसात महागाई वाढविणारी ठरणार आहे. परंतु तृणमूल काँग्रेसने काढून घेतलेला सरकारचा पाठिंबा व समाजवादी पार्टीने दिलेल्या पाठिंब्यामुळे राजकीय स्थिरता काही काळ तरी दिसणार आहे. याचे बाजाराने जोरदार स्वागतच केले.  
रिझव्‍‌र्ह बँकेने जी रोख राखीव प्रमाणात पाव टक्क्यांची जी कपात केली. त्याचे दोन अर्थ लावता येतील. पहिला म्हणजे व्याजाचे दर कमी करणे आणि दुसरा बँकांना रु. १७,५०० कोटी उपलब्ध होतील. या तिमाहीत अनुत्पादित कर्जासाठी जी तरतूद करावी लागेल ती तरतूद या उपलब्ध झालेल्या अतिरिक्त निधीतून होऊ शकेल. त्यामुळे बँकाची नफाक्षमता कमी होणार नाही. तसेच रिझर्व बँकेची सध्याची जी महागाई रोखण्याची भूमिका आहे ती सोडून दिल्याचा संकेत गेला असता. तो संकेत जाऊ नये म्हणूनही प्रमुख दर कमी केले नसतील.
सरासरीच्या ९४% झालेल्या पावसाने दुष्काळाचे सावट नाहीसे झाले आहे. तेव्हा येत्या ३० ऑक्टोबरला बँकेची दुसऱ्या तिमाहीसाठी ऋणनिती ठरविण्यासाठी जी बठक होणार आहे त्या बठकीत व्याज दरात अध्र्या टक्क्यांची कपात शक्य आहे, असेच अपेक्षिता येईल. या स्तंभातून अ‍ॅक्सिस बँकेची शिफारस केली होती. ती योग्य होती असे दिसू लागले आहे.
 बिलकेअर लि. :
मागील बंद भाव       :     रु. १७८.८५
वर्षांतील उच्चांक       :      रु. ३६७.५०
वर्षांतील नीचांक      :      रु. ४२१.३१
वर्षांनंतर अपेक्षित भाव :     रु. २२५
बिलकेअर ही औषधांसाठी विशेष प्रकारची आवरण (पॅकेजिंग) बनविणारी कंपनी आहे. ही कंपनी देश विदेशातील ४०० औषध उत्पादकांना आपली उत्पादने विकते. ८५% विक्री या व्यवसायातून येते. औषधांचे गुणधर्म दर्जा उपयुक्तता टिकवण्यासाठी विशेष प्रकारची आवरणे लागतात. यात प्रक्रिया केलेली अल्युमिनियमची फॉईल, दोन आवरणा मध्ये द्रव भरलेली औषधासाठी पिशवी आणि दोन पदरी अल्युमिनियमची फॉईल अशा वेष्टनांचा समावेश होतो. या कंपनीचे ग्राहक भारतासहित युरोप व अमेरिकेतील नामवंत औषध उत्पादक आहेत. या व्यवसायात संशोधन करून विशेष वेष्टने बनवावी लागतात ही आवरणे त्या औषधाचा दर्जा टिकवितात. औषध उत्पादक पसे वाचविण्यासाठी दर्जाशी तडजोड करीत नाहीत.
या कंपनीचा कारखाना शिरोळी राजगुरु नगर,  पुणे येथे असून कंपनीची सिंगापूर येथे १००% मालकीची उपकंपनी आहे. देशांतर्गत उत्पादकांना पुण्याच्या कारखान्यातून तर इतर ग्राहकांना सिंगापूर इथून मालाचा पुरवठा होतो. २०१० साली इनोस ही स्विर्झलड येथील पीव्हीसी फिल्म बनविणारी कंपनी तिने ताब्यात घेतली. ही कंपनी बिलकेयरला कच्च्या मालाचा पुरवठा करते. या कंपनीचे फायझर, आयसीआय, डाऊ केमिकल्स बीएएसएफ या नामवंत कंपन्या ग्राहक आहेत. त्यामुळे बिलकेयरला हे ग्राहक मिळालेत व व्यवसाय वृद्धीची संधी उपलब्ध झाली आहे.
या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत बिलकेअरने रु. १८१.७० कोटींची विक्री नोंदविली आहे. त्यावर रु. ७.१४ कोटींचा नफा मिळवला तर प्रती समभाग मिळकत रु. ३.२४ आहे.
मिडकॅपची ट्वेंटी-२० खेळल्यानंतर स्मॉल कॅपची १२ खेळाडूंची टीम घेऊन आलो. याचबरोबर एक आवर्तन संपले आहे. ऑक्टोबर महिन्यात अर्धवार्षकि निकाल यायला प्रारंभ होईल. बाजार या निकालांदरम्यान थोडी विश्रांती घेईल. एका नवीन उमेदीने भरारी मारण्यासाठी असे दिसते आहे. तेव्हा अर्धवार्षकि निकालांची वाट पाहू या.        

*  प्रस्तुत लेखकाने सुचविलेली १२ स्मॉल कॅप खेळाडूंची टीम
     समभाग                                     सुचविलेला भाव        लक्ष्य
*  भारत इलेक्ट्रॉनिक्स                         १,२४४.९५        १,८५०
* एन्टरटेनमेन्ट नेटवर्क इंडिया              २२४.४०         २६५
*  मुंजाल शोवा लिमिटेड                            ६६.६५            ७८
* हेक्झावेअर टेक्नॉलॉजी                           १३४              २००
* ऑटोमोटिव्ह अ‍ॅक्सल्स                           ३४४            ५२०
* हिताची होम/लाईफ सोल्युशन्स            १२१.६५           १६५
*  कमर्शियल इंजि. बॉडीबिल्डर्स                ९३.५५           १३५
*  उडिशा मिनरल डेव्हलपमेंट कं.           ४७,८८७        ९८,०००
*  ई क्लर्क्‍ससव्‍‌र्हिसेस                            १२१.६५            १६५
*  सिंगर इंडिया                                       ९८.६५            १५०
*  हॉकिन्स कूकर                                    १७२८            २२२०
*  बिलकेअर लि.                                      १७८.८५        २२५