माझा पोर्टफोलियो : नऊ महिन्यात परतावा १६% Print

परतावा वाढीसाठी अजून अवधी आवश्यक!
अजय वाळिंबे, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘माझा पोर्टफोलिओ’ या सदराचा उद्देश वाचकांना काही चांगले शेअर सुचवितानाच पोर्टफोलिओ कसा तयार करावा तसेच पोर्टफोलिओची निगा कशी राखावी, असा दुहेरी होता. आज या सदराला नऊ महिने पूर्ण झाले आणि पोर्टफोलिओची कामगिरी आपल्यापुढे आहेच.
काही वेळी पोर्टफोलिओसाठी म्हणून दिर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी केल्यानंतरही सरकारी धोरणे, जागतिक परिस्थिती किंवा इतर घडामोडींमुळे तो शेअर विकून alt
टाकणे इष्ट ठरते. अर्थात मुळात आपण निवडलेली कंपनी मूलभूतदृष्टय़ा उत्तम असल्याने जास्त धोका नसला तरीही आपल्याला कमी कालावधीत उत्तम फायदा करायचा असल्याने असे निर्णय घेणे फायद्याचे. तसेच फायदा अपेक्षेप्रमाणे ठरविलेल्या कालावधीपेक्षा बराच आधी झाला असला तरीही तो शेअर विकून फायदा पदरात पाडून घेणेच इष्ट. तसे करायचे नसल्यास निदान थोडेफार शेअर विकून टाकून उरलेले शेअर फुकट म्हणून ठेवून द्यावेत.
इथे हेही लक्षात घ्यायला हवे की, आपल्या पोर्टफोलिओत १५ ते २० कंपन्यांपेश्रा जास्त कंपन्या नकोत.
३०,९६२ रुपयांच्या गुंतवणुकीवर नऊ महिन्यांच्या कालावधीत ११.८०% वाढीने ३४,६१८ रुपये झाले आहेत. म्हणजे वार्षिक परतावा १५.७३% इतका आहे. आयआरआर मात्र ३३% आहे.
अर्थात सुचविलेली गुंतवणूक मध्यम ते दीर्घकालीन असल्याने परतावा वाढण्यासाठी अजून अवधी द्यायलाच हवा. एक मात्र नक्की, आपल्या पोर्टफोलिओने इतर गुंतवणुकीच्या तुलनेत निश्चितच जास्त फायदा मिळवून दिला आहे.    

टीप : गुंतवणुकीच्या नफाक्षमतेच्या तौलनिक मापनाचे ्रल्ल३ी१ल्लं’ १ं३ी ऋ १ी३४१ल्ल (आयआरआर) हे उत्तम साधन आहे. एकापरीने याला वार्षिकीकृत परतावा दरही म्हणता येईल. हा दर इंटर्नल अर्थात अंतर्गत असल्याने त्यात चलनवाढ, कर, दलाली शुल्क, व्याजाचे दर वगैरे परताव्याला प्रभावित करणारे घटक गृहित धरलेले नाहीत. मात्र काल-परिमाणाला या मापनात महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला विशिष्ट गुंतवणूक काळात मिळालेला परतावा, वर्षांगणिक कसा वाढेल याचा त्यामुळे नेमका अंदाज येतो.  
* २९ सप्टेंबर २०१२ रोजी बंद झालेला शेअर्सचा भाव