विमा विश्लेषण : बजाज अलायन्झ सुपर सेव्हर एण्डाऊमेन्ट प्लान Print

 

दिलीप सामंत, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भारतातील शंभरी पार केलेला बजाज उद्योग समूह आणि १८९१ साली स्थापन झालेली आणि आज विमा क्षेत्रात जागतिक स्तरावर बाराव्या क्रमांकावर असलेली अलायन्झ कंपनी यांच्या सहयोगाने २००१ साली स्थापन झालेल्या बजाज अलायन्झ या विमा कंपनीची ही प्रज्ञा प्रकारात मोडणारी पॉलिसी..
ठळक वैशिष्टय़े :
१) १८ ते ६० वयाच्या व्यक्तीला ही पॉलिसी घेता येते.


२) पॉलिसीची टर्म १० ते ३० वर्षे.
३) कमीत कमी विमा छत्र २०,००० रु.
४) कमीत कमी वार्षिक प्रीमियम १०५५ रु.
५) ‘डबल अ‍ॅक्सिडन्ट’ लाभ अंतर्भूत आहे.
६) विमाछत्राच्या रकमेवर ४ टक्केबोनसची हमी

उदाहरण :
*     विमाधारकाचे वय    :    ३० वर्षे
*     पॉलिसीची व प्रीमियम
    भरायची टर्म     :    ३० वर्षे
*     विम्याची रक्कम    :    २५ लाख रु.
*     प्रीमियम रक्कम    :     १,३५,१०० रु.

पॉलिसीचे लाभ :
पॉलिसीच्या ३० वर्षांच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला २५ लाख रु. आणि वार्षिक ४ टक्क्यांप्रमाणे बोनस इतकी रक्कम कंपनी देणार. मृत्यू जर अपघाती असेल तर नामनिर्देशकाला ५० लाख रु. अधिक बोनस इतकी रक्कम प्राप्त होणार.
जर पॉलिसीच्या ३० वर्षांमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर त्याला विमाछत्राचे २५ लाख रु. आणि त्याच्या खात्यामध्ये जमा असलेल्या बोनसइतकी रक्कम प्राप्त होणार.
 विश्लेषण :
पॉलिसीच्या ३० वर्षांमध्ये मृत्यू झाला नाही तर त्याने ३० वर्षांमध्ये भरलेल्या एकूण हप्त्यांची रक् कम होते ४०,५३,००० रु. त्या बदल्यात कंपनी त्याला विमाछत्राचे २५ लाख रु. आणि कंपनीने हमी दिलेल्या ४ टक्के बोनसचे ३० लाख रु. असे एकूण ५५ लाख रु. देणार. (जास्तीच्या बोनसची हमी नसल्याकारणाने त्याचा विचार करण्यात आलेला नाही.) गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर परताव्याचे प्रमाण होते द. सा. द. शे. १.९० टक्के. या पॉलिसीसंदर्भात कंपनीने यापूर्वी १.२५ टक्क्य़ांपर्यंत अतिरिक्त बोनस दिलेला आहे. तो जरी विचारात घेतला तरी बोनसची एकूण रक्कम होते ३९,३७,५०० रु. आणि विमाधारकाला परिपक्वतेपोटी मिळणारी रक्कम होते ६४,३७,५०० रु. परतावा २.८३ टक्के.
पॉलिसीच्या टर्ममध्ये मृत्यू झाला तर २५ लाख रु. अधिक बोनस आणि तो मृत्यू जर अपघाती असेल तर ५० लाख रु. अधिक बोनस इतकी रक्कम त्याच्या नामनिर्देशकाला प्राप्त होणार.
थोडक्यात, अपघाती मृत्यू ही संभावना सोडून बाकीचे लाभ खास काही देत नाहीत.
याच कंपनीची एक बिननफ्याची प्युअर टर्म पॉलिसी आहे. वरील उदाहरणामधील व्यक्तीने एक कोटी रु.च्या विमाछत्राची ३० वर्षांची पॉलिसी घेतली तर सव्‍‌र्हिस alt

टॅक्ससकट वार्षिक प्रीमियमची रक्कम होते १९,८८७ रु. ३० वर्षांच्या एकूण प्रीमियमची रक्कम होते ५,९६,६१० रु. बजाज अलायन्झ सुपर सेव्हर प्लानच्या एकूण प्रीमियमच्या तुलनेत बचत ३४,५६,३९० रु. (४०,५३,००० - ५,९६,६१०). त्यापैकी २५ लाख रु. ज्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये आयकरात सूट आहे आणि परतावा आयकरमुक्त आहे अशा सेफ पर्यायामध्ये दरवर्षी एक लाख रु.प्रमाणे गुंतविले तर २५ वर्षांनी ८९,४६,४७० रु.ची गंगाजळी तयार होते. ही रक्कम पुढील ५ वर्षे आयकर वजा जाता निव्वळ ६ टक्के परतावा मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतविली तर विमाधारकाच्या ६० व्या वर्षी १,१९,७२,३९४ रु. इतकी रक्कम तयार होते. एकूण बचतीमधील (३४,५६,३९० रु.) बाकीची रक्कम ९,५६,३९० रु. (३४,५६,३९०-२५,००,०००) ३० वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते ३१,८७९ रु. समजा, ३१,८०० रु. वरील ६ टक्के परताव्यामध्ये ही ३१,८०० रु.ची रक्कम दरवर्षी गुंतविली तर ३० वर्षांनी २६,६४,८९३ रु.ची रक्कम तयार होते. अशा प्रकारे विमाधारकाकडे त्याच्या ६० व्या वर्षी आयकरमुक्त अशी १,४६,३७,२८७ रु.ची (१,१९,७२,३९४ + २६,६४,८९३) पुंजी तयार होते.
बजाज अलायन्झ या कंपनीचा क्लेम सेटलमेन्ट रेशिओ आहे ८८.८९ टक्के. वरील उदाहरणामधील व्यक्तीने भारतातील क्लेम सेटलमेन्ट रेशिओच्या बाबतीत अव्वल दोन कंपन्यांच्या प्युअर टर्म पॉलिसी घेतल्या तर मृत्यूची संभावना व लाभाच्या बाबतीत काय शक्यता आहे ते पडताळून पाहूया. विमाछत्र एक कोटी रुपये आणि टर्म ३० वर्षे असे गृहीत धरू या.
  कंपनी क्र. १ -
(क्लेम सेटलमेन्ट रेशिओ ९७.१% )
वार्षिक प्रीमियम ३७,७५२ रु. ३० वर्षांचे एकूण प्रीमियम ११,३२,५६० रु. बजाज अलायन्झ सुपर सेव्हरच्या तुलनेत एकूण प्रीमियममधील बचत २९,२०,४४० रु. ही रक्कम बजाज अलायन्झ प्युअर टर्म प्लानमधील बचतीप्रमाणेच वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतविली तर त्या व्यक्तीच्या ६० व्या वर्षी आयकरमुक्त अशी १,३१,४६,८४६ रु.ची (१,१९,७२,३९४ + ११,७४,४५२) पुंजी तयार होते .
  कंपनी क्र. २ -
(क्लेम सेटलमेन्ट रेशिओ ९५.४४% )
वार्षिक प्रीमियम १२,३२७ रु. एकूण प्रीमियमची रक्कम ३,६९,८१० रु. प्रीमियममधील बचत ३६,८३,१९० रु. ही रक्कमही वरीलप्रमाणे बजाज अलायन्झच्या प्युअर टर्म प्लानच्या बचतीसारखी वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतविली तर त्या व्यक्तीकडे तिच्या साठीला आयकरमुक्त अशी १,५२,७४,१८० (१,१९,७२,३९४ + ३३,०१,७८६) रु.ची गंगाजळी तयार होते.        
(लेखाचा उद्देश पूर्णत: समीक्षात्मक असून, कंपन्यांचे वेबस्थळ हा माहितीचा स्रोत आहे)