माझा पोर्टफोलियो : पोलादी विश्वासार्हता! Print

अजय वाळिंबे, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

खरं तर सर्व भारतीयांना माहिती असलेली आणि सर्वानाच अभिमान वाटावा अशी वाटचाल केलेली ही टाटा समूहाची फ्लॅगशीप कंपनी. जगातील सहाव्या क्रमांकाची आणि फॉर्च्यून ५०० मध्ये नामांकन असलेल्या या कंपनीचा इतिहास १०० वर्षांहूनही जुना आहे. काही वर्षांपूर्वी कोरस समूह ताब्यात घेतल्यानंतर टाटा स्टील आता बहुराष्ट्रीय कंपनी झाली आहे. भारताखेरीज थायलंड, सिंगापूर, ब्रिटन, नेदरलँड, फ्रान्स आणि नॉर्वे इ. देशातूनही कंपनी स्टीलचे उत्पादन आणि विपणन करते. कंपनीची जगभरातील पन्नास देशांतून कार्यालये असून २६ देशांत कारखाने आहेत. गेले काही महिने धातू उत्पादनांच्या कंपन्यांचे शेअर दुर्लक्षित असले, तरीही या संधीचा फायदा घेऊन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ‘टिस्को’सारखे शेअर खरेदी करण्याची ही चांगली संधी ठरू शकते. कंपनीला नुकतेच सुमारे ३१५ कोटी रुपयांचे फ्रान्समधील रेल्वेसंबंधी कंत्राटही मिळाले आहे. पुस्तकी मूल्यापेक्षाही कमी किमतीत उपलब्ध असलेला हा शेअर पोर्टफोलिओसाठी योग्य आहे.                          

 टाटा स्टील लि.
सध्याचा भाव     रु. ४१०.३५
वर्षांतील उच्चांक/नीचांक    रु. ३३२/५०१

प्रवर्तक     : टाटा समूह
प्रमुख व्यवसाय    : स्टील उत्पादन
भरणा झालेले भागभांडवल    :    रु.  ९७१.२१ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    ३१ %
दर्शनी मूल्य       :     रु. १०
पुस्तकी मूल्य       :     रु. ५५२
प्रति भाग मिळकत (ईपीएस)    :    रु. ५७.६०
किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    ६.८ पट