वास्तुप्रतिसाद Print

शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
ई-कारभार महत्त्वाचाच!
किरण चौधरी यांचा (६ ऑक्टोबर) ‘ई- गृहसंस्था कारभार’ हा लेख उल्लेखनीय आहे. ई-गृहसंस्था सद्य काळाची गरज बनलेली आहे. कारण सहकारी गृहसंस्थांचा पसारा वाढत चाललेला आहे; तसेच जागांचे भावही वेगाने वाढताहेत. १५-२० मजली व त्याहून जास्त अशा गगनचुंबी इमारतीत राहणाऱ्या सभासदांना याची जास्त गरज आहे आणि त्यात भर म्हणजे ३-४ विंग्स असल्यावर तर अधिकच!

मोबाइल व नेटचा वापर वाढल्यामुळे आता ऑनलाइन प्रणालीची निकड प्रकर्षांने भासू लागलेली आहे. याचा फायदा असा की, सोसायटीचा कारभार हा सोपा, सुटसुटीत, जलद आणि पारदर्शक होतो की ज्यामुळे सभासदांमधील वाद, संघर्ष कमी होण्यास मदत होऊ शकते.
- सतीश अष्टपुत्रे

लेखामुळे योग्य मार्गदर्शन
‘वास्तुरंग’ (२९ सप्टेंबर) मध्ये वि. रा. अत्रे यांचा ‘नकोत नुसत्या भिंती’ हा लेख वाचला. मीसुद्धा घराच्या शोधात आहे. या पाश्र्वभूमीवर हा लेख माझ्यासाठी खूपच उपयुक्त ठरला. आजकाल जी घरे आम्ही बघितली, त्यात toilet / बाथरूम common असते? ह्यात बिल्डरचा फायदा असतो. परंतु ही common toilet, बाथरूमची संकल्पना फारच चुकीची आणि गरसोईची वाटते. पण आता सर्रासपणे हॉटेलसारखे हेच पाहावयास मिळते. एकत्र कुटुंबपद्धतीत हे गैरसोयीचे आहे.
- कुमुद