घरसजावटीसाठी… Print

alt

शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास.. प्रत्येक जण दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी बाजारात काय नवीन आले आहे याची आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच शुभमुहूर्तावर गृहप्रवेश करणाऱ्यांना काय भेट द्यावी, भाऊबिजेसाठी भावाला वा बहिणीला कोणती वस्तू द्यावी याचे आडाखे बांधले जातात. निर्मिती आर्ट्सने तुमच्यासाठी खास पर्याय उपलब्ध केले आहेत. विशेष म्हणजे या वस्तू पर्यावरणपूरक आहेत. बांबू, टेराकोटा, नारळाच्या करवंटय़ा, झाडांच्या शेंगा यांपासून तयार केलेल्या वस्तू घराच्या सजावटीत भर घालतील. भिंतीवरील घडय़ाळ, विविध प्रकारच्या आकर्षक फुलदाण्या, चित्रे, की-होल्डर, टेबल टॉप, फोटोफ्रेम आणि विविध प्रकारच्या पणत्या यांचा समावेश आहे. या वस्तूंची किंमत २५०० पासून पुढे आहे. या वस्तू निर्मिती आर्ट्स, खासरावी इस्टेट, एस. के. बोले रोड, आगर बाजार, पोर्तुगीज चर्चजवळ, दादर प., मुंबई-४०००२८ येथे मिळतील.
alt
alt