‘हिरोईन’चे पहिले पोस्टर प्रकाशित Print

alt

प्रतिनिधी , मुंबई, , २२ जुलै २०१२
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर ऊर्फ बेबो हिचा नवा अवतार रविवारी ट्विटरवरून प्रकाशित झाला आहे. ‘हिरोईन’या मधुर भांडारकर दिग्दर्शित महत्वाकांक्षी चित्रपटातील माही अरोरा ही प्रमुख भूमिका करिना साकारत असून या चित्रपटाचा‘फर्स्ट लूक’म्हणून तिचे‘हॉट’पोस्टर ट्विटरवर टाकण्यात आले आहे. बेबोचा हा नवा अवतार तिच्या चाहत्यांना आवडणार का हे लवकरच समजेल.
स्पाघेटी आणि शॉर्ट्स अशा वेशभूषेतील करिनाच्या या पोस्टरवरून ‘हिरोईन’ मध्ये एका आघाडीच्या नायिकेचे पडद्यामागील आयुष्य, त्यातील यश-अपयश, तिच्या आयुष्यात निर्माण झालेली वादळे, त्याचे तिच्या मनावर झालेले परिणाम, त्यामुळे तिचे लहरी वागणे हे सगळे त्या एका पोस्टरवरून समजू शकते. या पोस्टरमध्ये करिनाच्या आजूबाजूला नायिका म्हणून ती गाजली त्या चित्रपटातील छायाचित्रे, नियतकालिकांची मुखपृष्ठे आहेत. रविवारी दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आली आहेत. दुसऱ्या पोस्टरमध्ये करिना नृत्य करताना दिसते. माझ्या हितचिंतकांना ‘हिरोईन’चे पोस्टर आवडेल असे मधुर भांडारकरने ट्विट केले आहे.