जग्गू दादाचा ‘ह्दयनाथ’ Print

alt

प्रतिनिधी
जग्गू दादा उर्फ जॅकी श्रॉफचा मराठीमधील ‘ह्दयनाथ’ हा चित्रपट शुक्रवार २४ अम्ॉगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. जॅकीने यापूर्वी अनेकदा मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. ह्दयनाथच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे नमूद करताना जग्गूदादाने हा चित्रपट सर्वाच्या ह्दयाशी भिडणारा असल्याचे सांगितले. मराठी चित्रपटामध्ये काम करताना मला नेहमी आनंद वाटतो असे सांगून तो म्हणाली की ह्दयनाथ या चित्रपटाचा विषय हा एका तत्वाशी निगडीत असून ते तत्व पाळण्यासाठी चित्रपटातील ती व्यक्तीरेखा कसा संघर्ष करते हे दाखविण्यात आले आहे. आतापर्यंत या विषयावर माझ्या मते मराठीमध्ये तरी चित्रपट आला नसून त्यालाा प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल असा आशावादही यानिमित्ताने बोलताना ज ॅकीने व्यक्त केला. या चित्रपटामध्ये उर्मिला मार्तोडकर हिचे असेलले लावणी नृत्यही प्रेक्षकांना खूष करुन टाकेल असेच असल्याची पुस्तीही त्याने जोडली.