गुप्तहेराने गाठली पन्नाशी Print

alt

जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना पन्नास वर्षे पूर्ण
मुंबई, ५ ऑक्टोबर २०१२
गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड.. असे समीकरण असणा-या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटांमध्ये हेरगिरी करत शत्रूंच्या नाकीनऊ आणणा-या आणि सुंदर तरूणींना आपल्या चलाखीने, स्मार्ट लूकने वेड लावणा-या बॉन्डची भूमिका साकरणा-या कलाकारांनी ख-या आयुष्यातही जगभरातील तरूणींना घायाळ केले आहे. १९६२ साली आलेला ‘डॉक्टर नो’ हा पहिला बॉन्डपट. इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉन्डच्या पात्राला जन्म दिला आणि पाहता पाहता संपूर्ण जगभरातील सिनेचाहत्यांना बॉन्डपटाचे वेड लागले. त्यानंतर गेल्या पन्नास वर्षात तेवीस बॉन्डपट आले आणि त्यामध्ये आजवर सहा विविध कलाकारांनी जेम्स बॉन्डच्या भूमिका साकारलेल्या आहेत. जगभरातील रहस्यपटाच्या चाहत्यांवर बॉन्डपटाची मोहिनी आजही कायम आहे. म्हणूनच या वर्षी प्रदर्शित होणा-या डॅनियल क्रेगने साकारलेल्या ‘स्काय फॉल’ची जगभरातील बॉन्डप्रेमी उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.