अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस Print

alt

मुंबई, १० ऑक्टोबर २०१२
ख्यातनाम बॉलीवूड अभिनेत्री आज वयाची ५८ वर्षे पूर्ण करत आहे. रेखा आता मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत असली तरी आजही रेखाची मोहिनी तिच्या चाहत्यांवर कायम आहे. भानुरेखा गणेशन हे मूळ नाव असलेली ही अभिनेत्री भारतीय चित्रपटसृष्टीत रेखा याच नावाने परिचित आहे. रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला झाला.

घरच्या परिस्थितीमुळे नाखुशीनंच तिनं तमिळ चित्रपट ‘रंगुला रत्नम’द्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. हिंदी सिनेमात ४२ वर्षांहून अधिक काळ घालवणारी रेखानं आपल्या सौदर्यांच्या आणि बोलक्या डोळ्यांच्या जोरावर अनेकांना आकर्षित केलं. अनेक चित्रपट समीक्षकांनी तिला ‘संपूर्ण अभिनेत्री’ चा किताब बहाल केला आहे. अमिताभ बच्चन आणि रेखाच्या जोडीला आजही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलंय. ही जोडी बॉलिवूडमधली हीट जोडी ठरली होती. अभिताभ बरोबर चित्रीत झालेला ‘सिलसिला’ सुपर डूपर हीट सिनेमा ठरला होता. १९८१ साली आलेल्या मुजफ्फर अली निर्मित ‘उमराव जान’नं रेखाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तिनं आत्तापर्यंत १८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलंय.