गणाधीश जो ईश… Print

शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
गणाधीश जो ईश सर्वागुणांचा.. अशा गणपतीची आराधना लहानथोर सारेच करतात. बुद्धीची देवता, सृजनाचं रुप असणाऱ्या या गणेशाला अनेकींनी आपल्या जगण्याचा आधार बनवला आहे.. शुभांगीला त्यासाठी चित्रकलेचं माध्यम मिळालं, निकिताला चौघडा वाजवण्याचं, वृषाली यांनी स्वत:च्या आवाजाचं माध्यम वापरलंय तर मीलन यांनी पौरोहित्य स्वीकारलंय.. हाच गणपती संगीता यांना गेली १५ वर्षे गणपतीला रंगवण्याची प्रेरणा देतं तर सुलभा यांना अंध मुलींचं ढोल-ताशे पथक काढण्याची स्फूर्ती देतं.. कारण तो आहे, विघ्नविनाशक गणराया !