महाराष्ट्र बालमजुर मुक्त होणे आपलीही जबाबदारी Print

alt

युनिसेफ प्रतिनिधी, मंगळवार, १९ जून २०१२
बाल मजुरी बाबत जेव्हा जेव्हा विचारणा केली जाते तेव्हा तेव्हा काही मुद्द्यांवर येऊन आपण सर्वच मोठी माणस पुढील  काही  गोष्टीवर येउन थांबतो;
- बालमजूर १४ वर्ष कि १८ वर्ष ?
- बालमजूर कुणाला म्हणता येईल ?
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला काय करता येईल ?

 

आजघडीला आपल्याला सर्वाना माहित असायला हवं कि बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम २०००/२००६ नुसार मुलांच वय १८ वर्ष आहे अस म्हटलंय.  त्यासोबतच हे सुद्धा नमूद करण्यात आलंय कि काम करणारी मुल यांना सुद्धा काळजी आणि संरक्षणाची मुले असे मानलं गेलंय.  त्यामुळे आजघडीला कायद्यानुसार १८ वर्षाच्या आतील मुले काम करू शकत नाही असे शासन मानते.
शहरी भागात जेंव्हा आपल्याला मुले काम करताना कुठे आढळून आली तर काय करता येईल
शहरी भागात मुले जर आढळून आली तर सर्वप्रथम आपण त्या मुलांसोबत बोलणे आवश्यक आहे,
बऱ्याच वेळा मुलांशी बोलणे शक्य होत नाही त्या वेळेस त्यांच्या मालाकांसोबत संवाद करता येईल का हे पाहावं.
असा संवाद जर शक्य नसेल तर अशा वेळेस मुलांच्या हिताच्या दृष्टीने आपण सर्व निर्णय घ्यावेत..
या सर्व प्रक्रियेत सर्व शासकीय यंत्रणांची  मदत घेता येण शक्य आहे.
·    मुलांसोबत आणि त्यांच्या मालाकांसोबत संवाद करावा
·    संवादानंतर त्या बालमजूर मुलाबाबत आपण काय करू शकतो म्हणजे (त्याच्या घरी संवाद साधनं. त्याच्या आई वडिलांसोबत संवाद साधून त्याच्या शाळेची काय व्यवस्था करता येईल...........)यावर विचार करता येईल
·    एखादा मालक आपल्यासोबातच्या संवादामुळे जर मुलाला मदत करायला तयार झाला तर उत्तमच.
·    पण एखादा मालक उद्दाम असेल तर मात्र त्याला कायद्यचा बडगा हा दाखवून द्यावा.
·    कायद्याचा बडगा म्हणजे?
१)    आपण पोलिसांना १०३ या क्रमांकावर फोन करून मालाकाबाबत तक्रार करू शकतो
२)   आपल्यला जर पोलीसंकडे जाणे शक्य नसेल तर आपण चाईल्ड लाईन ला १०९८ या क्रमांकावर फोन करून तक्रार नोंदवू शकतो
३)   आपल्याला शक्य असेल तर आपण मालाकाविरोधात पोलिसात आपण बाल न्याय अधिनियम कलम २३ आणि २६ कलमाचा आधार घेत एफ.आय.आर. नोंदवू शकतो.
४)  लक्षात ठेवा गुन्हा मालाकाविरोधात नोंदविला जातो  बाल मजूर मुलाच्या विरोधात न्हवे.
५)  बालमजूर मुलाची आपल्यामुळे सुटका झाल्यावर त्याला योग्य पुनर्वसनासाठी बाल कल्याण समिती कडे घेऊन जाणे आवश्यक असते.( बाल कल्याण समिती हि बाल न्याय अधिनियमानुसार बाल संरक्षणाची सर्वोच्च जिल्हा पातळीवरील न्याय व्यवस्था आहे.)
६)   मालाकाविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७४ आणि बाल न्याय अधिनियम आणि बाल मजुरी विरोधी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे कि नाही याचा पाठपुरावा करता येतो.
·    लक्षात असू द्यात आपल्या एका संवेदनशील पुढाकारामुळे एखद्या मुलाचे आयुष्य घडू शकते.
·    आपण पुढाकार घेतल्यास आपण नक्कीच महाराष्ट्र बाल मजूर मुक्त करू शकतो.
·    बालमजूर मुक्त महाराष्ट्र हि केवळ शासनाची जबाबदारी नाही.. आपणही खुल्यादिलाने त्यात सहभागी होऊ शकतो.

समाप्त