नवजात वंडरकिड्स Print

alt

शुभदा चौकर, सोमवार, ६ ऑगस्ट २०१२
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. मातेच्या दुधाचे महत्व आता नि:शंकपणे मान्य झालेले आहे. ट्याव्र अनेक वैज्ञनिक शोधनिबंधही लिहिले गेले आहेत. तरीही अनेक शहरी तसेच ग्रामीण भागातेल मातांना बाळ जन्मल्यावर साभराच्या आत स्तनपान सुरू करायला अनेक अडचणी येतात. आपल्या देशात जेमतेम २०%माता आपल्या बाळाला सहा महिन्यापर्यंत स्तनपान देतात. मातेच्या मनातल्या याबद्दलच्या शंका आणि तिला येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात असा प्रयत्न “युनिसेफ” तर्फे अनेक उपक्रमाद्वारे केला जातो.

जागतिक स्तनपान सप्ताहात आपण स्तनपानाविषयी येणाऱ्या अडचणी व त्यावर उपलब्ध असलेली मदत यासंबधीची माहिती निरनिराळे लेख आणि लघु चित्रपटांच्या माध्यमातून लोकसत्ताच्या ब्लॉगवरून जाणून घेऊ यात. यानिमित्ताने लोकसत्तामध्ये प्रसिध्द झालेले काही विशेष लेख वाचकांसाठी पुर्नमुद्रीत करत आहोत.

स्वतची भूक स्वप्रयत्नाने भागवण्याची ऊर्मी मानवाला जन्मतच मिळालेली असते आणि त्या बळावर काही मिनिटं वयाचं नवजात बाळही स्वतचं स्वत स्तनपान करू शकतं. या चमत्काराला ‘ब्रेस्ट क्रॉल‘ असे संबोधले जाते. ‘ब्रेस्ट क्रॉल‘ म्हणजे स्तनाकडे झेपावणे. बाळाच्या या नसíगक ऊर्मीचा फायदा उठवून त्याला जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपानाची संधी दिल्यास बालमृत्यूचे प्रमाणही चांगलेच घटू शकते. बाळ जन्मल्याबरोबर ‘टॅहॅऽऽऽ‘ करून आपल्या आगमनाची नांदी देतं, एवढीच काय ती नवजात शिशूची क्षमता आपण जाणतो. पण जन्मल्याबरोबर दुसऱ्याच मिनिटाला बाळाला आईच्या उदरावर ठेवलं तर ते बाळ स्वतहून पुढे सरकत आईच्या दुधाचा स्रोत शोधत स्तनाला जाऊन भिडतं आणि दूध पिऊ लागतं, हे कुणाला सांगितलं तर तो चमत्कार वाटेल. पण असा चमत्कार प्रत्येक बाळ करून दाखवू शकतं. गरज आहे ती त्याला अशी संधी देण्याची! स्वतची भूक स्वप्रयत्नाने भागवण्याची ऊर्मी मानवाला जन्मतच मिळालेली असते. आणि त्या बळावर नवजात बाळही स्वतचं स्वत स्तनपान करू शकतं. जन्मल्यानंतर पहिल्या तासात बाळाची स्तनपान करण्याची ऊर्मी प्रचंड असते. ती शमविण्यासाठी आवश्यक त्या सर्व संवेदनांचा जणू एक ‘प्रोग्रॅम‘ त्याच्या मेंदूत ‘फीड‘ केलेला असतो. मात्र, हा प्रोग्रॅम वापरण्याची संधी नवजात शिशूला त्वरित दिली गेली नाही, तर त्या ‘प्रोग्रॅम‘चे सिग्नल हळूहळू विरत जातात. जन्मतच आईच्या उदरावर ठेवले गेलेले बाळ आईच्या पोटाला ढुशा मारत, हळूहळू पुढे सरकत स्तनाच्या जवळ पोहोचते, लाळेऱ्या तोंडाने बरोबर स्तनाचा काळा भाग तोंडात पकडून चुपू लागते आणि हाताने स्तन पकडून अगदी सराईत बाळाप्रमाणे व्यवस्थित स्तनपान करू लागते.. अशा पद्धतीने किमान पाचेकशे नवजात बालकांनी यशस्वीपणे स्तनपान केले, त्याला मुंबईचे डॉ. प्रशांत गांगल आणि त्यांची टीम साक्षी आहे. या चमत्काराला ‘ब्रेस्ट क्रॉल‘ असे संबोधले जाते. ‘ब्रेस्ट क्रॉल‘ म्हणजे स्तनाकडे झेपावणे. बाळाच्या या नसíगक ऊर्मीचा फायदा उठवून त्याला जन्मानंतर लगेच स्तनपानाची संधी दिल्यास बालमृत्यूचे प्रमाण पावपटीने घटू शकते. जन्मानंतर पहिल्या महिन्यात मृत्यू पावणाऱ्या बाळांची संख्या भारतात सुमारे 11 लाख आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपानाची संधी प्रत्येक शिशूला मिळाली तर 11 लाखांपकी अडीच लाख बाळांचे प्राण वाचू शकतात. तेही कोणत्याही बाह्य औषधोपचारांविना! ‘ब्रेस्ट फीिडग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया (बीपीएनआय)‘, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाचा पोषण आहार प्रकल्प यांच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम होतात. त्यात बी.पी.एन.आय.ची टीम स्थानिक सरकारी- बिनसरकारी कार्यकर्त्यांना यशस्वी स्तनपानाचे मंत्र व तंत्र शिकवते. राज्यातील प्रत्येक शिशुला पहिले सहा महिने निव्वळ स्तनपान आणि त्यानंतर दोन वष्रे स्तनपानासह पूरक आहार मिळावा, यासाठी बी.पी.एन.आय.चे धडाकेबाज प्रयत्न सुरू आहेत. ‘युनिसेफ‘च्या सहकार्याने ही प्रशिक्षण शिबिरे नंदुरबार जिह्यात चालू असताना ‘ब्रेस्ट क्रॉल‘चा प्रयोग केला गेला. आता हा प्रयोग अनेक ठिकाणी केला जात आहे. ग्रामीण भागातील डॉक्टर, आया, दाया, स्तनपानाचा प्रसार करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी अशा सर्वामध्ये ब्रेस्ट क्रॉलचा प्रसार करण्याचे व प्रसूतीशी संबंधित सर्वाना प्रशिक्षण देण्याचे कार्य बी.पी.एन.आय.ने सुरू केले आहे. ग्रामीण भागात ‘ब्रेस्ट क्रॉल‘चा यशस्वीतेचा दर बघून आता शहरी भागातही काही प्रसूतिगृहांत बी.पी.एन.आय.च्या डॉक्टरांनी हा प्रयोग करण्यास सुरवात केली आहे. मुंबईत कांदिवलीच्या डॉ. काíतक भगत यांच्या ‘ग्रेस मॅटíनटी होम‘मध्ये गेल्या वर्ष- दीड वर्षांतील सुमारे 400 नवजात शिशूंनी ‘ब्रेस्ट क्रॉल‘ तंत्रानुसार स्तनपानाला सुरुवात केली. जागतिक आरोग्य संघटना (हऌड) आणि युनिसेफच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाळाच्या जन्मानंतर अध्र्या तासाच्या आत बाळाला स्तनपान मिळू लागले पाहिजे. ‘ब्रेस्ट क्रॉल‘चे तंत्र अनुसरल्यास बाळाच्या स्तनपानाची सुरुवात जन्मानंतर दोन-पाच मिनिटांतच होऊ शकते आणि तीही बाळाच्या स्वप्रयत्नांतून, आंतरिक ऊर्मीतून! अर्थात ‘ब्रेस्ट क्रॉल‘ची संधी बाळाला ताबडतोब मिळण्यासाठी प्रसूतीनंतरच्या प्रक्रियांत काही मूलभूत बदल करावे लागतात. प्रसूतीनंतर लगेच बाळाला आंघोळ घालण्याची पद्धत रूढ आहे. शिवाय मातेला लेबर रूममधून वॉर्डमध्ये नेणे, वेदनांमुळे थकलेल्या मातेला सिडेटिव्ह देऊन झोपवून ठेवणे आणि माता-बालक दोघेही ताजेतवाने झाले की कालांतराने स्तनपान करण्याचे प्रशिक्षण मातेला देऊन बाळाला पाजणे.. या सर्व प्रक्रियांत वेळ जातो. स्तनपानास सुरुवात करण्यात किमान एक तास ते एक दिवस इतका वेळ जाऊ शकतो. तोपर्यंत बाळाला ग्लुकोज, मध-पाणी, व्हिटॅमिन्स यावर ठेवले जाते. ‘बेस्ट क्रॉल‘ या बाळाच्या नसíगक क्षमतेचा फायदा उठवायचा तर प्रसूतीनंतर काही क्षणांतच त्याला स्तनपानाची संधी देणे आवश्यक ठरते. बाळाच्या मेंदूतील नसíगक प्रोग्रॅमनुसार ते बाळ आईच्या उदरावर व छातीवर दोघांचा एकमेकांना पूर्ण त्वचा-स्पर्श होतोय अशा अवस्थेत ठेवले गेले तर बाळ आईचा स्पर्श आणि तिच्या त्वचेचा गंध ओळखते आणि आईचे स्तन नजरेने टिपू शकते. एवढेच काय, पण बाळ आईचा चेहराही ओळखते.. आवाजही जाणते. नऊ महिन्यांच्या उदरातील वास्तव्यात बाळाला आईची ओळख नीट पटलेली असते. गंमत म्हणजे आईच्या उदरातील गर्भजलाचा गंध आणि स्तनाग्राचा वास यांत साम्य असते. त्या गंधाची ओळख पटून बाळ स्तनाग्राकडे अचूक झेपावते. बाळाच्या या क्षमतेला पोषक प्रसूती प्रक्रिया मात्र प्रसुतीगृहांनी अवलंबिली पाहिजे. उदाहरणार्थ- प्रसूतीनंतर बाळाला आंघोळ घालण्याचा सोपस्कार न करता नाळ कापल्या कापल्या बाळाला स्वच्छ, मऊशार कापडाने हलकेच पुसून लगेच त्याला आईच्या गालाजवळ नेऊन दोघांचा एकमेकांना स्पर्श होऊ द्यावा; ज्यायोगे दोघांमधील वात्सल्याचा बंध त्वरित दृढ होतो. नंतर बाळाला आईच्या उदरावर सरळसोट उपडे ठेवावे; जेणेकरून बाळाचे डोके छातीवर येईल. ‘ब्रेस्ट क्रॉल‘च्या काळात नवमातेसोबत बाळाला आधार देण्यासाठी जाणकार सहाय्यक असावा. ‘ब्रेस्ट क्रॉल‘दरम्यानच्या बाळाच्या हालचालींवरून हेही स्पष्ट होते की, स्वतचे डोके सावरून, ते उचलून स्तनाग्र तोंडात धरण्याइतकी क्षमता बाळाच्या मानेच्या स्नायूंमध्ये जन्मतच असते. शिवाय पुढे सरकण्याइतके त्याचे हाता-पायाचे स्नायू सक्षम असतात आणि बाळ नजरेने आईचा चेहरा व स्तनाग्र पाहू शकते, इतपत नजरओळख त्याला जन्मतच असते. गंध, आवाज, स्पर्श या त्याच्या संवेदना तर तीव्र असतातच. स्तनाकडे स्वबळावर सरकत जाण्याची प्रक्रिया बाळ दहा मिनिटांत पूर्ण करते आणि त्यानंतर पुरेसा कोलोस्ट्रम (दुधापूर्वीचा चीक) मिळेपर्यंत स्तनपान करून स्वतची भूक भागवण्याची प्रक्रिया पुढे दहा मिनिटे ते तास- दीड तास चालू असते. ‘ब्रेस्ट क्रॉल‘ पूर्ण झाला की, म्हणजे जन्मानंतर तासा- दीड तासाने बाळाला आंघोळ घालणे, त्याचे वजन, उंची नोंदवणे, त्याला मऊ दुपट्ट्यात गुंडाळणे, बिल्ला लावणे, मातेची स्वच्छता आदी ठराविक प्रक्रिया पूर्ण करता येतात. मातेला प्रसूती सहन होण्यासाठी वेदनाशामके देणे किंवा वेदनारहित प्रसूतीसाठी भूल देणे या शहरी प्रथा अनुसरताना कोणती औषधे किती मात्रेत द्यावीत, जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम ‘ब्रेस्ट क्रॉल‘वर होणार नाही, याचे नवे संकेत आता रुढ होतील. सिझेरियनचे वाढते प्रमाण लक्षात घेता सिझेरियन प्रसूतीद्वारे जन्मलेल्या बाळाला ब्रेस्ट क्रॉलची संधी देता येऊ शकते, फक्त त्यासाठी बाळाला पोटावर न झोपवता मातेच्या खांद्यापासून छातीपर्यंतच्या भागात उपडे ठेवावे लागते. ‘ब्रेस्ट क्रॉल‘च्या या प्रयोगाचा प्रसार राज्यातील प्रसूतितज्ञ, शिशुतज्ञ, नर्स, आया, गावोगावच्या आरोग्यसेविका अशा सर्वामध्ये मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. स्तनपानाचा आरंभ जितक्या लवकर होतो, तितके ते बाळ स्तनपानाचे पूर्णत लाभार्थी होण्याचे प्रमाण वाढते. पहिल्या सहा महिन्यांत पूर्णत स्तनपान केलेली आणि नंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानासह पूरक आहाराचा फायदा घेतलेली मुले कुपोषणाची शिकार बनण्यापासून वाचतात. आरोग्य, प्रतिकारशक्ती आणि बुद्धिमत्ता अशा सर्वच आघाड्यांवर ते सरस ठरतात. स्तनपानाच्या प्रसारासाठी बी.पी.एन.आय. टीममधील डॉक्टर्स, ठिकठिकाणचे शासकीय आरोग्यसेवक, बिगरशासकीय सेवाव्रतींचे जाळे, ‘मदर सपोर्ट ग्रुप‘चे कार्यकत्रे असा मोठा चमू महाराष्ट्रातील अनेक जिह्यांत सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांतूनच ‘ब्रेस्ट क्रॉल‘चे तंत्र त्यांच्या हाती गवसले आहे. या तंत्रामुळे स्तनपानाच्या मोहिमेला अधिक बळकटी येऊ शकते. तसे ‘ब्रेस्ट क्रॉल‘चे हे संशोधन पूर्णत नवे नाही. 1987 मध्ये स्वीडनच्या डॉक्टर चमूने, नंतर 1998 मध्ये अमेरिकेच्या डॉ. क्लॉस यांनीही हे संशोधन केले होते. बी.पी.एन.आय.च्या डॉक्टरांनी या संशोधनाला प्रयोगाची जोड दिली. बाळाने जन्मतच आईला बिलगून स्तनपान करण्याची क्रिया पशूंमध्ये सर्रास दिसते. मानवाच्या बछड्यांनीही संधी मिळताच ती कृती सहजी करून दाखविली. एकावर एक प्रयोग यशस्वी होत गेले. त्यातूनच हे प्रयोगसिद्ध ‘ब्रेस्ट क्रॉल‘ तंत्र पुढे आले आहे. त्यांच्या पातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम सुरूही आहेत. स्तनपानाचे तंत्र शिकवणाऱ्या कार्यशाळांतून आता ‘ब्रेस्ट क्रॉल‘ पद्धत कशी अनुसरावी, हेही शिकवले जात आहे. गेली कित्येक वष्रे आधुनिक वैद्यकाने अनुसरलेल्या प्रसूतिप्रक्रियांत ‘नवजात शिशूच्या उपजत क्षमता‘ या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने मधल्या कित्येक पिढ्या या नसíगक ऊर्मीपासून दूर राहिल्या. आधुनिक वैद्यकाच्या विकासापूर्वीच्या काळात घरा-घरांत स्वतची प्रसूती स्वतच किंवा अनुभवी सहाय्यकाच्या मदतीने होत असे. तेव्हा जन्म झाल्या झाल्या रडणाऱ्या शिशूला त्वरित आईच्या छातीजवळ नेण्याची पद्धत रूढ होती. बाळाला जवळ धरताच आईचे स्तन स्रवू लागायचे व ती बाळाला दूध पाजवायची, असे संदर्भ आढळतात. कालांतराने वैद्यकाच्या साह्याने प्रसूती सुरू झाली. त्याचे फायदे निश्चितच मिळू लागले. पण या काही नसíगक बाबी मात्र कालौघात मागे पडल्या. मातेच्या दुधापूर्वीचा चीक बाळाला पुरत नाही, असाही एक समज होता. काही समाजांत चीक निषिद्ध मानला जात होता. असे काही गरसमज आजही समाजात आहेत. हे गरसमज दूर करून स्तनपानाचा आरंभ लवकर करू देण्यात आणि तमाम बाळांना स्तनपान करण्याचा आग्रह धरण्यात काही प्रसूतिगृहे कमी पडली. आजही स्तनपानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर चालू असूनही अनेक प्रसूतिगृहे ‘द्गक्£ड्ढष्ट्वड्ढ‘ने स्तनपानासाठी प्रसृत केलेल्या दहा मूलभूत संकेतांचे पालन करीत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ‘ब्रेस्ट क्रॉल‘ची संधी सर्वच्या सर्व नवजात शिशूंना मिळण्यासाठी प्रसूतिगृहांची मानसिकता तयार करणे, हे मोठे आव्हान ठरू शकेल. त्यासाठी सध्या अनुसरल्या जाणाऱ्या प्रसूतिनंतरच्या प्रक्रियांत थोडे बदल केले गेले पाहिजेत. प्रसूतितज्ञांनी स्वत पुढाकार घेऊन ‘ब्रेस्ट क्रॉल‘ची माहिती गर्भवती स्त्रियांना व तिच्या कुटुंबियांना देणे, ‘ब्रेस्ट क्रॉल‘चे प्रशिक्षण प्रसूतिगृहांतील नर्स, आया आदींना देणे, प्रसूतीच्या वेळी मातेजवळ प्रशिक्षित सहाय्यक हजर राहील अशी व्यवस्था करणे- हे झाले पाहिजे. ‘ब्रेस्ट क्रॉल‘साठी प्रसूतितज्ञ आणि त्यांच्या टीमची मानसिकता पक्की झाली तर स्तनपानाची नसíगक ऊर्मी शमविण्याची व त्यासाठीच्या उपजत क्षमता सिद्ध करण्याची संधी नवजात ‘स्मार्ट‘ शिशूंना मिळू शकते. काही सेकंद वा मिनिटं वयाची वंडरकिड्स स्वतच्या आरोग्याचे तंत्र स्वत अनुसरू शकतात. हाताच्या मुठी वळवून त्याआधारे पुढे झेपावत स्तनपान करणारे शिशू जणू म्हणत असतात, ‘मुठ्ठी में है तकदीर हमारी!