हिरकणी कक्ष Print

alt

डॉ. प्रशांत गांगल, मंगळवार, ७ ऑगस्ट २०१२
ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून पाळला जातो. जागतिक स्तनपान सप्ताहात आपण स्तनपानाविषयी येणाऱ्या अडचणी व त्यावर उपलब्ध असलेली मदत यासंबधीची माहिती निरनिराळे लेख आणि लघु चित्रकटांच्या माध्यमातून लोकसत्ताच्या ब्लॉगवरून जाणून घेऊ यात. यानिमित्ताने लोकसत्तामध्ये प्रसिध्द झालेले काही विशेष लेख वाचकांसाठी पुर्नमुद्रीत करत आहोत.
हिरकणीची गोष्ट सतराव्या शतकातली म्हणजे जवळजवळ साडेतीनशे वर्षांपूर्वीची! राजा शिवछत्रपतींच्या काळामधली! तेव्हा रायगडाच्या पायथ्याशी हिरकणी नावाची एक गवळण राहात होती. तिच्या धर्याची व मातृप्रेमाची ही गोष्ट महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अजूनही सांगितली जाते. हिरकणी खरंच अस्तित्वात होती ही ती दंतकथा आहे, याबद्दल इतिहासकारांमध्ये दुमत असेलही, करंतु त्या गोष्टीतील मातृत्वगुण मात्र कालातीत आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रायगडावर दूध पोहोचविण्यासाठी म्हणून ती बाळाला घरी ठेवून आली. तिथे तिला खूप उशीर झाला. ती गडावरच अडकली, कारण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद व्हायचे आणि सकाळनंतर उघडायचे. दरवाजा उघडण्यासाठी, राजाची परवानगी काढण्यात बराच वेळ जात होता. गडाच्या एका बुरुजावर हजार फुटांहूनही अधिक खोल दरीत वसलेल्या तिच्या गावातील अंधूक मिणमिणत्या दिव्याकडे बघत ती हताशकणे उभी होती. एका क्षणात तिच्यामधील मातृत्वाने व करारीपणाने या सर्व अडचणींवर मात केली आणि बाळाला दूध पाजण्यासाठी ती उभा कडा (सध्याचा हिरकणी बुरूज) हिमतीने उतरून घरी आली.करिअर व बालसंगोपन यामधील समन्वय़ साधण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या जगभरातील महिलांना हिरकणी ही त्यांची प्रतिनिधी वाटू शकते. २००६ मध्ये ला लेशे लीग (अमेरिकन मदर सपोर्ट ग्रुक) ने सहा खंडांतील जवळजवळ ३५ देशांमधील करिअर करणाऱ्या मातांच्या स्फर्तीदायक कथा एकत्रित पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या. या पुस्तकाचे नाव ‘हिरकणीज् डॉटर्स’ (हिरकणीच्या मुली) असे ठेवण्यात आले. तसेच हिरकणीच्या बुरूजाचे चित्र त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आले. ही हिरकणीचा वारसा जपला जावा, यासाठी ठेवण्यासाठी ब्रेस्ट फीिडग प्रमोशन नेटवर्प कौन्सिलने (बी. पी. एन्. आय्.- महाराष्ट्र) ‘हिरकणी कक्षाची’ संकल्पना विकसित केली आहे.‘हिरकणी कक्ष’ म्हणजे कार्यालयात काम करणाऱ्या स्तनदा मातांसाठी दूध काढून साठवण्यासाठी स्वतंत्र खोली.
कार्यालयाशी संलग्न वा कार्य़ालयालगत पाळणाघर असल्यास ती कर्मचारी माता हिरकणी कक्षात बसून बाळाला स्तनपान देऊ शकते. अर्थात आईने बाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन येणे किंवा कार्यालयात पाळणाघराची सोय असणे, या दोन्ही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत. अशा वेळी नवमाता निदान कार्यालयातील हिरकणी कक्षात बसून दूध पाजून व साठवून ठेवू शकते. अशी सुविधा त्या कक्षात निर्माण करून दिल्यास या कक्षाचा फायदा या कार्यालयात काम करणाऱ्या स्तनदा मातांना आणि त्यांच्या बाळांना होईल. अशी सोय देणारे कार्यालय ‘माता व बाल सहाय्यक आहे’ याची खात्री महिला कर्मचाऱ्यांना वाटू शकेल.असा हिरकणी कक्ष प्रत्येक कार्यालयात असावा, असे आवाहन बी. पी. एन्. आय्. शी संलग्न अशा ज्येष्ठ डॉव्टरांनी शासकीय आणि खासगी क्षेत्रातील कार्यालय व्यवस्थापकांना केले आहे. हा सर्व खटाटोप का आवश्यक आहे, याची कारणे या तज्ञ डॉव्टरांनी दिली आहेत- सहा महिने पूर्ण होईपर्यंत निव्वळ स्तनपान (अंगावरील दुधाव्यतिरिक्त काहीही नाही, अगदी पाणी, पारंपारिक औषधे, जीवनसत्वांचे थेंब किंवा कॅल्शियमही नाही) देणे व त्यानंतर पूरक आहारासोबत कमीत कमी दुसऱ्या वाढदिवसापर्यंत स्तनपान सुरू ठेवणे आवश्यक असते. या शिफारशी कंपनीच्या व्यवस्थापकांना व कार्यालयातील बऱ्याच जणांना माहीत नसतात.मातेच्या दुधामुळे मिळणारे फायदे हे गाईच्या वा म्हशीच्या दुधामुळे मिळत नाहीत, तसेच त्या दुधामुळे आजारांचा धोका वाढतो.पहिल्या तीन वर्षांतील पोषणाचा (यात गर्भवती व स्तनदा मातेचे पोषण अंतर्भूत आहे) केवळ बालकांचे कुपोषण, आजार, बालमृत्यू यांवरच नाही, तर अर्थव्यवस्था, पर्यावरण, आरोग्य तसेच कोणत्याही वयातील शारीरिक व मानसिक क्षमता यांवर मोठा परिणाम होतो, हे सिध्द झाले आहे. मात्र अनेकांना ही माहीती नसते. कामावर रुजू झाल्यावर अंगावरच्या दुधाचा पुरवठा चालू राहण्यासाठी आईला थोड्याथोड्या वेळाने दूध पाजून टाकून स्तन रिकामे करणे आवश्यक असते. असे केल्यास घरी आल्यावर आई बाळाला पुरेसे पाजू शकते. म्हणूनच व्यवस्थापकाने आयांना दूध पाजण्यासाठी कार्यालयीन वेळात मोकळा वेळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कामावर रुजू झाल्यानंतर याची माहिती नसल्यामुळे व तशी सुकिधा नसल्यामुळे अनेक आया त्यांचे स्तन रिकामे करत नाहीत आणि मग अंगावरचे दूध कमी होते. परिणामी त्या स्तनपान थांबवतात. काहीजणी स्तन दाटल्याने चक्क शौचालयात जाऊन दूध काढून फेकून देतात. भरपूर पोषणमूल्य असलेल्या अंगावरच्या दुधाची सांडपाण्याबरोबर विल्हेवाट होते. मातेने दूध काढून ठेवले तर ते ४ ते ६ तास टिकू शकते. फीजमध्ये तर ते २४ तास साठवून ठेवता येते. अनेक मातांना याबद्दल माहीत नसते. माहीती असली तरी कार्यालयात अशा प्रकारे दूध काढून साठवून ठेवण्याची सुविधा नसते. जर व्यवस्थापनाने महिला कर्मचाऱ्यांना हिरकणी कक्षाची सुविधा निर्माण करून दिली तर व्यवस्थापनालाही त्याचा फायदा होऊ शकतो.महिला कर्मचाऱ्याची कार्यालयाशी निष्ठा वाढते. आई बाळाच्या आजारपणासाठी कमी रजा घेते. आई व मुलांच्या वैद्यकीय खर्चात बचत होते. कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वास्थाची काळजी व्यवस्थापनाला आहे, हे दिसून येते. नवमाता कर्मचाऱ्यांची उत्पादनक्षमता वाढते. प्रत्येक कार्यालयात ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करून ‘माता व बाळ सहाय्यक’ होण्याची इच्छा असेल त्या व्यवस्थापनांनी ‘बी. पी. एन. आय. महाराष्ट्र’ साह्य करण्यास तयार आहे. संकर्प- बी. पी. एन. आय. महाराष्ट, डॉ. प्रशांत गांगल, 2 बी, रोलेव्स अपार्टमेन्ट, न्यू ईरा सिग्नलजवळ, एस. व्ही. रोड, मालाड, मुंबई- 400064. दूरध्कनी  9322317556, 022- 28809698, 9820066028.